Monday, July 19, 2010

रुसवा

रुसण्यात काय हर्ष  आहे हसण्यात ही फसून जा

गुलाम आहे तुझाच मी  राणी पुन्हा बनून जा

आवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा
पतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा
लाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा 

विरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन  कशाला
एकाकी या जीवाला  जगण्याचे कुंपण कशाला 
एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा 

2 comments:

  1. एकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा ,
    vaa pharach chhan !
    pan shaabdik chachapani havicha kaa?

    ReplyDelete
  2. THANKS shabdik chachapni mee samajlo nahi

    ReplyDelete

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...