Monday, February 28, 2011

अमर चित्रकथाकार .. अजरामर झाले


http://www.afaqs.com  यांच्या संकेतस्थळावरून 

 प्रसिद्ध चित्रकथाकार , अंकल पै .. म्हणजेच अनंत पै यांचे २५ फेब्रुवारी ला तीव्र हृदय विकाराने निधन झाले .. आणि त्यांनी ८१ वर्षी आपले  अमर चित्रमय जीवन यात्रा संपवली ..
अनंत पै हे भारतातील अग्रणी कथाकारांपैकी एक आणि ज्यांनी हिंदू  पौराणिक कथा , लोककथा यांना शहरी बाल गोपाळापर्यंत नेण्याचे मोलाचे कार्य केले .. आजीआजोबाना पारख्या झालेल्या नातवांना अमर चित्र कथेमधून  आपल्या संस्कृती आणि पौराणिक साहित्याचे दालन त्यांनी खुले करून दिले .इंग्रजी माध्यमाच्या प्रसरामुळे भारतीय कथा कालबाह्य होऊ लागल्या होत्या  त्यावेळी असा प्रयत्न आपल्या साहित्याबद्दल   नितांत  प्रेम असलेला व्यक्तीच करू शकतो. 
नुकताच त्यांना व्यंगचित्रकथाकाराचा जीवन गौरव पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला . पण हे कर्णाच्या औदार्याबद्दल सामान्य जणांनी कौतुक केल्याजोगेच आहे .
पै यांनी १९६७ साली इंडिअन बुक हाउस च्या सौजन्याने अमर चित्रकथा मालिका सुरु केली आणि नव्याने आपल्या थोर पुरुषांची लोक कथांची आणि पौराणिक समृद्धीची गोष्टीरूप चित्रे मुलांसमोर आणली ..
आणि या अमर चित्र कथेची संकल्पना त्यांच्या मनात येण्याची मोठी गमतीदार वाटणारी गोष्ट आहे .. एकदा पै यांनी एका क़्विज कार्यक्रमात पहिले कि मुले ग्रीक पुराणकथा आणि इजिप्तच्या लोककथांवर आधारित प्रश्न जास्त उत्तमरीत्या हाताळत होते त्याची उत्तरे देत होते आणि त्यांना भारतीय कथांबद्दल अगदीच माहिती नव्हती .. यात आपल्या कथा चांगल्या नाहीत असे नव्हे तर त्या मुलांपर्यंत पोहचत नाहीत हे  त्यांना कळून चुकले .. सर्व साहित्य बोजड आणि कादंबरीरुपात असेल तर त्याबद्दल आकर्षण हे मुलांना वाटणारच नाही आणि आपसूकच ते इतर साहित्याकडे आकर्षित होतील ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती  आणि त्यांनी पौराणिक चित्र कथांना अमर केले .
अमर चित्र कथेच्या जन्माआधी त्यांनी टाईम्स मध्ये इंद्रजाल कॉमिक्स मध्ये ही काम केले . मानव या कॉमिक्स चा प्रयत्न सुरवातीला  त्यांच्याकडून यशस्वी होऊ शकला नाही.
आता अमर चित्रकथा २० भाषांमध्ये वर्षाकाठी ३० लाख प्रती वितरीत करते नव्हे तर कदाचित किमान ३० लाख लहानग्यांना आपल्या संस्कृतीबद्दल त्यांच्या शब्दात जवळ आणण्यचे काम करत आहे ..
http://www.amarchitrakatha.com/ 
कर्नाटकात जन्मलेल्या पै यांना वयाच्या अवघ्या दुस-या वर्षी पोरके व्हावे लागले होते .. त्यामुळे आजी आजोबांच्या आणि वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीरूप कथांची मायेची उब काय असते हे त्यांना कधी समजले नाही पण त्यांनी सर्व भारतीय मुलांना ती उब ती मजा काय असते हे आपल्या अमर चित्र कथेमधून सांगितले ..
अशा महान कार्य करणा-या काकांना मानाचा मुजरा .. 
 आपल्या  सर्वाना यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती अमर चीत्र्काठेच्या  संकेत स्थळावर नक्कीच  मिळू शकेल. पण आपण अनेकदा जगातल्या पुष्कळ चांगली कार्ये  आपल्या कामाच्या रगाड्यात विसरून जातो त्यामुळे  हा लेख लिहावा असे वाटून गेले ..
      जेडी ..



Thursday, February 24, 2011

उ:शाप (कथा )

नुकताच  इंजिनीरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता  आर ई सी त्रिची मध्ये अॅडमिशन मिळाल्यामुळे जामच खुश होतो .. तसे पुण्याच्या वी आय टी मधून ती कॅनसेल केल्यामुळे पुणेरी शालजोडीतून बरेच मिळाले होते .कोथिंबीर वडी आणि मिसळ सोडून कुठे तो सांबर भात खायला जाणार आहेस .. पुणेरी मुलींची सर येणार आहे का ? वगैरे मी म्हणालो ' मायला ' तिथे कमीत कमी काळी सावळी ललना पाहायला तरी मिळेल इथल्या पुणेरी स्कार्फ मध्ये ललना आहे का .. 'चल ना' कसे कळणार त्यामुळे मला काही गम नाही
.
१९ वर्षात आल्यामुळे एखादी मैत्रीण असावी हे नेहमीच वाटे पण नेहमी मनात मांडे खाणे इतकाच धंदा ..
कॉलेज ला गेलो  काही दिवसात माझा वाढदिवस जवळ आला २३ ऑक्टोबर ... बर १९९६ मध्ये मोबाईल वैगरे विरळेच आणि असले तर कॅमुनिकेशन च्या सेमिनार मध्ये बघायला मिळायचे .. एस टी डी चे रेट अचाट असायचे त्यामुळे पत्रांची वाट पहावी लागायची .. फुटकळ कार्ड आल्यानंतर सुद्धा इतका आनंद व्हायचा  की की सांगू .....
 तर २३ ऑक्टोबर... सकाळ झाली मुलांनी विश केले . घरचे फोन येऊन गेले .. दुपारी जेव्हा जेवायला होस्टेल वर आलो तर एक ग्रीटिंग आले होते .. नाव कुणाचे नव्हते ...ग्रीटिंग उघडल्यावर सुद्धा फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या एक स्मायली काढले होते .. मला अंदाज येईना .. की माझा वाढदिवस इतका कुणाला माहिती? ...कारण लहानपणी मित्रांना जोपर्यंत माझा आज वाढदिवस आहे हे सांगितल्याशिवाय कळायचे नाही .. आणि लहान गावात ग्रीटिंग वगैरे फॅड अजून यायचे होते .. मला आठवी पर्यंत बिस्कीट चे पुडे आणि पेन्सिल याच्याशिवाय काही गिफ्ट मिळाले नाही ..आणि आज हे निनावी ग्रीटिंग .. मित्रांना खाद्य मिळाले .. एकाने मग लिंबाच्या रसाने काहीतरी त्यावर लिहले असेल इतके डोके लाऊन ग्रीटिंग अक्षरशः जाळण्याचा प्रयत्न केला ..
श्रीकांत म्हणाला लपंडाव सिनेमा सारख्या तीन फुल्या सुद्धा नाहीत आणि तीन बदाम सुद्धा ... मी म्हणालो हा सिनेमा नव्हे ..
मग सगळे करमचंद बनून ग्रीटिंग कुणाचे यावर तर्क वितर्क करू लागले ... मग निखील ने एक नामी आयडिया काढली... स्टॅम्प कुठला आहे तो पहा मग आम्ही पोस्टाच्या स्टॅम्प  शोधणे हे सर्वात अवघड काम करू लागलो ..
मग एकाने भिंग आणले आणि पुसटसे काहीतरी लातु असे काहीतरी दिसले आणि मग कळले की आपल्याच गावाहून आले .. मग उधार घेऊन रात्री १/४ चार्ज झाल्यावर मित्रांना फोन झाले पण पत्ता लागेना 
पण इतके कळले की आपण एकाच्या लिस्टवर जरूर आलो ..

मग  दिवस गेले ( दिवसामागून )  नाताळच्या सुट्ट्या मध्ये घरी आलो एका कप्यात आपल्याला ग्रीटिंग देणारी व्यक्ती कोण याचा विचार होताच ...
मग एके दिवशी एका फॅमीली फ्रेंड च्या घरी गेलो त्यांची मुलगी नुकतीच १२ वी ला गेली होती .. तिची विचारपूस आणि मग आर ई सी ला कसे जायचे ते सांगितले .. ती गालातल्या गालात हसत होती .. तिला म्हटले की की झाले मग तिने सांगितले की माझी एक मैत्रीण तुमच्या घराच्या शेजारी राहते मग मी कोण वगैरे विचारले आणि तिने सांगितले की  रीमा ... मी म्हणालो ती होय  हां .. फार घाशीराम कोतवाल आहे ती फार अभ्यास करत राहते मला आठवले की मी जितका १० वी मध्ये अभ्यास करायचो ती सातवीत करायची .. माझ्याकडे अभ्यासाला येऊन बसायची आणि मला टी वी पहा , झोप ये .. असले व्हायचे जाम राग यायचा ... 
मग तिला विचारले हं  तिचे काय ?    तिला एक मुलगा आवडतो .. मी म्हणालो आयला काय सांगतेस?
 .. मी म्हणालो ती कोणाला आवडेल? .. कारण ती अतिशय काळी होती ..तिचे लग्न होईल तिचा स्वभाव चांगला असेल वगैरे ठीक पण किशोर वयातल्या पहिल्या प्रेमासाठी तिची कुणी निवड करणे खरेच कठीण होते .. याला ' सो  मिन' म्हणा की वस्तुस्थिती  पण असेच  काही होते
ती माझी मैत्रीण वगैरे कधीच नव्हती पण शेजारी , हुशार , अति अभ्यासू ( घाशीराम ) म्हणून मला ती चांगलीच माहिती होती .. ... 
मग मिनू  ने सांगितले कदाचित तिला तू आवडतोस  म्हणजे जरा पाणी जास्तच डोक्यावरून चालले आहे .. ती वर्गात अभ्यास करत नाही . दहावीला मेरीट येऊन १२ विला चांगल्या कॉलेज ला सोड पण बी एस सी ला प्रवेश मिळणे कठीण .. मला वाईट वाटले पण वाईट वाटले तरी यात मी तडजोड नक्कीच करू शकत नव्हतो .. मला जरा हुरळून गर्व सुद्धा झाला .. की आपल्याला भाव आला वगैरे ... 
मग काही दिवसांनी मी धाडस करून तिच्या घरी गेलो .. तिच्या डोळ्यात कामातून गेल्याच्या सर्व झलका दिसत होत्या ..
मी उगीच काकू आहेत का वगैरे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला .. पण तिला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता ... तिला मी मग उसने अवसान होऊन विषय काढला .. २० व्या वर्षी असली हाताळणी करणे कठीण आहे पण मग हळू हळू तिने अभ्यासाला कशी प्रायोरिटी दिली पाहिजे वगैरे सांगितले .. तिच्या डोळ्यात पाणी आले होते .. पण मला डोक्यावरून पाणी जाताना दिसत होते .. पिच्छा सोडवायचा एवढाच विचार होता .. मन वैगरे खोली मोजलीच नव्हती .. मी तिचा निरोप घेतला . आता त्यांच्या घरी सुद्धा चुकून जायचे नाही हे ठरवले होते . एकतर्फी प्रेमाची कत्तल करून मी विजयी वीर होऊन मित्रांना पीछा छुडाया  वगैरे सांगत होतो ..
काही वर्ष लोटली .. एफ एम एस ला आलो दिल्ली मध्ये .. दिलफेक स्वभावामुळे चिकार मुली आवडल्या पण प्रेम वगैरे जमले नाही .. २५ आली होती जरा परिपक्व जालो होतो .. कुठेतरी प्रेम शोधावे म्हणून विचार करत होतो
आपण दिसायला चांगले आहोत .. हुशार आहोत बोलयला बरे आहोत वगैरे डोक्यात ठेऊन मला प्रेमाच्या दुनियेत एखादी फटाकडी नाही तर छानसी तरुणी नक्कीच भाळेल असे उगाच वाटायचे .. 
प्रेमात दिसण्याला , पैशाला , स्वभावाला काही महत्व नसते कदाचित लग्नाच्या विश्वात असेल .. हे मला कधी कळलेच नाही ...
आणि कॉलेज मध्ये एक तमिळ मुलगी मला आवडाय लागली .. ती माझी प्रोजेक्ट मेट होती नंतर आमच्या होस्टेल वर यायची आणि मग .. तीच हवी हवीशी वाटाय लागली .. मला दिसणे , स्वभाव असल्या सगळ्या गोष्टींचे हसू यायला लागले .. कारण मी गोरा ती कुरूप यात मोडणारी. मी रोड ,ती बेढब  मी शांत ती तापट असले सगळे भिन्न प्रदेश एकत्र येऊ पाहत होते .. पण मला कदाचित फक्त आमचा सहवास आमची मैत्री आमचे मनप्रत्येक गोष्ट घडल्यानंतर तिची साथ इतकेच दिसायचे .. यात शारीरिक आकर्षणाला थारा नव्हता ..
आणि एक दिवस अचानक  हळू हळू ती माझ्याशी अचानक तुटक वागू लागली .. मला कळेचना का ? मी पुष्कळ प्रयत्न केले .. पत्र जाऊन  मोबाईल चा जमाना आला होता .. कित्येक एस एम एस केले पण तिने मोबाईल उचलणे बंद केले 
मी अस्वस्थ होऊ लागलो .. आणि एकदा परीक्षेच्या दिवशी तिने मला सांगितले .. मूव ऑन यार .. तू फक्त मित्र होतास .. आणि आता  तुझ्या अशा वागण्यामुळे मला मित्र सुद्धा वाटत नाहीस .. मला तुझी भीती वाटते 
तू अभ्यासावर लक्ष दे आयुष्य तुझ्या पुढे आहे ... माझ्या डोळ्यातले पाणी आपोआप बाहेर येऊ लागले ...
मी केलेली एकतर्फी प्रेमची कत्तल आता माझच खून करू पाहत होती ..मला प्रत्येक दिवशी  तरुणपणात रंगावरून डावलून, भावनांना महत्व न देणा-या माझी आठवण झाली ..
कदाचित त्या गर्वाचा शाप मला लागला होता .. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन फक्त मनापासून प्रेम करणा-या मला अगदी तिच्यापेक्षा डाव्या मुलीकडून नकार मिळाला होता ...माझे अभ्यासातले लक्ष उडाले होते ..
पहिल्या वर्षात उत्तम कामगिरी करणारा रवी आता अस्ताला लागलेल्या सूर्यासारखा भासत होता ...माझ्याबरोबर  प्रत्येक गोष्ट जवळ जवळ रीमाबरोबर घडल्यागत होत होती ...
शाप ही संकल्पना खरी आहे का काय मला भासू लागले ... दिवसामागून दिवस लोटले ... अचानक आईने विचारले एक फोटो आहे पाहतोस का ? मुलगी छान आहे ... 
आणि काही दिवसांनी रविचे एका सुरेख   मुलीशी लग्न झाले आणि बहुतेक शापाला ... उ:शाप  मिळाला  

Thursday, February 17, 2011

प्लॅनचेट-(कथा )

या गोष्टीला एक १५  वर्ष झाली असतील ... मी इंजिनीरिंग च्या फर्स्ट इअर ला होतो .. आमचे कॉलेज एक मोठा कॅम्पस होता .. १२०  एकर चा  ..त्यावेळी रॅगिंग ही बरेच असायचे .. डिसेंबर चे दिवस 
आमचे पहिल्या युनिट टेस्ट चे दिवस होते . परीक्षा कधी असणार केव्हा होणार सर्व डेट बोर्डावर लागल्या होत्या .. आणि युनिट टेस्ट नंतर आम्हाला नाताळ च्या सुट्ट्या लागणार होत्या.
त्यावेळी इंटरनेट रिजर्वेशन वगैरे भानगड नव्हती त्यमुळे रीतसर २ तास कुरतडून ,चिडून, घामेघूम होऊन आम्ही आमची तिकिटे  १५ दिवस अगोदरच काढली होती .. नेत्रावती एक्स्प्रेस . कॉलेज ला अडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदाच घरी जाणार असल्यामुळे ते तिकीट रोज एकदा उघडून दहा वेळा पाहून पाहून होत होते .. उगाच वाटायचे की कदाचित लवकर दिवस संपतील आणि तो दिवस जवळ येईल ..असेच दिवस अभ्यासात, रॅगिंग सहन करत  मी टेस्ट ची वाट पाहत होतो .. अभ्यास करत होतो का नाही ( आठवत नाही ) न बोललेले बरे 
शुक्रवारचा दिवस तो ..  केरळ मध्ये असल्यामुळे थंडी वगैरे नव्हती पण थंड गार वारा नारळाच्या झाडांमधून येऊन ओशट वाटत होता ... आम्हाला शनिवार रविवार सुट्टी होती .. इंजिनीरिंग ची मुले अभ्यास किती करतात याची कल्पना सगळ्या इंजी नरांना  असेलच ...असो . तर आम्ही सगळी मित्र मंडळी शुक्रवार असल्यामुळे एकत्र  ३२४ रूम मध्ये होतो .. मी निखील श्रीकांत गौरव सुनील कश्यप आणि हं संतोष असे सगळेजण गप्पा मारत बसलो होतो .. सुरवातीला रॅगिंग,नंतर येणारे सिनेमे , डंब शेरॅट आणि हळू हळू रात्र झाल्यानंतर मुलांचा आवडीचा विषय ( मुली नाही ) भुतांच्या गोष्टी चालू झाला . मग राजस्थान मध्ये दुधू च्या हाय वे वर कसे चकवे असतात 
भानामती, करणी, आजोबांच्या भूत पाह्लेल्या दंत कथा याला उत येऊ लागला.
 हळू हळू .. सगळेजण जवळ जवळ सरकून हळूच शालीमध्ये शिरून आखडून घेऊन सगळ्यांची हवा टाईट होते आहे हे दाखवू लागली ..
मग मधेच मुन्नालाल मीना एकदम रात्री १.३० वाजता अळोके पिळोखे देत रात्री उठला आणि त्याने आमच्या रूममध्ये डोकावून त्याच्या टिपिकल स्टाइल मध्ये विचारले  ' आज सोना नाही क्या .. ये घाटी लोग बडे पढ रहे है .. ..मग संतोष ने एक शिवी हासडत त्याला सांगितले. हमने किताब क्या ?  फुल्या फुल्या ...xxx .. तो  रात्री ज्या कारणाने उठला होता त्यासाठी तडक बाथरूम च्या दिशेने पळाला.. एक हशा पिकला.
मग एक विषय निघाला प्लानचेट .. त्यावर चर्चा झाली .. श्रीकांत नागपुरी भाषेत' साले मजाक मत करो इधर पहले ही कबसे मुतने जाना है लेकीन जा नाही राहा हु' मग त्याला फट्टू वगैरे चिडवून झाले .. सगळ्यांनी मग उसने अवसान आणून सार्वजनिक मुत्र विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला .. आणि रूम मध्ये येताच  लाईट गेले      
केरळ मध्ये पावर कट नेहमीचे होते पण आजचा पावर कट जरा जास्तच सिचुएशन ला साथ देणारा होता . मग निखील .. " शीट यार मेरेको पढने का था " तितक्यात गौरव डोक्यावर मेणबत्ती घेऊन " कही दीप जले कही दिल  करत आला .. आणि मग संतोष ने एक बॉम्ब टाकला .. तुम्हाला माहित आहे मला प्लॅनचेट  येते? .. मग थोडा हशा .. कोणी... सही मे? क्या ?मजाक मत कर... असे सर्व उद्गारवाचक प्रश्न चिन्ह दाखवीत सगळेच अचंभित झाले होते 
मग त्याने एक कॉईन आणले एका पेपरवर ए ते झेड  अक्षरे १ ते ९ आकडे  एका ठिकाणी येस एका ठिकाणी नो असे काढून एक पट तयार केला .. सगळ्यांना हे नवीन होते  त्यामुळे त्याला हे जमते हे हळू हळू वाटायला लागले होते. मग ती मेणबत्ती पटाच्या मधोमध ठेऊन तो डोळे मिटून कॉईन वर हात ठेवून ध्यान धरून बसला .. सगळे शु शु करत गप्प बसून अंधुक प्रकाशात तो अनुभव घेऊ लागले .. २.३० वाजले होते 
मग अचानक संतोष चा हात लवकर लवकर फिरू लागला .. कदाचित कोणी तरी स्पिरीट आले होते वाटते ..
मग त्याने सांगितले तुझे नाव सांग ... त्याने ...हळू हळू एका एका अक्षरावर नाणे नेऊन सांगायला सुरवात केली 
त्याचे नाव अनप्पा आहे हे कळले ..आम्हाला वाटले केरळ मध्ये पंजाबी भूत थोडीच येणार .. ट्रेन चे तिकीट तर मिळायला हवे ना ... 
मग संतोष म्हणाला  आता याला हवे ते विचार मग आम्ही हळू हळू आम्हाला जी माहिती आहे ते विचारायला चालू केले आणि ब-याच वेळा उत्तर खरे येऊ लागले .. आम्हाला आश्चर्य आणि भीती एकत्र वाटू लागली 
मग आम्ही उगीच त्याला जे आम्हाला नक्की माहिती आहे ते विचारावे आणि भुताची परीक्षा घ्यावी असे ठरवले ...
मी आणि श्रीकांत यांनी हळूच म्हटले याला विचारू आम्ही घरी कधी जाणार? .. १७ डिसेंबर ची तिकिटे झालेली होती १७ ला टेस्ट संपणार होती तरीही विचारले ..
त्याने हळू हळू कॉईन फिरवायला चालू केली .. आकड्यावर कॉईन आली .. १ आणि नंतर मी कंटाळलो म्हणून उठायला लागलो तोच श्रीकांत म्हणाला अबे ये ३ पे क्यो आ रहा है ? 
त्याच्या मते आम्ही १३ ला घरी जाणार होतो .. पण परीक्षा १३ ला चालू होणार तर कसे १३ ला जाणार बर सर्व मुले मध्यमवर्गातून असल्यामुळे टेस्ट नक्कीच देणारी होती .. आम्ही पुन्हा एकदा विचारले तरीही तेच उत्तर आले १३ डिसेंबर .. चार वाजले होते .. सुनील पेंगाय लागला होता .. संतोष म्हणाला अरे स्पिरीट गेले चार वाजल्यानंतर ते थांबत नाही .. गौरव म्हणाला... क्यो उसको  ३.५६  दादर लोकल  पकडना रहता है भाजी बेचने ? संतोष म्हणाला मैने ऐसेही सिखा है  मानना है तो ठीक .. 
मग सगळे त्याचा विचार करत करत कधी झोपलो कळले नाही .. हळू हळू दिवस लोटले .. टेस्ट जवळ आली होती .. पहिलीच परीक्षा असल्यामुळे उत्कंठा आणि भीती दोन्हीही होती ..
सिनिअर- ' फेल हो गया तो बहुत पिटेगा अशी दमदाटी करून अजून टेन्शन देत होते .
. १३ डिसेंबर आला ... पहिला पेपर मेकॅनिक्स होता पेपर बरा होता ..पास नक्की होऊ खात्री झाली .. पेपर १२ वाजता संपणार होता ..
मी १५ मिनिटे लवकर पेपर दिला आणि होस्टेल वर येत होतो .. अचानक दोन तीन मुले होस्टेलच्या जिन्यावर पळताना दिसली .. लगबग नेहमीची नव्हती .. मी सुद्धा वर पळालो आणि १०- १२ मुले ३३३ रूम च्या समोर उभी होती मी पळालो .. पहिले ते दृश्य ना विसार्ण्यासारखे आणि भीषण होते .. एक मुलगा पंख्याला लुन्गीने लटकला होता जीभ बाहेर आली होती .. होस्टेल वार्डन  सुद्धा पळत आले सगळयांना त्यांनी हाकलायचा प्रयत्न केला  पण कुणीही  जागचे हलले नाही . मी थोडे पुढे जाऊन पाहिले की कोण मुलगा आहे आणि धक्का बसला .. माझ्या शेजारी , बेंच वर बसणारा अजित नावाचा मल्याळी मुलगा होता .. त्याने लटकून आत्महत्या केली होती.
त्या नंतर त्याच्या खोलीत असणा-या दोन रूममेट ना हलवण्यात आले .. त्या रूम मध्ये उदबत्त्या लावल्या होत्या ..त्या उदबत्त्याचा वास मला अजूनही काटा आणतो 
हळूच सगळी मुले होस्टेल वर आरडा ओरडा करायला चालू झाली की आम्हाला इथे राहाचे नाही .. परीक्षा पुढे ढकला आमची मनस्थिती ठीक नाही .. मग प्रीन्सिपोल आले आणि त्यांनी परीक्षा पुढे ढकलून नाताळच्या सुट्टीनंतर ५ जानेवारीला ठेवल्या ..
सगळे जन ब्यागा  भरून तयार झाले होते .. दुपारी ३ वाजेपर्यंत जवळ जवळ सर्व होस्टेल रिकामे झाले होते .. आम्ही आमचे १७ तारखेची तिकिटे कॅनसेल करून जनरल डब्यात बसून नेत्रावती एक्स्प्रेस ने प्रवास चालू केला
आम्ही सगळे त्या प्लॅनचेट च्या भुताच्या भाकीतामुळे सुन्न झालो होतो .. त्याची भुताटकी कुणाचा प्राण घेऊन आम्हाला घरी पाठवणार होती हे कळले असते तर कदाचित हे कधीच होऊ दिले नसते .
संतोष अचानक म्हणाला यार गलती झाली ... मी प्लान चेट चे नाटक केले होते त्या दिवशी भूत फीत कोणी आले नाही .. मला माहित होते की आपण १७ ला जाणार म्हणून मी १३ ही तारीख ठोकून दिली होती ...
मग बाकीची उत्तरे?? .. बस  क्या यार आपण दोस्त लोक ना आपल्याला एकमेकांच्या गोष्टी माहित नसतात का.. हसावे का रडावे तेच कळेना ..  
या अगम्य जगात बरेच योगायोग होतात तसा हा भयानक योगायोग झाला होता .. मला राहून राहून अजित त्याचे पालक , परीक्षांचे टेन्शन का अजून काही असे अनेक प्रश्न येत होते...
थोड्याच वेळात सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या चालू केल्या ... ' आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू ' आणि आमच क्षणिक सुतक मागे पडले ...

.जयदीप भोगले
.


Monday, February 14, 2011

बकुळीची फुले


तुझ्या डोळ्यांच्या दुनियेत आज मला सगळे विसरावे वाटते
आठवलेच तर आपल्या पहिल्या भेटीच्या आईसक्रीम ची चव अनुभवावी वाटते
क्षण न क्षण नेहमीच अवीट  राहिला 
तू जवळ नसताना सुद्धा श्वास तुझाच राहिला
माझ्या रागाला तुझ्या प्रेमाची फुंकरच  आवरू शकेल
तुझ्या किनाराच  माझ्या मुक्त लाटेला  सावरू शकेल 
आज ना ती  सुवासिक बकुळीची फुले नाहीत  गुलाब आणले 
बस हृदयातील  दोन शब्द कवितेत माळून तुला वाहिले 

जयदीप भोगले
१४.०१.२०११ 

Friday, February 11, 2011

स्वप्नाचे कल्पनेला पत्र


लाडके 
चिरायू राहा, तुझ्याच अस्तित्वाने माझे जग आहे .. तूच माझ्या मृतिक्केत रंग पेरले आहेस ..एक स्वप्न डोळ्यात रंगते आहे  एक आशा पापणीत जगते आहे .
मला खात्री होती तू माझे ऐकशील ..कदाचित माझ्या आगीत तितकी धग होती 
सखे तू  माझ्या साक्षीस रहा माझी कहाणी तुझ्या शब्दात वहा.... माझे नेहमी ऐकलेस कधी आपल बोलून पहा 
किती रिक्त चेह-यांना तू प्रभा दिलीस .किती निद्रस्थ मनांना तू पंचमाची साथ दिलीस . किती भुक्त कायांना  जाणीवेची कात दिलीस .
तर काय झाले जर कोणी सोबत नाही. असेही नाही कि कुठल्या आशेचा हात नाही .तुझ्या काळजापेक्षा दुसरे काही खास नाही .  
माझ्या घरट्यात ये हवे ते तुझे आहे 
सत्याशिवाय इथे सर्व काही स्वर्गसुख आहे .ही कल्पनेची नगरी आहे ..इथे सार-याची यारी जिगरी आहे .
 इथे थोडा वेळ पहुडून जा एक मैफल दिवाणी जगून जा . काही तुझ्या बाजूचे तरंग असतील तर तिच्या पासून लपून जा ..
सुटून जाईल प्रीतीचे मळभ अचानक  विखरून जाईल स्वप्नाचा पहारा 
. नजरेच्या प्रत्येक कटाक्षात तूच दिसतेस .. मनातली प्रत्येक गोष्ट तूच जाणतेस .
अजून एक करशील एकटे मन दिसले तर वेडे पिसे समजू नको ..अजाण त्या मनाला जाणूनबुजून टाळू नको
आशा गप्प असेल पण मनात सुखरूप असते .. सावलीला सुद्धा भिऊन नेहमी गप्प राहते,
  आता तुला  त्यात एक घरकुल थाटायचे आहे आशेच्या या कट्ट्याला सुगंधी करायचे आहे.
मी काही स्वप्न रंगवली होती जेव्हा दूर दूर पर्यत आपली अशी कुणी नव्हती ..तेव्हा तू एक चित्र रेखाटले होतेस ते आपले समजून मी  मनात टांगले होते . 
कित्येक क्षण तुझ्या समवेत ते चित्र न्याहाळत माझे  हास्याचे रंग कुंचल्यात भरत मी विसरलो कि ते चित्र तुझेच होते .
 पण मन माझे वेडे कोकरू  अडखळले कधी कधी लागे बावरू ..
पण एक उपकार आहे माझ्यावर माझे डोके होते नेहमीच तुझ्याच खांद्यावर .. आता बावरून सखे साथ कधी सोडू नको ..
एवढेच सांगतो तुला  तू आणि मी हीच साथ खरी आहे . बांधू एक बांध  आता कारण  आपल्यामध्ये दरी आहे .

मित्रांनो , काही ब्लॉग वाचता वाचता अचानक एक छान कल्पना वाचण्यात आली .. उर्दू होती .. जुबां ए गोया म्हणून ब्लॉग आहे त्याचे रसग्रहण करून काहीतरी चितारले आहे .. त्या कल्पनेचे आभार .
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या 


जयदीप भोगले 
११.०२.११ 

वादा


वादा है अपने आप से एक वादा ना तोडना है
झूठा ही सही दिल से एक वादा जरूर करना है

चेहरे की कसक से खींच गए हम एक भंवर में 
भीगा ही सही बहाव को एक साहिल से अब जोड़ना है

पत्थर और फूल को एक तराजू में तोलने का गजब हम से हो गया
शीशे को आईने में बदलेंगे ऐसा सबब कुछ करना है

अब वादा एक सच है या इस ख्वाब को तोड़ देना है
रगों में बहता है जो खून उसी को बस एक शायरी में बदलना है

जयदीप भोगले
१०/०२/२०११ 

Wednesday, February 9, 2011

चेहरा



सावालीसम  बदलून जाई
कधी तेजात कधी तमसेत न्हाई 
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

        नात्यांच्या कधी बंधनात
कधी माणुसकीच्या कोंदणात 
ख-या खोट्याच्या तराजूत जेव्हा 
मन तो तोलून पाही.
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

स्मित आणि हास्य पाहावे
कधी अश्रुंचे दास्य सहावे 
फुल आणि काट्यात अलगद
सुगंधात तो हरवून जाई 
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

दर्पणात  कधी  बिम्बित होऊन
 चेहरा कधी स्वतःला न्याहाळी
मुखवट्यात मी का हरवलो? 
का नशीब असे हे आपुले भाळी 
पाठ फिरवून पुन्हा नव्याने
नवा मुखवटा उचलून घेई
मुखवट्याच्या दुनियेत अचानक
चेहरा हा हरवून जाई 

जयदीप भोगले
९/०२/२०११


31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...