Friday, August 13, 2010

अफलातून..?? तद्दन फालतू ....

कार्यक्रम - अफलातून लिटल मास्टर्स ( म्हणजे अगोचर मूले )
वाहिनी - ई टीवी
वेळ - बुधवार गुरुवार ९.३० रात्रौ

मित्रहो कदाचित हा लेख वाचून तुम्हाला माझे ई टीवी वहिनीबरोबर वैर किवा त्या वाहिनीबद्दल तुम्हा सर्वांचे मत कलुषित व्हावे अशी इच्छा आहे असे वाटणार किवा वाटू शकते. (कारण मी बाजीराव मस्तानी बद्दल ही फार शिफारसीचे लिहिले नव्हते.).
पण राजू परुळेकरांचा संवाद , "आठवणीतले बाबूजी.. हा शो , एके काळी ताजी असणारी मालिका -या गोजिरवाण्या घरात या मला मनापासून आवडतात ..अगदी आजही... म्हणूनच दोन्ही तर्क आपण मनातून काढून टाकावेत.
मी मराठी वाहिनी पाहणारा व त्याबद्दल प्रेम वाटणारा एक दर्शक आहे. कुठलाही अ-दर्शनीय कार्यक्रम पाहून मनाला वाटणारा विषाद मी आपल्यासमोर मांडतो. किवा चांगला वाटणारा कार्यक्रम,सिनेमा आपण पाहावा त्याचा आनंद लुटावा अशी माझी इच्छा असते.
तसा अफलातून हा कार्यक्रम सुरु होऊन बरेच दिवस झाले पण सुरवातीला अगदी वाईट मत ते ही लहान मुलांच्या कार्यक्रमाबद्दल छे छे .. म्हणून मी गप्प होतो . पण आता कालच हा कार्यक्रम पहिला आणि मला राहवले नाही आणि की-बोर्ड हातात घेतला ( पूर्वी लेखणी घ्यायचो .. जरा वाक्प्रचारात बदल)
आता जरा कार्यक्रमाबद्दल बोलतो की बोलावे हे जरा कठीणच आहे पण आता मीच सांगणार म्हणजे सांगणे भाग आहे.
काही अगोचर पोरे विनोदबुद्धी नसताना उगाच स्टेजवर येऊन धुडगूस घालतात . ब-याच वेळा त्यांना काय म्हणायचे आहे हे तुम्हाला जर कळले तर मला कळवा. त्यात सूत्रसंचालन असंभव मधील सुलेखा -नीलम शिर्के आणि एका पेक्षा एक छोटे चम्पिएन्स मधील छोटी मुलगी जमेल तितके अवसान आणून स्पर्धकांना चांगले म्हणतात. आता या दोघी कॉमेडी कार्यक्रमात सूत्र संचालन कशा आणि का करतात ? झी वाहिनीवर लोकप्रिय झाल्या म्हणून कदाचित ..
इंडिअन लाफ्टर च्यालेंज चा विजेते सुनील पाल आणि प्रेक्षकाच्या हृदयात आपल्या हास्याचे हळुवार फवारे मारणारे आपले लाडके प्रशांत दामले या कार्यक्रमचे मान्यवर परीक्षक ( दुर्दैवी) आहेत . या बिचा-यांना या मुलांना काय सांगावे तेच कळत नाही . सुनील पाल (हिंदी वाहिनीवरची सवय )असल्यामुळे बेमालूमपणे हसण्याचा उत्तम प्रयोग सादर करतात. प्रशांत दामले आपण लहानपणी कसे होतो ( उत्तम) आणि इथे कुठून आलो अशा हावभावात कार्यक्रम पुढे रेटतात.
तूमची विनोदबुद्धी अगदी सढळ मराठवाडी असेल तरी आपण त्या कार्याक्रमातील विसंगती आणि उगाच टाळ्या ( आधी वाजवून घेतलेल्या ) वाजवणाऱ्या प्रेक्षकांना बघून तुम्ही हसू शकता . लहान मुलांना प्रोत्साहन द्यावे हे कबूल आहे पण ते सा रे ग म प , एका पेक्षा एक , कलर्स मधील छोटे उस्ताद यांनी ही दिले पण त्या बरोबर प्रेक्षकांना मनोरंजन अव्वल दर्जाचे मिळावे याबद्दल ही दक्षता घेतली.
कुठलाही कार्यक्रम असो त्यातला गुणवत्तेचा दर्जा अगदी.. ग्रामीण भागात आवडणारा असला तरीही, चांगलाच हवा. माझ्या मते अगदी छोट्या मुलांना सुद्धा फाजील प्रोत्साहन देण्यात की अर्थ आहे.? कदाचित वाहिनीवर येण्याचा अट्टाहास आणि त्या चंदेरी जगाचे आकर्षण असल्यामुळे काही मुले अभ्यास चांगला करत असतील ,किवा चित्र काढत असतील तरी या सवंग प्रसिद्धीच्या मागे लागतात आणि त्यांचे पालक ही त्यांचे कौतुक करतात. म्हणूनच कि काय असले दर्जाहीन कार्यक्रम आपल्याला काही वाहिन्यांवर दिसतात .
आणि मी असे ऐकले आहे या कार्यक्रमाची  टी आर पी चांगली आहे ( हा एक विरोधाभास म्हणावा लागेल .)

आता माझे मत आपल्याला आत्यंतिक वाटत असेल तर आपणच पाहून खात्री करावी आणि कळावे .

जयदीप भोगले  म

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...