Friday, January 14, 2011

नाट्य प्रभाकराचा अस्त .

.मित्रांनो इतके दिवस खूप हलके फुलके लिहले समीक्षा लिहल्या .. काल रात्री विचारात पडलो होतो कि उद्याचे पोस्टिंग काय असावे  तोच चोवीस तास वर बातमी वाचली .. के जेष्ठ नाटककार श्री प्रभाकर पणशीकर यांनी शेवटचा अंक संपवला ...अतिशय वाईट वाटले .. आणि मी विचार केला, एका कलाकाराला त्याचा कलेच्या उपासने बद्दल दिलेली मानवंदना हीच त्यांना दिलेली श्रद्धांजली होय ..
प्रभाकर पणशीकरांच्या नाट्य क्षेत्राच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या अभिनय क्षेत्राच्या कामगिरीबद्दल काही मी लिहावे बोलावे इतका मोठा मी नक्कीच नाही पण ते गेले आणि तो मी नव्हेच , इथे गवतास भले फुटतात अशी मोजकीच त्यांची नाटके माझ्या डोळ्यासमोर अवतरली ..दोन मिनिट शांतता एका कलाकाराच्या श्रद्धांजलीसाठी न वाहता आपण त्यांच्या साठी केलेला टाळ्यांचा कडकडाट , त्यांचे संवाद जेमतेम कळूनही लहानपणी  दिलेली दाद ही आठवणे म्हणजेच खरी श्रद्धांजली होय .
मला अजूनही आठवते की फिरता रंगमंच आणि त्यातून येणारे  राध्येश्याम महाराज कप्तान परांजपे असे सिनेमा पाहिल्यासारखे वाटायचे .. इतक्या लवकर ते कपडे बदलू शकत हि असतील पण इतक्या बेमालूम पणे एखाद्या व्यक्तिरेखेत शिरायचे हेच मला नवल वाटायचे .. किंवा आता मला अचंभ वाटतो .. मला आज कळत्या वयात मी तो मी नव्हेच नाट्यगृहात पाहू शकलो नाही 
याची नेहमी चुटपूट लागते .
  • भटाला  दिली  ओसरी 
  • तो  मी  नव्हेच 
  • इथे  ओशाळला  मृत्यू 
  • अश्रूंची  झाली  फुले 
  • थ्यांक यु  मि.ग्लाड 
  • जेव्हा  गवताला  भाले  फुटतात 
या सारखी एका पेक्षा एक नाटके त्यांनी केली,  यातली मी फक्त दोन पहिली .. दोन नाटकांच्या जाहिराती पेपर मध्ये नियमित वाचल्या .

नाट्यसंस्थेसाठी नाट्यसंपदा स्थापून केलेले योगदान असो, की अविरत रसिकांच्या  टाळ्याचा बालेकिल्ला सर करत केलेल्या भूमिका असोत त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांना नेहमीच सलाम.
या पोस्ट चे शीर्षक प्रभाकराचा अस्त जरी दिला असेल तरी हा सूर्य पुन्हा आपल्या केलेल्या प्रचंड कामामुळे नेहमी तळपत राहील यात शंका मुळीच नाही .

अशा थोर व्यक्तीमुळे काम करण्याची नेहमीच प्रेरणा मिळत राहील .. त्यामुळेच मी म्हणतो .. इतका थोर मी नव्हेच ... तो मी नव्हेच 
 
जयदीप भोगले

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...