Friday, July 16, 2010

प्रेमिका

.
 तुझ्या समवेत सखे आयुष्याची स्वप्न पाहिली
तूच आहेस माझी प्रेमिका पहिली वहिली
      स्वप्न पाहण्यासाठी तुझ्याशिवाय पर्याय नव्हता
तू नसता जवळ माझा वेळ ही जात नव्हता 
तुझ्या सहवासासाठी दिवसाचीही  तमा न ठेविली
        स्वप्नपुर्ततेसाठी शरीराची साथ हवी होती
पण मी होतो वेडा खुळा कारण आपली प्रीत नवी होती
पाऊले पुढे टाकतानाही तुझ्या साथीची वाट पहिली 
मी एकटाच नाही तुझा दिवाणा नंतर मला जेव्हा कळाले
बंद डोळ्यांनी मला आयुष्याचे गूढ मिळाले 
आता स्वप्न दिसायची राहूनच गेली 
खडतर जगणे सामोरे ठेवून सखे तू एकटीच   निघून गेली     
 निद्रा नको कोणाची प्रेमिका
ती गोड भासे जशी नाचे क्षणभर गणिका
झटकून निद्रा पुढे पाउल टाका
हीच स्वप्नपुर्ततेची पायरी पहिली 
जयदीप भोगले 
डिसेम्बर १९९९



31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...