Thursday, July 29, 2010

सारं कसं शांत शांत

सारं कसं शांत शांत 
गोंगाटामध्ये सुद्धा निवांत
मुक्त आकाशामध्ये लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे
मंद .. पण नसे त्यास देहांत 
   सारं कसं शांत शांत 
मुबलकता नसून नव्हे कशाची भ्रांत 
पावसाच्या वेड्या चातकासारखे 
पावसाचे दोन थेंब ही पुरेसे
तहानेची नसे कसली खंत
सारं कसं शांत शांत 
तू नसून दिसे तू नखशिखांत
स्वप्नातल्या सुंदर ललनेसमान
मनाइतक्या अंतरावर
पण तुझ्या भेटीचा प्रवास आहे अनंत
सारं कसं शांत शांत 
कवितेतल्या ओळींसारखं
रेखाटतात अशक्यास
करतात निस्तेज शिशिरास वसंत
जयदीप भोगले
ऑक्टोबर २००२ 

1 comment:

  1. Chhan !
    swapanatalya sundar lalanesamaan
    Manaitakya antaravar !
    mhanje kiti?
    hi kavita mi char velaa vachali.
    Gudh vatatey pan parat parat vachavishi vatate.

    ReplyDelete

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...