Monday, February 28, 2011

अमर चित्रकथाकार .. अजरामर झाले


http://www.afaqs.com  यांच्या संकेतस्थळावरून 

 प्रसिद्ध चित्रकथाकार , अंकल पै .. म्हणजेच अनंत पै यांचे २५ फेब्रुवारी ला तीव्र हृदय विकाराने निधन झाले .. आणि त्यांनी ८१ वर्षी आपले  अमर चित्रमय जीवन यात्रा संपवली ..
अनंत पै हे भारतातील अग्रणी कथाकारांपैकी एक आणि ज्यांनी हिंदू  पौराणिक कथा , लोककथा यांना शहरी बाल गोपाळापर्यंत नेण्याचे मोलाचे कार्य केले .. आजीआजोबाना पारख्या झालेल्या नातवांना अमर चित्र कथेमधून  आपल्या संस्कृती आणि पौराणिक साहित्याचे दालन त्यांनी खुले करून दिले .इंग्रजी माध्यमाच्या प्रसरामुळे भारतीय कथा कालबाह्य होऊ लागल्या होत्या  त्यावेळी असा प्रयत्न आपल्या साहित्याबद्दल   नितांत  प्रेम असलेला व्यक्तीच करू शकतो. 
नुकताच त्यांना व्यंगचित्रकथाकाराचा जीवन गौरव पुरस्कार दिल्ली येथे देण्यात आला . पण हे कर्णाच्या औदार्याबद्दल सामान्य जणांनी कौतुक केल्याजोगेच आहे .
पै यांनी १९६७ साली इंडिअन बुक हाउस च्या सौजन्याने अमर चित्रकथा मालिका सुरु केली आणि नव्याने आपल्या थोर पुरुषांची लोक कथांची आणि पौराणिक समृद्धीची गोष्टीरूप चित्रे मुलांसमोर आणली ..
आणि या अमर चित्र कथेची संकल्पना त्यांच्या मनात येण्याची मोठी गमतीदार वाटणारी गोष्ट आहे .. एकदा पै यांनी एका क़्विज कार्यक्रमात पहिले कि मुले ग्रीक पुराणकथा आणि इजिप्तच्या लोककथांवर आधारित प्रश्न जास्त उत्तमरीत्या हाताळत होते त्याची उत्तरे देत होते आणि त्यांना भारतीय कथांबद्दल अगदीच माहिती नव्हती .. यात आपल्या कथा चांगल्या नाहीत असे नव्हे तर त्या मुलांपर्यंत पोहचत नाहीत हे  त्यांना कळून चुकले .. सर्व साहित्य बोजड आणि कादंबरीरुपात असेल तर त्याबद्दल आकर्षण हे मुलांना वाटणारच नाही आणि आपसूकच ते इतर साहित्याकडे आकर्षित होतील ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती  आणि त्यांनी पौराणिक चित्र कथांना अमर केले .
अमर चित्र कथेच्या जन्माआधी त्यांनी टाईम्स मध्ये इंद्रजाल कॉमिक्स मध्ये ही काम केले . मानव या कॉमिक्स चा प्रयत्न सुरवातीला  त्यांच्याकडून यशस्वी होऊ शकला नाही.
आता अमर चित्रकथा २० भाषांमध्ये वर्षाकाठी ३० लाख प्रती वितरीत करते नव्हे तर कदाचित किमान ३० लाख लहानग्यांना आपल्या संस्कृतीबद्दल त्यांच्या शब्दात जवळ आणण्यचे काम करत आहे ..
http://www.amarchitrakatha.com/ 
कर्नाटकात जन्मलेल्या पै यांना वयाच्या अवघ्या दुस-या वर्षी पोरके व्हावे लागले होते .. त्यामुळे आजी आजोबांच्या आणि वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीरूप कथांची मायेची उब काय असते हे त्यांना कधी समजले नाही पण त्यांनी सर्व भारतीय मुलांना ती उब ती मजा काय असते हे आपल्या अमर चित्र कथेमधून सांगितले ..
अशा महान कार्य करणा-या काकांना मानाचा मुजरा .. 
 आपल्या  सर्वाना यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती अमर चीत्र्काठेच्या  संकेत स्थळावर नक्कीच  मिळू शकेल. पण आपण अनेकदा जगातल्या पुष्कळ चांगली कार्ये  आपल्या कामाच्या रगाड्यात विसरून जातो त्यामुळे  हा लेख लिहावा असे वाटून गेले ..
      जेडी ..



No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...