Thursday, August 12, 2010

उमेदीची शिदोरी


रडवून गेला पण तो हसवू कधी शकला नाही
दिवस गेला मावळून पण निशा कधी सरली नाही

             शारदेच्या पायावरती फूल मी वाहिले होते
             निर्माल्यात गेले अगतिक पण मला कधी उमजले नाही
उमेदीची शिदोरी घेऊन जगप्रवासास मी निघालो 
सागरात मी वल्व्ह्त राहिलो पण पाणी कधी संपले नाही
       जणू भुकेल्या मुलाच्या समाधानासाठी मनाने पाणी खुप शिजवले
जेवणाच्या आशेवर भूक माझी शमली नाही
              जीवनाच्या   गणिताची पाने मी उलटत आहे
              वजाबाकित पक्का झालो पण बेरीज कधी जमली नाही
जयदीप भोगले
२० ऑक्टोबर १९९९ 

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...