Monday, July 12, 2010

मरगळलेली मालिका ..... बाजीराव मस्तानी ...

वाहिनी - इ टीवी
वेळ- ९ ते ९ ३०
कलाकार- माहिती नाहीत , ( नावात काय आहे ?)

 इ टीवि वर नुकत्याच प्रक्षेपित होणा-या बाजीराव मस्तानी   मालिके बद्दल नुकताच भ्रमनिरास  झाला .
 सुरवातिपासून बाजीराव व मस्तानी . पेशवेकालीन वैभवशाली सुवर्णयुग  याबद्दल मला कुतूहल होते आणि दुर्दैवाने त्यांच्या बद्दल विकिपीडिया  व काही  जुन्या निय्त्कालिकान्मध्ये आलेल्या  लेखांशिवाय मला फारशी माहिती सुद्धा नव्हती.म्हणुनच ही मालिका  म्हणजे मला एक पर्वणी वाटली. नितिन देसाई निर्मित असल्यामूले   मला नुकत्याच प्रदर्शित राजा शिवछत्रपति या मालिकेतला त्यानी दिलेला अनुभव आठवला अणि अपेक्षा अजुनच उंचावल्या.
आणि पहिला भाग पाहिल्यावर मला कुणीतरी उन्चावरून फेकून दिल्यासारखे वाटले.
बाजीराव इतके प्रभावी व्यक्तिचित्रण तितकेसे भूमिकेत आलेले नाही. पटकथा व संवाद हे ऐतिहासिक मालिकांचा पाया समजला जातो पण तो येथे पायमल्ली होताना दिसतो .
नेपथ्य आणि सेट्स हे राजा छ्त्रपतिचिच आठवन करून देतात कारण कदाचित देसाई नि काटकसर करून तेच सेट्स वापरून  सर्व कसर भरून काढली आहे.
एक अमराठी मुलगी मस्तानीची करत आहे आणि ती दिसण्या शिवाय सर्व ठिकाणी कमी पड़ते.
शीर्षक गीत सुद्धा शंकर महादेवन यांनी म्हणावे तसे केले नाही.
बाजिरावची कणखरता, काशी बाईंची शालीनता , मस्तानिचे सौंदर्य , चिमाजी अप्पंचा धुरंदर पणा या सर्व गोष्टी या मालिकेत एका भक्कम खांबाजोग्या वाटायला हव्या हे निर्मात्यानी ध्यानात घ्यायला हवे.  पण कदाचित आधी कलस मग पाया या तत्वाचे ते वाटतात ( उपरोधात्मक)
ऐतिहासिक मालिका ही सु संशोधित असणे ही तितकेच महत्वाचे आहे.
आज मला ही मालिका पाहताना प्रत्येक वेळी " स्वामी " ही मालिका आठवते ही खेदाची गोष्ट आहे  . क्षयाने आजारी असलेले माधवराव - रविन्द्र मंकनी, १६ वर्षांच्या रमाबाई - मृणाल देव ," नाही माधवा !!! नाही " असे म्हणणारे  राघोबा काका - श्रीकांत मोघे  , दया डोंगरे  किती आठवू  ? ही माझ्या लहानपनिची मालिका पण अजूनही लख्ख लक्षात आहे. पूर्वीची निर्मिती प्रणाली तंत्रज्ञान हे सर्व कमी दर्जाचे असून नाट्य अणि अभिनयाने निपुण मालिका किती प्रभावी ठरू शकते याचे ते उत्तम उदहारण आहे .
या सर्व टिकांचा जर कुणी विचार केला तर कदाचित आपण एक नवीन स्वामी निर्माण करू  शकू बाकी आपण प्रत्यक्ष दर्शनी हे ठरवावे .
जयदीप भोगले

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...