Friday, July 2, 2010

मेघना


 स्वप्नातल्या प्रेम पाखरा सत्यात कधी येशील का
माझ्या मानस ललनेची प्रतिमा मूर्तिमंत कधी करशील का 

मधाल तुझा स्वर भासे
पण मजसाठी सुर कधी छेडशील का 

मयुरपंखाचे सौंदर्य तुला लाभले 
एक मोरपीस माझ्यासाठी मोड्शील का

कल्पनातीत जगात कविच विहार करतो
पण या जगात स्पर्शाचा आभाव राहतो
रातराणीच्या सुगंधाने मी मुग्ध झालो
त्याचा बहर माझ्या अंगणात कधी आणशील  का 

हाय हे स्वप्न आहे 
गोड रात्रप्रहरातुन दिवस डोकावून पाहे
त्या दिवसाच्या प्रकाशात एक सत्य भेट देशील का 

मेघांच्या या दाटित पावसाची सर लपून आहे
त्या सरीला समीर दूर नेऊ पाहे
या चाताकाच्या तृषार्ततेची मेघना बनुन येशील का 

कवी जयदीप
१५ सप्टेम्बर २००६ 

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...