Friday, July 30, 2010

जेव्हा



जेव्हा काळजाची तार कुणी छेडत
एकवाचून दुसऱ्याचं जेंव्हा अडतं
दोघांच्या नकळत हे जेंव्हा घडतं
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं
      नेमकं त्या व्यक्तीतच काय नडत
       त्याचं नावडतं सुद्धा आवडतं
ज्याच्या एका क्षणाच्या भेटीसाठी 
दिवसच्या दिवस जेंव्हा कुणी मोडतं.
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं..
रात्रभर जागरण ही घडतं 
आपल्याबद्दल सुद्धा विचार करणं कुणी सोडतं
 त्याच्या दु:खासाठी आपला आनंद जेंव्हा  ही कुणी सोडतं 
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं
      आता हेच प्रेम त्याच्याशी कधी भांडत
त्याच्याशी केलेल्या आणाभाका कधी मोडतं 
पण जेंव्हा हे उमजतं
त्याला जोडताना जगाशीही नातं जेंव्हा कुणी तोडतं
तेव्हांच प्रेमात कुणीतरी पडतं

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...