मृगजळाच्या या वाटेवरती तृषार्त मी राहिलो
उजेडाच्या भ्रमात जणू मी अंधारात नाहलो
त्या क्षणांची वाट पाहुनी दिवस असे लोटले
आयुष्य पुढे निघून गेले मी मागे राहिलो
गुलाब तो मग काटे सुद्धा असतील हे मी जाणिले
सुवासाच्या शोधात जणू मी कस्तुरीमृग जाहलो
मृगजळाचा भास होता आता मी जाणिले
डोळ्याच्या भोवऱ्यात अडकून मी अश्रूत मी वाहलो
जयदीप भोगले
२२ फेब्रुवारी 2012
No comments:
Post a Comment