Friday, October 12, 2012

अचानक

अचानक
डोळ्यांची साथ आज नसणार अचानक
मनाच्या सफरेची वाट संपणार अचानक
गाठ पडली स्वप्नात अलवार जरीही
पहाटेच्या हाकेने रात्र सरणार अचानक

रेशमी केसांचा ढग का जाई अचानक
हास्याचा पुष्कर जसा विरतो अचानक
इशाऱ्यांची भाषा उमजली जरीही
निरोपाचा शब्द का खटकतो अचानक

या नात्याचा शोधू नको किनारा सखे तू
नाव माझी दर्यात तुला दिसेलही अचानक
खलाशी मी असे स्वप्नातल्या जगाचा
पुनवेची लाट सांगेल माझी खुशाली अचानक

भेट ही अचानक विरह ही अचानक
शेवटच्या गावी का झाली सुरवात ती अचानक
शब्दाची भरती आता ओसरे जरीही
भावनांची लाट तरी उचंबळते अचानक

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...