Saturday, August 21, 2010

स्वप्न

चांदण्या रात्रि चंद्राच्या साक्षीने
जात होतो मी सुगंधाच्या दिशेने
मुग्ध केले होते मनाचे कोने कोने
वेडे केले रे मला एका परीने
धुंद गाण्याची मैफल ऐकू येत नव्हती
जेव्हा तिच्या प्रेमागानात मलाच साद होती
काळोखात  पाउले पुढे जात होती
जेव्हा तिची प्रेमज्योत तेवतच होती
कंटकाचा हाताना स्पर्श ही नव्हता
जेव्हा गुलाबाच्या दिशेने माझा जीव होता
सोसाट्याचा वारा धावतच होता
पण आज मात्र तो माझा नावाडी होता
भेटली ती जेव्हा माझा शोध संपला
मुखकमलाने तिच्या मुग्ध केले रे मला
प्रेमालिंगानासाठी हात पुढे ते धावले
पण हाय रे दैवा !!!! गजराच्या घंटेने स्वप्न माझे ते भंगले
 जयदीप भोगले
२० -१० - ९८

2 comments:

  1. thanks netra .. ani majha blog follow karnyabaddal suddha .. prashansebarobar teeka hi chaltil .. tymule mee kadachit ajun changle lihu shaken

    ReplyDelete

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...