Friday, August 6, 2010

श्रावण

आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन
पाचूंच्या दागिन्याने 
धरित्रीला सजवून
लेणे हिरव्या शालुचे घेऊन

वाहू लागले ओसंडून
जलामृताचे भवन
वेड्या चातकाला सुद्धा
मिळे अमृताचे भोजन
आला मेघराजा गर्जून गर्जून
बहरून बहरून

वरुणराजा , जल हे जीवन
पण वाग जरा जपून
नाहीतर ऐकू येतील स्पंदने
जीविताची करुण 
अंध:कारच्या घरून
येईल अमृताचा प्याला 
तेव्हा हलाहल घेऊन
जयदीप भोगले
२५ ऑक्टोबर १९९८

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...