Friday, February 11, 2011

स्वप्नाचे कल्पनेला पत्र


लाडके 
चिरायू राहा, तुझ्याच अस्तित्वाने माझे जग आहे .. तूच माझ्या मृतिक्केत रंग पेरले आहेस ..एक स्वप्न डोळ्यात रंगते आहे  एक आशा पापणीत जगते आहे .
मला खात्री होती तू माझे ऐकशील ..कदाचित माझ्या आगीत तितकी धग होती 
सखे तू  माझ्या साक्षीस रहा माझी कहाणी तुझ्या शब्दात वहा.... माझे नेहमी ऐकलेस कधी आपल बोलून पहा 
किती रिक्त चेह-यांना तू प्रभा दिलीस .किती निद्रस्थ मनांना तू पंचमाची साथ दिलीस . किती भुक्त कायांना  जाणीवेची कात दिलीस .
तर काय झाले जर कोणी सोबत नाही. असेही नाही कि कुठल्या आशेचा हात नाही .तुझ्या काळजापेक्षा दुसरे काही खास नाही .  
माझ्या घरट्यात ये हवे ते तुझे आहे 
सत्याशिवाय इथे सर्व काही स्वर्गसुख आहे .ही कल्पनेची नगरी आहे ..इथे सार-याची यारी जिगरी आहे .
 इथे थोडा वेळ पहुडून जा एक मैफल दिवाणी जगून जा . काही तुझ्या बाजूचे तरंग असतील तर तिच्या पासून लपून जा ..
सुटून जाईल प्रीतीचे मळभ अचानक  विखरून जाईल स्वप्नाचा पहारा 
. नजरेच्या प्रत्येक कटाक्षात तूच दिसतेस .. मनातली प्रत्येक गोष्ट तूच जाणतेस .
अजून एक करशील एकटे मन दिसले तर वेडे पिसे समजू नको ..अजाण त्या मनाला जाणूनबुजून टाळू नको
आशा गप्प असेल पण मनात सुखरूप असते .. सावलीला सुद्धा भिऊन नेहमी गप्प राहते,
  आता तुला  त्यात एक घरकुल थाटायचे आहे आशेच्या या कट्ट्याला सुगंधी करायचे आहे.
मी काही स्वप्न रंगवली होती जेव्हा दूर दूर पर्यत आपली अशी कुणी नव्हती ..तेव्हा तू एक चित्र रेखाटले होतेस ते आपले समजून मी  मनात टांगले होते . 
कित्येक क्षण तुझ्या समवेत ते चित्र न्याहाळत माझे  हास्याचे रंग कुंचल्यात भरत मी विसरलो कि ते चित्र तुझेच होते .
 पण मन माझे वेडे कोकरू  अडखळले कधी कधी लागे बावरू ..
पण एक उपकार आहे माझ्यावर माझे डोके होते नेहमीच तुझ्याच खांद्यावर .. आता बावरून सखे साथ कधी सोडू नको ..
एवढेच सांगतो तुला  तू आणि मी हीच साथ खरी आहे . बांधू एक बांध  आता कारण  आपल्यामध्ये दरी आहे .

मित्रांनो , काही ब्लॉग वाचता वाचता अचानक एक छान कल्पना वाचण्यात आली .. उर्दू होती .. जुबां ए गोया म्हणून ब्लॉग आहे त्याचे रसग्रहण करून काहीतरी चितारले आहे .. त्या कल्पनेचे आभार .
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्या 


जयदीप भोगले 
११.०२.११ 

2 comments:

  1. खरंच खूप मस्त! फारच सुंदर लिहिलेलं आहे! तुमचं बाकीचंही लेखन अप्रतिम आहे!

    ReplyDelete
  2. आदित्य आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
    वाचत राहा

    ReplyDelete

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...