मला वाटते असे करावे
सवयीला फासावर द्यावे
गुन्हेगार ती माझ्यापेक्षा ,
एकटेच मी का मरावे
जर मी अपराधी बेधुन्धीचा
मग पाण्याने सुरा का बनावे
देव म्हणतो श्रद्धा ठेवा
मग दगडात त्याने का लपावे
मीरेला जर विष देती दुनिया
कृष्णा तुझसी का पूजावे
सवाल माझा सवयीला या,
श्वासाला का सवय म्हणावे ?
असेल जर ती सवय जगाची
श्वास आणि जग मग बंद पडावे .
मला वाटते असे करावे
सवयीला फासावर द्यावे
जयदीप भोगले
१५.१२.२०११