Tuesday, December 28, 2010

मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग -3


आभाळमाया - ही मालिका अल्फा मराठी वरची पहिली वाहिली मालिका , अल्फा आजचे झी मराठी जे लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले कदाचित सुरवात या मालिकेने केली . या मालिकेची गम्मत म्हणजे आजकाल आपण जे मोठे स्टार झालेले कलाकार पाहतो काहीजण वयाने सुद्धा मोठे झाले असतील ते यात अगदी नवीन होते .. उद. आपला श्रेयस तळपदे उमेश कामत वगैरे ..
ही मालिका सुकन्या कुलकर्णी यांनी एकट्याने पेलून धरली होती .. प्रत्येक व्यक्तिरेखा सुरेख होती .. आणि याचे शीर्षक गीत किती चांगले आहे हे मला वेगळे सांगायची नक्कीच गरज नाही ..

अवंतिका -- अस्मिता चित्र ची अजून एक उत्तम निर्मिती .. मातब्बर कलाकार . उत्तम अभिनय आणि तितकीच देखणी अशी मृणाल कुलकर्णी .. रांगडा संदीप कुलकर्णी .. रवींद्र मंकणी , श्रेयस तळपदे, दीपा श्रीराम अशा कितीतरी मात्तबर मंडळीनी सजलेली मालिका .. उत्तम शीर्षक गीत .. गम्मत सांगतो अवंतिका अजून एका गोष्टीमुळे मला लक्षात आहे ती या मध्ये असणा-या जाहिरातीमुळे .. कदाचित वाहिनीची लोकप्रियता आभाळमाया नंतर वाढल्याची ही पावती असावी 
या गोजिरवाण्या घरात - ही मालिका मी बघायचो यातील व्यक्तिरेखांसाठी आणि शामराव म्हणजे प्रदीप वेलणकर यांच्यासाठी .. इतक्या सहजपणे ते अभिनय करायचे की अशा कडक व्यक्ती मी आपल्या आजूबाजूला पहिल्या आहेत याची प्रय्तेक वेळी जाणीव  व्हायची .. आणि या सिरीयल ची गम्मत म्हणजे आपल्याकडे दसरा की त्यांच्यकडे दसरा आणि आपल्याकडे शिमगा की त्यांच्याकडे .. फक्त मालिकांमध्ये शिमग्याशिवाय बोंब असते हे वेगळे ....
आजकाल प्रत्येक सणाला प्रत्येक मालिकेमध्ये तो सण साजरा केला जातो कदाचित मी हे निरीक्षण करायला या मालिकेपासून शिकलो
आता ही मालिका प्रचंड भरकटली आहे .. शामराव ही वयाने वाढले आहेत .. पण सुरवातीचे २ -३ वर्षे
नियमितपणे पहिली आणि आवडली. 
ना आना इस देस लाडो ..
स्त्रीभ्रूणहत्या सारखा जड विषय उत्तर भारतातील स्त्रियांची मुस्कटदाबी आणि स्त्री स्त्रीवर अन्याय कशी करते या विषयवार आधारित मालिका ..
आशय असलेल्या आणि तितक्याच तरलपणे ते हाताळून दाखवणं-या मालिका विरल्याच .. त्यातली ही एक ..
उत्तम कथानक आणि ज्वलंत विषय दैनंदिन मालिकेमधून सुरेख हाताळलेला आहे ..मेघना मलिक यांनी अम्माजी ही व्यक्तिरेखा इतकी जिवंत केली आहे की फक्त त्या व्यक्तिरेखेसाठी ही मालिका माझ्या कायमची लक्षात राहील

जस्सी जैसी कोई नाही
अग्ली बेट्टी या इंग्रजी मालिकेवर आधारित ही मालिका .. या मालिकेने मोना सिंग हिला प्रसिद्ध केले .. तिचा जस्सी चा लूक आणि जस्सी जेव्हा चष्मा काढते तेव्हाचा लूक यात मस्त शॉक होता..
नंतर मोना सिंग चे टी वी करिअर जे फुलले त्यात याचा सिंहाचा वाट आहे. सोनी ला या मालिकेने बरीच लोकप्रियता दिली रोलर कोस्टर पद्धतीने वर खाली होणे सोनीची खासियत आहे त्यामुळे आज जर सोनीवर आपल्याला काही मालिका सापडली नाही तर फार नवल करण्याची गरज नाही .



असंभव 
झी मराठी वर आलेले कदाचित मराठी दैनंदिन मालिकांमधील पहिले वाहिले रहस्यमय सीरिअल . दैनंदिन मालिकेमध्ये उत्कंठा आणि सस्पेन्स टिकवून ठेवणे कठीण आहे .. पण या मालिकेने ते चपखलपणे निभावले 
उर्मिला कानिटकर उमेश कामत ,आनंद अभ्यंकर आणि सुहास भालेकर यांचे अभिनय आणि याबरोबर सुलेखा म्हणून अत्यंत लोकप्रिय झालेली खलनायिका नीलम शिर्के या मालिकेचे वैशिष्ट्य 
शीर्षक गीत सुद्धा तितकेच चांगले होते. पण या मालिकेची कथा आणि त्याची हाताळणी यामुळेच ही जास्त लोकप्रिय झाली ..


तर मित्रांनो कशा वाटल्या मालिका .. यातल्या ७०% मालिका आपल्यालाही नक्की आवडल्याच असतील याची मला खात्री आहे.
मालिका सध्या आपल्या जीवनाचे  कमीतकमी स्त्री जीवनाचं अंग बनू लागले आहे . त्यातल्या सुख्दुख्मध्ये सामावून कुठेतरी अर्धातास करमणूक म्हणून मालिका आपल्या गृहस्थाश्रमाची मल्लिका बनली आहे हे काही खोटे नाही
आपल्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील ..

माल्मीकि बनू पाहणार 
जयदीप भोगले 

Monday, December 27, 2010

मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग -२


मित्रांनो .. रामायण, महाभारत, टिपू सुलतान, जंगल बुक, मालगुडी, टिपरे अशा असंख्य मालिका कदाचित अजून नमूद करता येतील पण ऐतिहासिक मालिका मी मुद्दाम मी समाविष्ट केल्या नाहीत .. महाभारत आणि रामायण याबद्दल आपण काही वाचावे आणि मी काही मला आवडलेली म्हणून लिहावे अशा त्या नाहीत त्या त्यापेक्षा विस्तृत आहेत. अनिमेशन हा एक वेगळा विषय होऊ शकतो . मालगुडी आणि टिपरे कदाचित काही कारणामुळे मी माझ्या यादीत मांडले नाही 
मालिका निवडताना त्याची प्रसिद्धी , त्याने सुरु केलेला ट्रेंड , वाहिनीला दिलेली ओळख , कलाकाराचा पुढचा प्रवास, कथानक आणि बजेट या सर्व बाजू लक्षात घेऊन कपोलकल्पित ( फिक्शन ) कथानक मला मांडावे असे वाटले म्हणून मी या मालिका निवडल्या




बुनियाद- ही दूरदर्शनवरची अगदी सुरवातीची मालिका पण आज जी मेगा मालिकांची भाऊगर्दी जी सुरु आहे कदाचित त्याची जननी म्हणावी अशी ही मालिका. स्वातंत्र्यपूर्व काळातील पार्श्वभूमी आणि एकापेक्षा एक पैलू असलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेने दर्शकांना दिल्या .. जरी आपल्याकडे दूरदर्शनशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता , तरी आपल्याला टी वी चे तितके वेड ही नव्हते अशा काळात आपल्याला खिळवून ठेवणारी अशी मालिका म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल .
मी जरा कथानक समजण्यासाठी लहान होतो पण माझ्या बहिणी या मालिकेबद्दल चर्चा करताना मला चांगले आठवते ..

स्वामी - स्मिता तळवलकर यांची कदाचित ही पहिली मालिका .. अस्मिता चित्रचा तो उडणारा पक्षी मला दिसला , नंतर वारंवार दिसला पण मला सुरवातीला वाटायचे स्वामी तर सुरु होणार नाही ना..
माझ्या लहानपणी मला पेशव्यांचा इतिहास होता त्यामुळे मला या मालिकेचे विशेष आकर्षण वाटे . ऐतिहासिक विषय असून युद्ध प्रसंग नसलेली कदाचित कादंबरीवर आधारित म्हणून किवा कमी बजेट मध्ये केलेली म्हणून अशी ही मालिका होती
कित्येक दिवस मला रमाबाई आणि मृणाल कुलकर्णी ( त्याकाळच्या देव ) या एकाच असाव्यात असे भाबडेपणाने वाटायचे .. .
बंदिनी - ही मालिका चांगली का याचे शीर्षक गीत याचा फरक मला नेहमी अवघड वाटतो ..शीर्षक गीत कदाचित समर्पक आणि आशय असलेले हे पहिले वहिले गीत ...
कधी कधी मला माझ्या आईच्या डोळ्यातून का पाणी यायचे हे थोडे मोठे झाल्यावर कळले .. अत्यंत हृदयस्पर्शी कथा आणि सर्व कथा स्त्रीवर आधारित असायच्या .. मला काही कथा कळायच्या, काही त्या चांगल्या आहेत हे बंदिनी पाहणा-या लोकांच्या टिपलेल्या अश्रुवरून वरून भासयच्या.

रजनी - रविवारची टी वी पाहण्याची सुरवात म्हणजे रजनीपासून  .. त्याकाळी आमच्याकडे टी वी नव्हता आम्ही अंघोळ वगैरे करून शेजारी जाऊन बसायचो ... प्रिया तेंडूलकर प्रिया तेंडूलकर आहे रजनी नाही हे कळायला मला बरीच वर्ष लागली.
तडफदार स्त्रीबद्दल मला लहानपणी ओळख करून दिली ती या रजनीने .. प्रत्येक वृत्तपत्र मासिके भाषण गल्ली बोळात रजनी बोलयाची.. आजकाल ज्या मालिकांच्या जाहिराती त्याचे भलेमोठे होर्डिंग आणि रेडीओ वर होणारी जाहिरातबाजी नसूनही नुसत्या कथानाक्च्या जोरावर हिने प्रवास केला .. 

क्यो कि सास भी कभी बहु थी - मालिका या कधीकधी इतक्या शेवईसारख्या मोठ्या होतात आणि तरीसुद्धा त्या नियमितपणे पहिल्या जातात याचे हे उत्तम उदाहरण.स्टार ला स्टार करणारा करोडपती आणि सास भी कभी बहु अशी या मालिकेची ख्याती 
माजघरातील स्वयंपाक घरातील राजकारण याला सुरवात याने केली. तारा हे मेगा सिरीयल होते पण क्यो कि काही औरच ..
ही मालिका कथानक चांगले म्हणून नव्हे तर एक नवा ट्रेंड आणणारी म्हणून मला आवडते .. इतक्या भरजरी साड्या, ते रडणारे पुरुष ,आमच्या शाळेपेक्षा मोठे असणारे विराणी खानदानाचे घर अशा काही विनोदी गोष्टी यात होत्या पण .. उत्तम अभिनय भव्यदिव्य सेट्स आणि काही खास व्यक्तिरेखा .. लोभस दिसणारी तुलसी नंतर तिचा वृक्षाइतका विकास झाला ते सोडा .. पण संपूर्ण भारत ही मालिका बघायची .. आणि ते सुद्धा एकदम रात्री १०.३० वाजता ..
नाविन्याची सुरवात म्हणून ही   मालिका मला आवडली

Friday, December 24, 2010

मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग १




मित्रांनो , आळस आणि नको तितके काम हे दोन्हीही शत्रू  आपल्या छंद जोपासण्याच्या इच्छेला कसे खिंडीत पकडतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी.. गेले कित्येक दिवस काही वेळा काम म्हणून काही वेळा आळस म्हणून मी ब्लॉग पोस्ट करू शकलो नाही .. या मुळे आपल्या विश्वात फार फरक पडला असेल असे मी म्हणत नाही पण कदाचित  मी काही जे माझ्या  मनातले आपल्यासमोर मांडायचो ते राहून गेले . माझ्या हितचिंतक आणि मित्र या दोघानाही मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि बाकी समाजाला माझे ब्लॉग वाचावे अशी प्रार्थना करतो .. 

 नवीन वर्षाचा नेम काय करावा असे मी विचार करत होतो तोच मला सुचले की आपण एक १० तरी पोस्ट महिन्यात टाकले तर ....आणि कदाचित मी आपल्या खासगी आयुष्यातला हाच नेम पाळणार आहे.
आरंभशूर होण्यापेक्षा नियमितपणे काहीतरी लिहिणे कदाचित काही चांगली कल्पना देऊन जाईल...
 आहे का नाही ही  'आयडिया ची  कल्पना' ?.  आयडिया ची कल्पना हा एक सचिन दिग्दर्शित नवीन चित्रपट आजकाल टी वी वर जाहिरात करून धुमाकूळ घालतोय म्हणून हे वाक्य आठवले.

टी वी पाहणे हा माझा  आवडता उद्योग त्यावरूनच मला नेहमी वाटायचे की जसे मी मला आवडणारे  चित्रपट आपल्यासमोर मांडले तसे मला आवडलेल्या मालिका का सांगू नयेत ..
मालिका ही आपल्या दिवाणखान्याला लागलेली व्याधी आहे असे आपणास वाटत असेल तर हा लेख आपल्यासाठी नाही.
पण मालिका पाहता पाहता आपल्या घरी आपण स्वयंपाक (चवीवर फार चर्चा न करता) खाऊ शकतो, .. कदाचित वेळेवर जेऊ सुद्धा शकतो ( कारण ८.३० ला येणारी लज्जा सगळ्यांना पहायची असते) अशा अनेक नकळत होणा-या फायद्यांना (किमान तसे मानणाऱ्या) भगिनी, वनिता, गृहिणी आणि त्यांचाबरोबर बसून बसून मालिकेत माळून घेऊन ( रिमोट आपल्या हातात  गेण्याची मुभा नसल्यामुळे )आनंद मानणा-या  कुटुंबासाठी हा लेख मी लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

मालिका विषय हा जरा दैनंदिन मालिकेसारखा मोठा, भरकटत जाणारा,असा गुंतागुंतीचा आहे.  कदाचित लोकांना हे टाकाऊतून टिकाऊ करण्याजोगे भासेल.
मी मालिका अगदी दूरदर्शन वर येणा-या साप्ताहिक मालिकांपासून आजकालच्या दैनंदिन मालिकापर्यंतचा आढावा घेऊन मांडणार आहे . कदाचित आपल्याला सुद्धा या आवडलेल्या असू शकतील 
मी सुरवातीला फक्त मराठी मालिका घ्याव्या असा विचार केला होता पण दूरदर्शन हे भारताला फक्त २५ वर्षे जुने आहे  आणि सुरवातीला आपण फक्त हिंदी पाहायचो कदाचित तेवढेच दाखवयचे म्हणून सुद्धा 
पण त्या मालिका जर आता असत्या तरी आपल्याला त्या आवडल्या असत्या असे मानून मी त्या सुद्धा गृहीत धरल्या ..
 




असो जपापेक्षा थुंकी जास्त असे न करता मी आपणासमोर त्या मांडतो.
१ बुनियाद - दूरदर्शन 
२ स्वामी - मराठी दूरदर्शन 
३ बंदिनी - मराठी दूरदर्शन 
४ रजनी - दूरदर्शन 
५ क्यो की सास भी कभी बहु थी- स्टार प्लस
५  आभाळमाया - झी मराठी
६ अवंतिका - झी मराठी 
७ या गोजिरवाण्या घरात- ई टी वी
८ ना आना इस देस लाडो - कलर्स 
९ जस्सी जैसी - सोनी 
१० असंभव - झी मराठी  
या मालिका कदाचित सर्व लोकानी पाहिलेल्या असतीलच आणि त्या कदाचित आपल्या सुद्धा आवडीच्या असू शकतील .
आता मला या का आवडल्या हे मी पुढच्या भागत सांगतो  तोपर्यंत आपल्या प्रतिक्रिया आल्या तर नक्कीच आवडेल .

जयदीप भोगले

Thursday, December 2, 2010

अशी कशी ही दुनिया

गुलाबांच्या भोवती बोचतात काटे कसे
डोळ्यांच्या मेघात  पाणी  असे  दाटे कसे.
अशी कशी ही दुनिया अजब रे 
भेट अशी अल्प ती विरह का मोठा असे .
          हास्य ते वेड लावे मग शहाणे व्हावे कसे 
          आलिंगनाच्या पाशातुनी मुक्त ते व्हावे कुठे 
          अशी कशी ही दुनिया अजब रे 
          लाट टाकते बिखरून सारे, नांगर तो  टाकावा कुठे 
एक होण्या यत्न करावे दूर ते जावे कसे 
चुंबनाचा प्याला अचानक अमृत  ते घेऊन उठे 
अशी कशी ही दुनिया अजब रे 
प्रेमात मरण्या आलो असा मी पण मज जीवन ही शिक्षा असे

जयदीप भोगले    
२-१२-२०१०

रौशनी भरा अहसास

दिखाई दे न सही पर आँखों मै है ये किरने
आँखों मै रौशनी न सही पर दस्तक देती है ये किरने
सुना है लोगों से उजाला नहीं होता अंधों की दुनिया में
पर इस दुनिया का अहसास दिलाती है ये किरने
             बिजली चमकती है आसमान में लोग ये कहते है
             पर उसकी दमक से धड़क सा जाता है दिल में
मधुर झंकार सुनते है ये झरने
पर पानी भरा एक स्पर्श छु जाती है ये किरने    
        कवी कहते है हरी ये धरती खुला ये जहाँ
          पर एक अंधे के नसीब में ये सब कहाँ
          पर जब ऐसा कभी पुकारा इस दिलने
सीमेंट के जंगलो से कारखानों के धुंए से
मुडके आखों में समां जाती है ये किरने
   सुना है भगवान् बड़े सुंदर दिखते है
पर हर इंसान में नहीं अब मंदिरों में बसते है
धर्म से अंधे लोगों की लड़ाई एक अंधे को दिखा जाती है ये किरने
अब सोचो नहीं समझो ये किरने है एक सच्चा मन
जो अभी तक जिन्दा है एक अंधे के मन में
दुनिया में तो लोग रास्ता भटक जाते है
पर जीवन का सही पथ बताती है ये किरने
जब चारो ओर अँधेरा है संसार में
खुश है एक अँधा सबसे इस जहाँ में
लोग  देखके पछताते है यहाँ पर
सुनहरे ख्वाब दिखाती है ये किरने
जो एक अँधा समझ सकता है वाही दिखाती है ये किरने

जयदीप
४-८-१९९९

Tuesday, November 2, 2010

संघर्ष

 था ख्वाब या सच्चाई थे ये
सपने जैसी हकीकत सुनाता हूँ
दिल को भी न थी खबर जिसकी
यारो , उसको को मै बयां करता हूँ

क्या थे वो दिन दोस्ती के
कुछ खट्टे थे कुछ मीठे थे 
ना बात थी दिल में कुछ 
हम तो सीधे साधे थे

वह थी चुलबुली ऐसी
चहकती बुलबुल जैसे थी 
उसकी बाते बहते पानी जैसी
कतरे भर मैल से मैली होती थी

मै भी उसका चहेता
हर रोज था उसको कहता
अपना रिश्ता है मेरे दोस्त
हीरे और सोने जैसा

वह  दिन ना भूलूंगा मै
जब मैंने उसकी आँखों में देखा
दोस्त था वो तो मेरा
एक प्यारा सा दोस्त अब बन बैठा

उस दिन रात आँखों में नींद ना आई 
जब नींद ने देखा आँखों में
आँखों में थी वो समायी
   
 पल पल मिलके दिन हुए
    तो मेरा दिल कुछ और ही था
मुहब्बत जागी थी उसमे 
दिल मै उसको दे चूका था
  
  अब वह आती तो 
मेरी साँसे महक जाती थी
पर मुझे कहने में था डर,
ना कर दे वो इन्कार
प्यार था दिल में मेरे पर
मंजूर ना  थी मुझे यह हार 
              कभी लगता था ऐसे
              कुछ होगा उसके मन में भी
                आसमाँ जब बरसता है
               भीग जाती है जमीं भी 
              
 पर ख़याल यह ख़याल ही रहा
                मेरा प्यार अधुरा ही रहा
               दो मनो के हालत का यह पंछी
                दिल के पिंजरे में बंद ही रहा

पर अब भी मै खुश हूँ 
क्योंकि पंछी मेरे पास है
पिंजरे में ही है वह चहकता
पर प्रेम गीत गुनगुनाता है 

जयदीप भोगले
१२.०६.१९९९ 

Tuesday, October 19, 2010

निवड तुमची .. आवड महाराष्ट्राची - आली वेळ झी मराठी अवार्ड्सची


रसिकांच्या मनावर राज्य करणा-या आणि ११ वर्षे पाय रोवून करमणुकीत एक नवीन टप्पा गाठणार-या झी मराठी वाहिनीने नेहमीच आपल्या मनावर,आणि हो आपल्या टी वी च्या रिमोट वर, आणि आपसुखच  आपल्या हॉलवर ही   राज्य केले आहे ..
कार्यक्रमांची विविधता आणि त्याची गुणवत्ता टिकवत नेहमी काहीतरी नवीन कार्यक्रम आपल्यासमोर आणले. आपल्यासमोर रोज येऊन आपले मनोरंजन करणारे आपले कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखा या कुठेतरी वाखाणल्या जाव्यात त्यांच्या 
कार्यक्रमांना कुठेतरी पावती मिळावी म्हणून सात वर्षापुरी आपला अल्फा अवार्ड आणि आता झी मराठी अवार्ड याच्या रूपाने आपल्यासमोर आणला .आता तोच अवार्ड लवकरच मुंबईत संपन्न होणार आहे आणि कदाचित महिना अखेर बहुतेक ३० तारखेला त्याचे प्रक्षेपण होणार आहे. 
झी मराठी अवार्ड नेहमी रविवारी ७.३० वाजताच दाखवला जातो त्यामुळे प्रत्येक रविवारी टी वी समोर जाऊन बसले कि काम झाले मग कधी येणार नाही की नाही त्याचे काही मला फार विशेष महत्व वाटत नाही.
 झी मराठी अवार्ड मध्ये वेगवेगळ्या गटात कलाकारांना पुरस्कृत केले जाते उदा. व्यक्तिरेखा , उत्तम जोडी , भाऊ बहिण , कुटुंब , खलनायक , कथाबाह्य कार्यक्रम ..इत्यादि 
याचे निवेदन आणि संचलन ही एखादी जोडी करते .. एकदा अतुल परचुरे आणि सुमीत होते मागच्या वर्षी पुष्कर आणि निर्मिती 
झी मराठी अवार्ड अवार्ड बरोबर बरेच काही असते .. त्यातल्या निवेदकांच्या कॉमेंट , विनोद , मधल्या नाट्यछटा ,गाणी, नाच सर्वच भन्नाट असते  
मी हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी म्हणजे अतुल परचुरेच्या वेळी थेट पहिला होता . तो कार्यक्रम मला आजही लक्षात आहे .. त्यावेळी वाहिनीचा लाडका आदेश भाऊजी प्रेक्षकांमधून स्टेजवर आला होता आणि तेथून जो कार्यक्रम रंगला .की सांगायला शब्द नव्हते ..तेव्हा  मी पुन्हा टी वी वर तो पहिल्यापासून जाहिरातींना ना टाळता  रिमोटला न हात लावता पाहिला का ? अहो कुठे मी दिसतो का हे पाहण्यासाठी .. पण तिथे कित्तेक उत्तम चेहरे असताना माझ्या चेहऱ्यावर कॅमेरा यायला न मी प्रमुख पाहुणा आणि ना कलाकार .. पण असे नाही बर का की सामान्य प्रेक्षक दिसत नाहीत .. माझी बहिण तर दोनदा तीनदा गेली होती कार्यक्रमाना आणि सगळ्या वेळी दिसली असो ...
यावेळी मला काही व्यक्तिरेखा विशेष वाटतात .. मनु- लज्जा , बाप्पाजी - भाग्यलक्ष्मी ( ह्यांना मला बघून जाम हसू येते म्हणून मी पाहतो) 
नंतर फु बाई फु , सा रे ग म प , आणि जोडी तर माझिया प्रियाची या वेळी अवार्ड घेऊन जातील असे दिसते
शीर्षक गीत लज्जा आणि माझिया प्रिया दोन्ही मस्त आहेत पण माझिया प्रिया ला मिळेल वाटते, कारण  लोकल लोकल मध्ये मला त्याची रिंग टोन ऐकू येते ..
पण या बरोबर नाट्य छटा , गाणी , नाच पाहण्यासाठी हा टी वी वर पाहायला मजा येते आणि यावेळी सुद्धा येईल
मी तर वाट पाहणार आहे आणि तुम्ही ...

जयदीप भोगले
१९  . १० . २०१०  

Friday, October 15, 2010

करमणुकीची सरबत्ती --- कौन बनेगा करोडपती


 कार्यक्रम- कौन बनेगा करोडपती 
वेळ- ९.००-१०.००
वाहिनी- सोनी 
पहावा की नाही - अवश्य पहा ..
स्टार वाहिनीवर सुरवात करून स्टार आणि अमिताभ या दोघांनाही लोकप्रियतेच्या उच्चांकाला नेणारा  सर्वांचा लाडका प्रश्नोतरांचा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती याने सोनी या वाहिनीवर  या सोमवारपासून नवीन सुरवात नाही तर शुभारंभ केला ( कॅडबरी चोकलेट हे याचे प्रस्तुतकर्ता आहेत .)
चुरशीच्या लढाईमुळे हाच कार्यक्रम शाहरुख खान याने काही काळ सुत्रसंचालीत केला होता .. बादशाह आणि बिग बी यांची चढाओढ कितीही रंजित केली तरी यावेळी मात्र आपल्या हिंदुस्तांनाच्या नव्हे तर प्रत्येक भारतीय मनावर राज्य करणाऱ्या श्री अमिताभ बच्चन यांनी सूत्र पुन्हा आपल्या हाती घेतली ..
यातच आता ही चुरशीचे पारडे कुणाकडे झुकले हे काही वेगळे नमूद करावे असे मला वाटत नाही. असो मोठ्यांच्या वादात आपलं विषयांतर नको .
सोनी वाहिनीवर जरी हा प्रोग्राम नव्याने  सुरु झाला तरी यात काही लाइफ लाईन  सोडल्या तर फार बदल नाहीत ..
पण अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा भेट हेच प्रमुख आकर्षण आहे. 
आता लोकांनी कितीही सांगितले कि आता तो तोच तोच पणा वाटतो .. आता ती एनर्जी नाही .. अजून पुष्कळ कार्यक्रम पाहण्यासारखे आहेत. पण बच्चनची मजा काही वेगळीच
पहिल्याच भागात त्यांनी अग्निपथ आणि दिवार याचा संवाद सादर केला आणि जिंकले .. कदाचितच  इतकी इंटेन्स डिलेव्हरी कुणी दुसरे करू शकते .
अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने आपल्या समोर बसलेल्या जन सामान्याला वागवतात, त्याचाशी संवाद साधतात , त्याचा आनंदाशी कुठेही वरचढ न होता एकरूप होतात हे वाखाणण्यासारखे आहे आणि हे या खेळाचे वैशिष्ट्य .. आणि कदाचित प्रश्नापेक्षा मला हेच पाहायला जास्त आवडते .
या वेळी एक्स्पर्ट पाहुणा एक नवीन भाग आहे आणि ते सुद्धा चपखलपणे बसवले आहे .
प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येक जिंकलेल्या रकमेत आपल्याला उत्तर माहिती असेल तर आपणही जिंकू शकलो असतो ही हुरहूर प्रत्येक दर्शक करत असावा ..
शिवाय मी याबद्दलच्या चर्चा  जुन्या करोडपति  मध्ये तर रस्त्यावर, पानाच्या गादीवर, किराणा दुकानावर सुद्धा ऐकल्या आहेत ..त्यामुळे कोण स्पर्धक किती छान दिसतो पासून कोण किती बावळट ,निर्बुद्ध, ढ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आपण कितीही सुमार बुधिमत्तेचे असलो तरी आपण मस्त ठोकून देऊ शकतो कारण आपल्याला उत्तर काय.. हे माहिती होते,
 अणि ही याची गम्मत आहे .
या कार्यक्रमाने स्लम डॉग ला सुद्धा मदतीचा हात दिला आणि त्या सिनेमात सुद्धा करोडपती हा महत्वाचा भाग होता.
याच कार्यक्रमाने कितीतरी क़्विज शो , विडम्ब्ने आणली .. प्रत्येक कॉमेडी कार्यक्रमात बच्चनची नक्कल केली जाऊ लागली 
कदाचितच इतकी लोकप्रियता आणि त्यावर भाजून घेतलेल्या पोळ्या दुस-या कुठल्या कार्यक्रमात झाल्या असतील असे मला वाटत नाही  ...
आणि सोनी वाहिनीसाठी प्रतिस्पर्धी बिग बॉस हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे  सोनी ला टी आर पी साठी फायदाच होईल नव्हे एव्हाना झाला असेल 
पण दूसरा हुशार मुलगा अजारी पडला म्हणून मी पहिला आलो असा कार्यक्रम करोडपति नक्कीच नाही .. आणि इतर चांगले काही नाही म्हणून बच्चन ला बघू असे दिवस किंवा दर्जा बच्चन साहेब कधीही येऊ देणार नाहीत ..
म्हणुनच सांगतो बच्चनच्या चाहत्यानी , मला लॉटरी लागली तर असे स्वप्न रंगवणा-या स्वप्नाळू दर्शकांनी ..,बरबटलेल्या कार्यक्रमातून आपल्या मुलाला कसे वाचवावे या विचारात असणा-या पालकांनी , आणि आमच्यासारख्या चूक की बरोबर ,चांगले की वाईट अशी उठाठेव करणार-या समीक्षकांनी कौन बनेगा करोडपती अवश्य पाहावा
नाराजी होणार नाही एवढी खात्री .. बाकी आपण सुज्ञ आहात ..
तो चलिये आप और हम देखते है दुनिया का अदभूत खेल ,, जिसका नाम है  -- कौन बनेगा करोडपती ....
 
जयदीप  भोगले
१५ .१० .  २०१० 

Thursday, October 14, 2010

मला भावलेले चित्रपट का पहावेत ? (भाग ५)

मित्रांनो ,




जगाच्या पाठीवर १९६०
दिग्दर्शक- राजा परांजपे 
संगीत- सुधीर फडके
पटकथा आणि गीते - ग दि माडगुळकर
कलाकार- राजा परांजपे , सीमा देव, धुमाळ
ह्या चित्रपटाचे मी लहानपणी पाहिलेले पोस्टर आठवते ... जगाच्या पाठीवर  लिहिलेले नाव आणि एका पेक्षा सुमधुर अशा गीतांची नावे असे या पोस्टर चे स्वरूप हिते
या वरूनच तुम्हाला कल्पना आली असेल कि या चित्रपटाची अजरामर बाजू याच्या गीतांमध्ये आहे.
मागे म्हटल्या प्रमाणे  सोप्या चालींची अवीट  गोडीची गाणी म्हणजे बाबूजींची गाणी .. आणि आधुनिक वाल्मिकी - गदिमांनी त्या गीतांचा प्राण म्हणजेच त्याचे शब्द असे रचले आहेत कि त्याबद्दल चांगले किंवा वाईट म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल त्यामुळे या दोघांना त्रिवार वंदन ...
गीतांबरोबर तितकीच   ह्रदयस्पर्शी पटकथा दर्जेदार मन हेलावून टाकणारे कलाकारांचे अभिनय यामुळे सुद्धा हा चित्रपट मनात कायमचे घर करून जातो .
बाबूजींच्या गीतांसाठी हा चित्रपट संग्रही ..




सांगत्ये ऐका -१९५९
दिग्दर्शक- अनंत माने 
कलाकार - जयश्री गडकर , सुलोचना , दादा साळवी , चंद्रकांत ,सुर्यकांत
सांगत्ये ऐका आणि जयश्री गडकर एक समीकरण आहे .. आठवणीतील चित्रपट आणि एखाद्या कलाकारासाठी लक्षात राहणारे काही चित्रपट असतात तर जयश्री गडकर यांच्यासाठी  हा सिनेमा लक्षात राहतो
चित्रपटाची कथा ग्रामीण पठडीतली व प्रभावी अशी आहे .
तमाशाप्रधान चित्रपटांच्या यादीत अव्वल असणा-या यादीत या चित्रपटाचे नाव मी पहिल्या तीनात नक्की ठेवले असते
बुगडि माझी .. आणि क्लाय्मक्स चा  तमाशा  अतिशय सुन्दर आहेत .

श्यामची आई - १९५३
दिग्दर्शक- प्र के अत्रे
कथा - साने गुरुजी 
कलाकार -वनमाला , माधव वझे , दामुनाना जोशी
श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्म्चारीत्रावरून ह्या चित्रपटाची निर्मिती झाली.
श्यामची आई हे पुस्तक प्रत्येक मराठी मनात आई आणि मुलाबद्दल च्या नात्याबद्दल आदर निर्माण करते .या चित्रपटाला पहिले भारताबाहेरील सुर्वण कमळ देऊन गौरवण्यात आले . याला राष्ट्रीय पुरस्कार हि देण्यात आला .आजच्या पैशाच्या मागे लागलेल्या जगाला गरिबीत सुद्धा आपली मूल्य ढळू कशी देऊ नये हे हा चित्रपट शिकवून जातो.
प्रत्येक  मुलाने आपल्या आई बाबा बरोबर  पहावा असा चित्रपट ..


कुंकू  १९३७ 
दिग्दर्शक - वी शांताराम 
कलाकार- केशवराव दाते , शांता आपटे, शकुंतला परांजपे 
संगीत- केशवराव भोले 
मला हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट म्हणून आणि कथानकाच्या पुरोगामी विचारसरणी या मुळे जास्त आवडतो. 
हा चित्रपट मी अगदी अलीकडे पहिला आणि मला कथानक अजिबात माहिती नव्हते .. पण चित्रपट पाहिल्यावर त्यातला अभिनय आणि कथानकामुळे मी फार प्रभावित  झालो . समाजप्रबोधन म्हणून ज्यावेळी चित्रपट बनवले जायचे त्यावेळी अशा पध्दतीची मांडणी अतिशय धाडसी वाटते ..
प्रभातच्या निर्मितीला सलाम..

संत तुकाराम - १९३६  

दिग्दर्शक- विष्णुपंत   गोविंद दामले  , फत्तेलाल 
कलाकार - विष्णुपंत  पागनीस , श्री भागवत , गौरी 
संत तुकाराम हा चित्रपट हा त्यातल्या संत भावासाठी बघावा .. कदाचित खरे तुकाराम कसे असतील जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्यांनी हा चित्रपट पाहावा.
माझी आजी हा चित्रपट पाहायला सिनेमागृहाच्या बाहेर चप्पल ठेऊन गेली होती  .. त्यात त्या काळातल्या साध्या प्रवृत्तीचे आणि त्या चित्रपटाच्या खरेपणाचे चित्र आपल्याला समजू शकेल.
प्रभात ची अजून एक अविस्मरणीय भेट


इतके दिवस आपल्यासमोर मला आवडलेले चित्रपट टप्प्या टप्प्याने सादर केले . कदाचित आपल्याला सुद्धा हे नक्कीच आवडतील अशी आशा करतो .
या लेखाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार .
आपली मराठी चित्रपट सृष्टि अशीच समृद्ध रहो हीच सदिच्छा 

जयदीप भोगले 
१४.१०.१०
चित्रपट , कथानक ,प्रभात , फत्तेलाल , लेख  


Monday, October 4, 2010

निरोप

अखेरची ही साद तुला सखे
तुझा गाव सोडतो आहे
तू नसशील परी मन तुझा निरोप घेऊ पाहे
       
आता दिसणार नाही ती साउली
       फ़क्त स्वप्नात शोधणार आहे
       आयुष्याच्या उंब-यावर जणू तुझी वाट पाहणार आहे


मध्यानेची रखरख ही तुझ्या केसात श्यामल   झाली
आता पहाटेचा गारवा जणू दाह पोचवणार आहे

तू काचेच्या महालात मी फुलांच्या कुंपणात आहे
दोघे जणू मुक्त पण मन बंदिवान आहे
   
आता विचार नको प्रिये काय होते काय होणार आहे
   जुनी पाने गळतात  तेव्हा नवीन पालवी येणार आहे

  जयदीप भोगले   
१० मे २००२

Friday, October 1, 2010

मला भावलेले चित्रपट - का बघावेत ? ( भाग ४)




सिंहासन - १९८०
दिग्दर्शक - डॉ. जब्बार पटेल
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर 
कलाकार- अरुण सरनाईक , निळू फुले , सतीश दुभाषी ... आणि इतर सर्व मात्तबर मंडळी ...
सिंहासन हा अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या कादंबऱ्यांवर आधारित सिनेमा आहे . मल्टी स्टार चित्रपात मराठी मध्ये जरा बोटावर 
मोजण्या  इतकेच आहेत त्यापिकी हा एक . ७० च्या दशकात रंगमंच गाजवणारे सर्व कलाकार एकत्र येण्याची पर्वणी या चित्रपटात घडून आली .
हा चित्रपट मला कोल्ड सिनेमा या धर्तीचा वाटतो . फार तद्काहेबाज संवाद नसूनही सिनेमाची पकड सुटत नाही .
धुरंदर आणि वास्तववादी राजकारणावर प्रकाश टाकणार चित्रपट .राजकारण . समाजकारण , कामगार संघटना यांचे तिरंगी बंडाळी यात दिसते  
या सर्व कलाकार मंडळींसाठी संग्रही ठेवावा असा चित्रपट 

हा खेळ सावल्यांचा १९७४
दिग्दर्शक -वसंत  जोगळेकर
कथा - मधुसूदन कालेलकर
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर
कलाकार- काशिनाथ घाणेकर, आशा काळे ,धुमाळ , राजा गोसावी
मराठी चित्रपट सृष्टीत भयपट आणि सस्पेन्स चित्रपट खूपच कमी झाले . पारध, अशी एक रात्र होती, एक रात्र मंतरलेली , झपाटलेल्या बेटावर,  पण पारध सोडता बाकी सगळे सुमार होते ..
उत्तम गाणी आणि खिळवून ठेवणारी कथा या मुळे हा चित्रपट एक उत्तम  भयपट म्हणून संग्रही हवा   
आशा काळे मला यात विशेष आवडली .. आणि गाणी तर मला वेगळे काही सांगायला नको अशीच आहेत 

सामना - १९७४ 
दिग्दर्शक- डॉ जब्बार पटेल
कथा आणि संवाद- विजय तेंडूलकर 
कलाकार - निळू फुले , डॉ श्रीराम लागू 
सामना हा चित्रपट मला या पूर्ण यादीत सर्वात जास्त आवडतो . दोन व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाची झुंज . विजय तेंडूलकर यांची कथा आणि अतिशय प्रभावी संवाद, निळूभाऊ आणि डॉ लागू यांची कदाचित सर्वोत्तम ठरावी असा अभिनय आणि संवाद शैली .
हिंदुराव पाटील आणि मास्तर ( विफल गांधीवादी ) या व्यक्तिरेखा कदाचितच कुणाला अजून उत्तम रंगवता येतील किंवा आल्या असत्या. 
प्रत्येक बाबतीत हा चित्रपट सरस आहे .. हा चित्रपट रिलीज झाल्यावर ज्यांनी हा पडद्यावर पहिला मला त्यांचा हेवा वाटतो . या चित्रपटाशी निगडीत सर्व व्यक्तींना माझं त्रिवार वंदन 
प्रत्येक मराठी माणसाने  उत्तुंग आणि आंतरराष्ट्रीय  दर्जाचा मराठी चित्रपट( छायाचित्रण सोडून) म्हणून हा संग्रही ठेवावाच ...




पिंजरा - १९७२
दिग्दर्शक- वी शांताराम
संगीत- राम कदम 
गीते - जगदीश खेबुडकर 
कलाकार- श्रीराम लागू, निळू फुले, संध्या 
सामनाच्या दर्जाचा हा अजून एक चित्रपट . पिंजरा हा चित्रपट न ऐकलेला मराठी माणूस मी अजून पाहिलेला नाही .उत्तम लावण्या ( संगीत आणि गीते या दोन्हीही तितक्याच दर्जेदार ) आणि अभिनय याने नटलेला  हा एक चित्रपट
या चित्रपट मला तर  लागूंच्या व्यक्तिरेखेच्या होणा-या दैनेबद्दल डोळ्यात पाणी येते . काही काही डायरेक्शन सीन  अविस्मरणीय आहेत . राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांनी या चित्रपटाचे सोने केले
सर्व दृष्टीने पंचतारांकित सिनेमा .. शांताराम बापूंच्या सिनेमा चाहत्यांच्या संग्रही असावा असा चित्रपट ..

सोंगाड्या - १९७०
कलाकर - दादा कोंडके , उषा चव्हाण , निळू फुले
संगीत - राम कदम
हा चित्रपट मी दादा कोंडके याच्या जयंतीदिवशी प्रभात सिनेमा पुणे इथे पहिला साल २००३ , आणि विशेष म्हणजे हाउसफुल ,. आणि आम्ही पहिल्या रांगेतून  पहिला.
दादांच्या  झंजावाती युगाची सुरवात करून  देणारा  चित्रपट . या नंतर दादांनी मराठी गावरान मेवा दिला ते काही सांगायची गरज नाही .
राम कदम यांचे संगीत, दादांची अफलातून अदाकारी. आणि कृश्न्धवल असून रंगीत वाटणारी गाणी यामुले हा चित्रपट अवीट गोडीचा आहे.


मुंबईचा जावई - १९७०
संगीत - सुधीर फडके
गीतकार- ग दि माडगुळकर 
हा चित्रपट तसा अगदी नेहमीच्या पठडीतला पण .  १९७० मध्ये मुंबईच्या चाळकरी जीवनतील गमती जमती आणि त्यातून फुलणारी कौटुंबिक प्रेमकथा हा विषय मस्त होता .
याची गाणी मला कधीही ऐकायला आवडतात .. साधी आणि सोपी गाणी कशी अवीट करावीत यात बाबुजींचा हात कुणीच धरू शकणार नाही,
संगीतासाठी चित्रपट संग्रही
.. आवडते गीत आज कुणी तरी यावे आणि प्रथम तुज पाहता ..

एकटी १९६८ 
निर्माता - राजा ठाकूर 
दिग्दर्शक - चौगुले 
नावाप्रमाणेच हा  चित्रपट म्हणजे आतडे पिळवटून टाकणारा सुलोचनाबाईंचा अभिनय ... खूप लहानपणी पाहिलेला चित्रपट ...
आईवेड्या मुलाने हा चित्रपट पाहून जर डोळ्यात पाणी आले नाही तर शपथ .... म्हणजे इतर लोकांनाही तितक्याच भावना आवरणार नाहीत हे ही खरे !!१
इथून दृष्ट काढते .. हे गीत ..तर लाजवाबच आहे ...मला मोलकरीण या चित्रपटापेक्षा हा चित्रपट जास्त वास्तव वाटतो म्हणून मी याला जास्त झुकते माप दिले ..

हा माझा मार्ग एकला  १९६४ 
दिग्दर्शक - राजा परांजपे
कलाकार - सचिन ( बालकलाकार ) राजा परांजपे 
हा चित्रपट एका बालकलाकाराचा म्हणालात तरी चालेल .. काही अफलातून छायाचित्रीत सीन्स , उत्तम गाणी . राजा परांजपे यांचा उच्च अभिनय 
आणि हळुवार पण कष्टी करणारी कथा ...
जुन्या सालच्या सिनेमामध्य या चित्रपटाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते ..


जयदीप भोगले 







Thursday, September 30, 2010

जिस बला में जिंदगी अटकी .

मित्रांनो , गेले पाच दिवस मी लिहले नाही मग आता मला फार खुमखुमी आली आहे म्हणून लिहितो आणि ते ही थोडेस वेगळे
ही गोष्ट पुण्याची साल २००३ .. मी एका छोट्या ऑटोमोबाईल कारखान्यात कामाला होतो . तसे पहिले तर मी एक योग योगाने झालेला इंजिनिअर .. ( तसे बरेच जण माझ्याच गटात येतात पण कबूल कमी जण करतात .. असो )
 कारखाना छोटा होता आणि मी नवशिका त्यामुळे सुरवातीला सी एन सी मशीन वर काम करयचो .. आता सी एन सी ही एक स्वयंचलित मशीन असते यापलीकडे फार काही सांगत नाही .. इंजिनिअर आणि तत्सम लोकांना ती की आहे हे  कळेल आणि इतरांना जाणून घ्यावे असे काही त्यात नाही म्हणून ..सी एन सी . आता साहित्यात कवितेत लोकांमध्ये रमणारा मी .. मला मशीन बरोबर काही मजा यायची नाही..कदाचित म्हणून मी काही संगणक क्षेत्रात काम केले नाही .. (असो विषयांतर नको)..
मला या मशीनचा जाम राग यायचा पण एम बी ए च्या परीक्षांसाठी लागणारा पैसा साठावा.. उगीच लोकांनी बेकार म्हणू नये .. आणि काही नाही तर पाट्या टाकत कुठेतरी जाऊन नक्कीच पोहचू म्हणून मी एक एक दिवस पुढे जात होतो ...
मी कविता करतो हे माझ्या इतर कामगार मित्रांना माहिती होते .. त्यांनी मला आमच्या सी एन सी मशीन बद्दल काहीतरी लिहायला सांगितले .पण मी मात्र सी एन सी ची  खुन्नस डोक्यात ठेउन कविता केली .कविता हिंदीत होती  . 
मी इंजिनिअर महाराष्ट्राबाहेर झाल्यामुळे माझ्यावर हिंदी भाषेचे तितकेच संस्कार झाले कारण तीच बोली भाषा होती .. म्हणून मी हिंदी कविता केली (तश्या मी मराठी मध्ये ही कविता केल्या)  ..
कदाचित या कवितेमधली  खरी मजा एखादा मेकानिकल इंजिनिअर किंवा तांत्रिक क्षेत्राचे लोक आधी घेऊ शकतील पण कवितेचा आस्वाद सर्व वाचक घेतील अशी अशा बाळगतो ..

जिस बला में जिंदगी अटकी ..
उसका नाम सी एन सी
स्पिंडल की स्पीड ने
टरेट की फीड ने 
अत्याचारों की भीड़ लगा दी 
जिस की आवाज से 
एक आग से दिल में भड़की 
उसका नाम सी एन सी 
                        भावनओं पे कट इसने निकाल दिया 
                         उसमे एक लम्बे ग्रूव का घाव भी जड़ा दिया 
                          साइकल टाइमिंग लगा के जवानी को कुरेद दिया
                           और इस सोच में पड़ गया तो 
                           जो  धम से पार्ट पे धडकी 
                         उसका नाम सी एन सी
सरफेस फिनिश ने सपनो को फिनिश किया
आर ए के नाम से दिल में डर सा आ गया
जब सब को बदल दिया तो ,
जिसकी रेडिअस स्टेप जैसे खटकी 
उसका नाम सी एन सी
                             कभी टार्गेट की मार से
                             तो कभी क्वालिटी के वार से
                             करिअर के ग्राफ को टेपर सा आ गया
                             जो इस सोच में पड़ गया 
                              तो मेनेजर बोला .. तेरे प्रोसेस कंट्रोल की लाइन नीचे कैसे अटकी 
                              जो इतने करतब दिखा के ना अटकी 
                              उसका नाम सी एन सी
कभी फानुक कभी मझाक
ये सीनुमेरिक भी ना आये बाज 
कंट्रोल सब अलग अलग
मगर सब की एक ही आवाज
इनके प्रोग्राम से पूरी सेटिंग ही भटकी
उसका नाम सी एन सी
                                   पर जब मैंने सोचा 
                                    जिसने सौ बेकारो को निवाला दिया 
                                    मुझ जैसे बेसहारा को सहारा दिया 
                                      एक्स्पिरिएन्स  ना होके आसरा दिया 
                                      उसका नाम सी एन सी
                                       जिसने डूबती जिन्दगी कंट्रोल की 
                                        उसका नाम सी एन सी उसका नाम सी एन सी...

त्या रात्रि संध्याकाळी सेकंड शिफ्ट ला मशीन पेक्षा माझ्या सगळ्या मित्रांच्या टाळ्याचा आवाज जास्त होता ...
तितक्यात आमचे म्यानेजर आले .. काय रे भाऊ ? काय करत आहात ? ..
तात्या ... याने बघा किती चांगली कविता केली आहे ...साहेबानी त्या कागदाकडे कसपट असल्यागत पाहिले ...
अरे पण यासाठी २० मिनिटे मशीन बंद ठेवली तेवढा वेळ कोण भरून काढणार.. जरा टाइमपास कमी कर आणि  काम कर म्हणजे पुढे जाशील ..
त्यादिवशी टाळ्याचा डोहात कुणीतरी वास्तववादी चिखालाचा दगड टाकुन पाणी गढूळ   केले असे वाटुन गेले  ...
आणि काही दिवसात मी हे क्षेत्र  आपला प्रान्त नाही हे उमजुन पाउल पुढे टाकले आणि पाणी वाहते केले ...
पण आजही आठवणीच्या शेंगा खाताना एखादी  खवट शेंग असल्यागत तो प्रसंग आठवतो ...  

टीप - टरेट - ( मशीनवर धारधार टूल लावण्यासाठी असलेले रिंग )
फीड - या परिमानाने पोलाद कट केले जाते 
प्रोसेस कंट्रोल चार्ट  - सान्खिक्की पद्धतीने काढलेला आलेख 

जयदीप भोगले
३०- ०९-२०१० 
कविता - १८ -१०-२००३
   


                   

मला भावलेले मराठी चित्रपट- का पाहावेत ( भाग -३)

अशी  ही  बनवा बनवी १९८८ 
दिग्दर्शक - सचिन
कलाकार- अशोक सराफ, सचिन , लक्ष्मीकांत बेर्डे 
अशी ही बनवा बनवी म्हणजे सचिन च्या कारकिर्दीतील सर्वात उत्तम सिनेमा .. आणि कदाचित कॉमेडी काळामधील सर्वोत्तम म्हणावा असा .
उत्तम शाब्दिक विनोद . स्त्री रूप असून कुठेही पाचकळ न होऊ देता साकारलेली भूमिका . अगदी छोट्या छोट्या सुद्धा  पण लक्षात राहणा-या भूमिका .
आणि उत्तम गाणी .. त्यामुळे प्रफुल्लीत करणारी कॉमेडी म्हणून संग्रही असावा असा सिनेमा ...

धाकटी सून १९८६ 
दिग्दर्शक - राजदत्त 
कलाकार- सविता प्रभुणे , उदय टिकेकर, स्मिता तळवलकर ,शेखर नवरे 
हा सिनेमा फार उत्तम अगदी वेगळी कथा असे काही नाही पण जेव्हा मी कौटुंबिक सिनेमा म्हणून अवलोकन करतो तेव्हा माहेरची साडी .. लेक चालली या पेक्षा मला हा चित्रपट जास्त आवडतो .
तीच जुनी स्टोरी मोठी सून वाईट .. मोठा मुलगा बैकोच्या ताटाखालचे मांजर .. छोटा मुलगा परागंदा .. पण श्रवणीय गाणी . शरद तळवलकर , स्मिता तळवलकर आणि सविता प्रभुणे यांनी हा सिनेमा पेलून धरला आहे ..
मला यातले... सांग तू माझाच ना हे गाणे फार आवडते ... 
माझ्या पत्नीने हे गाणे शिकावे असे मला फार वाटायचं मग तिने मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला  ही सी डी दिली .. म्हणून हा चित्रपट संग्रही ...

उंबरठा १९८२ 
दिग्दर्शक - जब्बार पटेल
कलाकार- स्मिता पाटील , गिरीश कर्नाड , 
आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलात्मक सिनेमा म्हणून या चित्रपटची गणना करावी वाटते .
स्मिता पाटीलने केलेली भूमिका मला विशेष लक्षात राहते .
काळजाचा ठाव घेणारी गाणी .. स्त्री उंबरठ्याबाहेर पडल्यानंतर तिचे बदलणारे जीवन .. महिलाश्रम या संस्थेचे भयानक वास्तव .. असा हा चित्रपट विस्कटून टाकतो ..
jaydeep bhogale 

Thursday, September 23, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट का पहावेत? भाग-२

मित्रानो आज दूसरा भाग सादर करतो .. जरा वेळ कमी असल्यामुले चार सिनेमांबद्दल सांगतो . 
मी या प्रतिक्रिया चित्रपट समीक्षक म्हणून न देता मला काय वाटत्ते ते सांगतो .. म्हणुनच कदाचित काही कलाकारांचा उल्लेख यात राहून जातो पण जे कलाकार लक्षात राहतात त्यांच्याबद्दलच लिहावे नाही का ... नाहीतर उगाच एक ना धड असे होईल ..
आवडल्यास  इतराना वाचायला सांगा ..नाहीतर आपण टिका करण्यास समर्थ आहातच ...
सरकारनामा -१९९८

दिग्दर्शक- श्राबनी देवधर
कलाकार- यशवंत दत्त , दिलीप प्रभावळकर , अश्विनी भावे
एक वेगवान चित्रपट अशी या चित्रपटाची पंच लाईन होती .. आणि हा चित्रपट त्याला खरा उतरतो .
राजकारण आणि त्यातील नाट्यमय घडामोडी ते ही मुख्यमंत्र्याच्या मुलाचे लग्न या विषयातून अतिशय तडाखेबाज संवाद असलेला हा चित्रपट
हा चित्रपट  फक्त श्री यशवंत दत्त आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासाठी पाहावा.
राजकारणी लोक किती धुरंदर असू शकतात ते हे दोघे दिग्गज हुबेहूब सादर करतात.
चित्रपटाच्या संकलन आणि सादरीकरणासाठी  सलाम ...

लपंडाव १९९३
दिग्दर्शक- श्राबनी देवधर
कलाकार- अशोक सराफ , विक्रम गोखले , वंदना गुप्ते , सविता प्रभुणे ,आणि इतर सर्व जन प्रभावी
संवाद - मंगेश कुलकर्णी 
तीन फुल्या आणि तीन बदाम यावर आधारित भन्नाट कॉमेडी .. निखळ मनोरंजन 
पुणेरी जीवनाबद्दल ज्यांना जाणून घ्यायचे आहे. जे जुन्या काळी पुणे विद्यापीठात शिकत होते. 
अशोक सराफ यांचे संवाद आणि संवाद फेक ज्यांना आवडते त्यानं हा चित्रपट संग्रही ठेवावाच .
विरोधी व्यक्तिमत्व, पुणेरी नावे, त्यांचे लाईफ स्टाइल दाखवण्याची पद्धत   इतक्या बारकाईने मी दुसऱ्या कुठल्या चित्रपटात लिहिलेली बघितली नाही 
पटकथा आणि हलके फुलके पण लक्षात राहणारे संवाद यासाठी रविवार दुपार नेहमीच यासाठी राखून ठेवावी असा चित्रपट 

कळत नकळत - १९९१
दिग्दर्शक - कांचन नायक 
निर्माती - स्मिता तळवलकर 
कलाकार- विक्रम गोखले , सविता प्रभुणे , अश्विनी भावे , अशोक सराफ आणि दोन बाल कलाकार 
गंभीर विषय गंभीर रीतीने कशे हाताळले जातात हे दाखवून देणारा चित्रपट
१९९१ च्या काळात पुरुषाच्या नकळत झालाल्या गंभीर चुकीला क्षमा हवी का नको यावर प्रकाश टाकणारा ..
विक्रम गोखले आणि सविता प्रभुणे यांनी केलेला अभिनय . अश्विनी भावे यांची छोटी पण प्रभावी व्यक्तिरेखा .. आणि बाल कलाकारांची  लक्षवेधी भूमिका यासाठी हा चित्रपट पाहावा.
मला हा चित्रपट कधी कधी अभ्यास म्हणून पाहावा वाटतो .. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात या चित्रपटाच्या कथा आणि त्यातील व्यक्तींबद्दल मला वेगळा दृष्टीकोन मिळाला आणी मिळत राहतो ..
असे चित्रपट विरळेच ... 

थरथराट- १९८९
दिग्दर्शक आणि निर्माता - महेश कोठारे
कलाकार - लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे , राहुल सोलापूरकर 
मसाला चित्रपटातून कसे मनोरंजन करावे हे महेश कोठारे यांना नेहमीच जमले .. आणि त्याचा उत्कर्ष म्हणजे हा सिनेमा.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची धमाल भूमिका .. आणि कॉमेडी आणि त्यात राहुल सोलापुरकारची लक्षवेधी व्यक्तिरेखा ..
तिकीटबारीवर हा चित्रपट जोरात चालला होता ..
महेश कोठारे सिनेमाचा मनमोहन देसाई सारखा एक फोर्मुला होता .. तो यात एकदम यशस्वी ..
त्यांचे बाकी चित्रपट ही अगदी याच सांगाड्यावर आधारित होते 
पण कॉमेडी किंग लक्ष्याचा सुपर स्टार जमान्याचा कल्ला चित्रपट.... 

जयदीप भोगले 
२३-०९-२०१० 

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...