Tuesday, December 28, 2010

मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग -3


आभाळमाया - ही मालिका अल्फा मराठी वरची पहिली वाहिली मालिका , अल्फा आजचे झी मराठी जे लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले कदाचित सुरवात या मालिकेने केली . या मालिकेची गम्मत म्हणजे आजकाल आपण जे मोठे स्टार झालेले कलाकार पाहतो काहीजण वयाने सुद्धा मोठे झाले असतील ते यात अगदी नवीन होते .. उद. आपला श्रेयस तळपदे उमेश कामत वगैरे ..
ही मालिका सुकन्या कुलकर्णी यांनी एकट्याने पेलून धरली होती .. प्रत्येक व्यक्तिरेखा सुरेख होती .. आणि याचे शीर्षक गीत किती चांगले आहे हे मला वेगळे सांगायची नक्कीच गरज नाही ..

अवंतिका -- अस्मिता चित्र ची अजून एक उत्तम निर्मिती .. मातब्बर कलाकार . उत्तम अभिनय आणि तितकीच देखणी अशी मृणाल कुलकर्णी .. रांगडा संदीप कुलकर्णी .. रवींद्र मंकणी , श्रेयस तळपदे, दीपा श्रीराम अशा कितीतरी मात्तबर मंडळीनी सजलेली मालिका .. उत्तम शीर्षक गीत .. गम्मत सांगतो अवंतिका अजून एका गोष्टीमुळे मला लक्षात आहे ती या मध्ये असणा-या जाहिरातीमुळे .. कदाचित वाहिनीची लोकप्रियता आभाळमाया नंतर वाढल्याची ही पावती असावी 
या गोजिरवाण्या घरात - ही मालिका मी बघायचो यातील व्यक्तिरेखांसाठी आणि शामराव म्हणजे प्रदीप वेलणकर यांच्यासाठी .. इतक्या सहजपणे ते अभिनय करायचे की अशा कडक व्यक्ती मी आपल्या आजूबाजूला पहिल्या आहेत याची प्रय्तेक वेळी जाणीव  व्हायची .. आणि या सिरीयल ची गम्मत म्हणजे आपल्याकडे दसरा की त्यांच्यकडे दसरा आणि आपल्याकडे शिमगा की त्यांच्याकडे .. फक्त मालिकांमध्ये शिमग्याशिवाय बोंब असते हे वेगळे ....
आजकाल प्रत्येक सणाला प्रत्येक मालिकेमध्ये तो सण साजरा केला जातो कदाचित मी हे निरीक्षण करायला या मालिकेपासून शिकलो
आता ही मालिका प्रचंड भरकटली आहे .. शामराव ही वयाने वाढले आहेत .. पण सुरवातीचे २ -३ वर्षे
नियमितपणे पहिली आणि आवडली. 
ना आना इस देस लाडो ..
स्त्रीभ्रूणहत्या सारखा जड विषय उत्तर भारतातील स्त्रियांची मुस्कटदाबी आणि स्त्री स्त्रीवर अन्याय कशी करते या विषयवार आधारित मालिका ..
आशय असलेल्या आणि तितक्याच तरलपणे ते हाताळून दाखवणं-या मालिका विरल्याच .. त्यातली ही एक ..
उत्तम कथानक आणि ज्वलंत विषय दैनंदिन मालिकेमधून सुरेख हाताळलेला आहे ..मेघना मलिक यांनी अम्माजी ही व्यक्तिरेखा इतकी जिवंत केली आहे की फक्त त्या व्यक्तिरेखेसाठी ही मालिका माझ्या कायमची लक्षात राहील

जस्सी जैसी कोई नाही
अग्ली बेट्टी या इंग्रजी मालिकेवर आधारित ही मालिका .. या मालिकेने मोना सिंग हिला प्रसिद्ध केले .. तिचा जस्सी चा लूक आणि जस्सी जेव्हा चष्मा काढते तेव्हाचा लूक यात मस्त शॉक होता..
नंतर मोना सिंग चे टी वी करिअर जे फुलले त्यात याचा सिंहाचा वाट आहे. सोनी ला या मालिकेने बरीच लोकप्रियता दिली रोलर कोस्टर पद्धतीने वर खाली होणे सोनीची खासियत आहे त्यामुळे आज जर सोनीवर आपल्याला काही मालिका सापडली नाही तर फार नवल करण्याची गरज नाही .



असंभव 
झी मराठी वर आलेले कदाचित मराठी दैनंदिन मालिकांमधील पहिले वाहिले रहस्यमय सीरिअल . दैनंदिन मालिकेमध्ये उत्कंठा आणि सस्पेन्स टिकवून ठेवणे कठीण आहे .. पण या मालिकेने ते चपखलपणे निभावले 
उर्मिला कानिटकर उमेश कामत ,आनंद अभ्यंकर आणि सुहास भालेकर यांचे अभिनय आणि याबरोबर सुलेखा म्हणून अत्यंत लोकप्रिय झालेली खलनायिका नीलम शिर्के या मालिकेचे वैशिष्ट्य 
शीर्षक गीत सुद्धा तितकेच चांगले होते. पण या मालिकेची कथा आणि त्याची हाताळणी यामुळेच ही जास्त लोकप्रिय झाली ..


तर मित्रांनो कशा वाटल्या मालिका .. यातल्या ७०% मालिका आपल्यालाही नक्की आवडल्याच असतील याची मला खात्री आहे.
मालिका सध्या आपल्या जीवनाचे  कमीतकमी स्त्री जीवनाचं अंग बनू लागले आहे . त्यातल्या सुख्दुख्मध्ये सामावून कुठेतरी अर्धातास करमणूक म्हणून मालिका आपल्या गृहस्थाश्रमाची मल्लिका बनली आहे हे काही खोटे नाही
आपल्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील ..

माल्मीकि बनू पाहणार 
जयदीप भोगले 

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...