साहित्य

बिंब आणि प्रतिबिंब

My photo
जे डी म्हणजे जयदीप, माझ्या या वाडीत कविता कथा समीक्षा परीक्षा याची आहे ही पोतडी. मी एक मार्केटिंग चा कार्यकर्ता अणि मराठीप्रेमी गडी. माझी वाडी ही मराठवाडी आवडेल तुम्हाला थोड़ी थोड़ी

Tuesday, February 26, 2013

अवधूत गुप्तेची ची ओपन हार्ट हाताळणी ...खुपते तिथे गुप्ते


कार्यक्रम-खुपते तिथे गुप्ते
वाहिनी-झी मराठी
वेळ- बुधवार गुरुवार ९.३०
पहावा का नाही- न चुकता  पहाणे
मित्रांनो, माझा आवडता छंद चांगले कार्यक्रम ऐकणे आणि पहाणे. ( आणी त्यावर लिहून आपले मत ठोकून देणे J)
झी मराठी वर सुरु असणारा खुपते तिथे गुप्ते त्यातलाच एक ...
तसा हा या कार्यक्रमाचा ३ रा सीजन आहे बहुतेक . हिऱ्याला जसे पैलू पडावेत, चंद्र जसा कलाकलाने अधिक सुंदर व्हावा किंवा आपली आवडती मैत्रीण किशोर वयातून तारुण्यात येताना अधिक सुंदर आणि अधिक हवी हवीशी वाटावी या प्रमाणे हा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक हवा हवासा वाटतो आहे .
मुलाखतवजा ग्रेट भेट , संवाद , Rendezvous अशा कार्यक्रमच्या यादीत हा कार्यक्रम कधी जाऊन बसला ते कळलेच नाही . मार्केटिंग च्या भाषेत आपण यादीत जाऊन सुद्धा आपल (positioning ) वेगळे ठेवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि ते या कार्यक्रमाचे यश आहे असे मला वाटते.
हा कार्यक्रम पाहताना मला तराजू आठवतो ... दोन पारड्यात दोन तितकीच तुल्यबळ व्यक्तिमत्व असूनही पारडे कधी इकडे झुकवावे आणि कधी तिकडे अशा वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने गुप्ते साहेब कार्यक्रम हाताळत असतात.
अवधूत गुप्ते तर माझ्यासाठी हा एक प्रवास आहे . झी च्या पहिल्या सारेगामा च्या पर्वा पासून ते खुपते तिथे गुप्ते च्या तिस-या पर्वापर्यंत त्याच्यातील परीपक्वता उतरोत्तर वाढत गेली पण मिश्कीलपणा कुठेच कमी झाला नाही . मला judge म्हणून त्यांनी मारेलेल्या “ टांगा पलटी घोडे फरार” सारख्या नवीन ट्रेडमार्क कमेंट आणि खुपते तिथे मध्ये आपल्या समोरच्या व्यक्तीच्या वयाला अनुसरून त्यांच्या आयुष्याची काही पाने चाळण्याचा प्रयत्न दोनीही तितक्याच अभिनव आणि “ अवधूत” ब्रान्ड वाटतात
कार्यक्रमाची भक्कम बाजू अवधूत असल्यामुळे मुलाखती साठी समोर कोण आहे याला फार महत्व द्यावे असे वाटलेच नाही. करोडपती मध्ये जसा अमिताभ , वहिनी  कुठलीही असो समोर आदेश भौजी असले की प्रत्येक वहिनी मनमोकळ्या गप्पा मारणारच.... तसेच अवधूत दादा, विनय आपटे असो की की फटाकडी सोनाली कुलकर्णी . प्रतेयक संवाद तितकाच मुलखात देणाऱ्या पाहुण्याच्या  रंगात रंगून जातो.
कार्यक्रमात नेहमीच सांगितल्याप्रमाणे त्यांचा जादूचा फोन ही या कार्यक्रमाची खासियत ...
मग रोहिणी हत्तंगडी यांचा कस्तुरबा गांधी बरोबर झालेला फोन की अजून कोणाचा प्रत्येक फोन तितकाच वेगळा.
मास्क सिनेमा मध्ये जसा मास्क हा फक्त मास्क लावणाऱ्या व्यक्तीसारखा वागतो ,फक्त अधिक उजळ अधिक जादुई ...तसेच खुपते मधला सेलिब्रिटी…. 
 जसा आहे तसाच समोर येतो, फक्त…  अधिक उजळ होऊन
कार्यक्रमाचा वाद्यवृंद उगाच जिथे तिथे म्युझिक वाजवू पाहत नाही ही सुद्धा जमेचीच बाजू
हिंदी सारेगामापा चा विजेता जसराज जोशी याच कार्यक्रमात चमकून गेला होता
दाटून कंठ येतो हे गाणे त्याने इतके भावपूर्ण म्हटले होते की फयाज यांच्या डोळ्यात कधी पाणी आले व आमच्या आईच्या सुद्धा कळलेच  नाही .
थोडक्यात आजकालच्या predicted जगात काहीतर न ओळखता येणारे कार्यक्रम कमीच. यात हा कार्यक्रम नक्कीच गणता येईल
सो ... हृदयाला भिडणारा संवाद आणि थेट हृदयप्रिय कलाकारांबरोबर म्हणूनच म्हणतो हे काही जणू नाजूक ओपन हार्ट करण्याजोगे आहे ..
तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण..... पहायला विसरू नका J
  
जयदीप भोगले
२६ . २. २०१३ 2 comments:

  1. madhali sutti ha suddha ek chan karyakram aahe.

    ReplyDelete
  2. अवधूत नक्कीच चांगला इंटरव्ह्यु घेतो, वागळे पेक्षा नक्कीच हजार पटीने चांगला.

    ReplyDelete

Labels

;बीडच्या (1) calculation (1) channel (1) reebok (1) TV (1) valentine day (1) अतुल परचुरे (1) अँधेरा (1) अनकही (1) अनंत पै (1) अनुभव (1) अप्सरा (1) अफलातून (1) अमर चित्रकथा (1) अमिताभ बच्चन (1) अर्बन जंगल (1) अलवार (1) अल्प (1) अवधूत गुप्ते (1) अश्विनी भावे (1) असंभव (1) असूया (1) आई (1) आगगाडी (1) आम्ही सारे खवय्ये (1) आय बी एन लोकमत (1) आर ई सी (1) आशिक (2) आसवे (1) आस्था (1) इ टीवि (1) इ टीवी (2) इंजिनीअर (1) इटालियन (1) इंतज़ार (1) इतिहासात (1) इन्द्रधनुष (1) इरूवर (1) इश्क (1) उ:शाप (1) उंच माझा झोका (1) उदासी (1) उमेदिची शिदोरी (1) उलझन (1) ओगले (1) ओम भूतकर (1) कटी पतंग (1) कट्यार (1) कथा (3) कथानक (1) क़यामत (1) करोडपति (1) कलम (1) कविता (79) कविता;मराठी;रोझ रोमिओ; जयदीप भोगले (1) कविता;मराठी;शहीद; PAT; जयदीप भोगले (1) कसक (1) कस्तुरीमृग (1) कांटो (1) कातरवेळ (1) कामगार (1) कामवाली बाई (1) कारवाँ (1) कालचक्र (1) काळोख (1) काहे दिया परदेस (1) कीमत (1) कुदरत (1) कूर्ग (1) केरळ (1) कॉफी (1) कोहरा (1) क्षण (1) ख़याल (1) ख़ाक (1) खानाबदोश (1) ख़ामोशी (1) खुशियाँ (1) गणिताची (1) गणेश (1) गणेशवंदन (1) गालिब (1) गिरिजात्मज (1) गुलाबी हलचल (1) गुलाम (1) ग्रेट भेट (2) चतुरंग (1) चंद्र (1) चांदनी (1) चिंतामणी (1) चित्र (1) चित्रकार (1) चित्रपट (5) चेहरा (1) जबरदस्त (1) जम्बो वडापाव (1) जय मल्हार (1) जयदीप (1) जयदीप भोगले (6) जयदीप भोगले (110) जयदीप भोगले अश्क (1) जाऊ द्या ना बाळासाहेब (1) जाऊ बाई जोरात (1) जासुसगीरी (1) जाहिरात (1) जिंदगी (2) जिन्दगी (2) जी एम डायट (1) जीवनसंध्या (1) जेडी (1) झी मराठी (11) टी वी (1) डायटींग (1) डॉल्बीवरून (1) डोळ्यांच्या (1) तंत्रज्ञान (1) तरला दलाल (1) तरस;गिधाडे;अभयारण्यात ; कविता (1) तराजू (1) ताराबाई (1) ती सध्या काय करते (1) तुळजाभवानी (1) तू (1) तूफ़ान (1) तेजाब (1) तेंडूलकर आउट (1) तो मी नव्हेच (1) थ्री बीएचके (1) दबंग (1) दरी (1) दास (1) दिल (1) दिसतं तस नसतं (1) दीवार (1) दुष्मनी (1) देवदास (1) धड़कन (2) धृतराष्ट (1) नकाराचं गणित (1) नटरंग (1) नतीजा (1) नारायण सुर्वे (1) निरोप (1) नीलपरी (1) नीलम शिर्के (1) नेहा पेंडसे (1) पत्थर (1) परदेस (1) परवाने (1) परीक्षांचे टेन्शन (1) पलटते पन्ने (1) पल्लवी (1) पांचाली (1) पालवी (1) पुरस्कार (1) पॅराशूट डेली (1) पोलिसांपेक्षा (1) पोलीस (1) पोहे (1) प्यार (1) प्रजासत्ताक (1) प्रणय (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रभात (1) प्रशांत दामले (1) प्रीती (1) प्रेम (3) प्रेमाची गोष्ट (1) प्रेमात (2) प्रेरणा (1) प्रोमो (1) प्लॅनचेट (1) फत्तेलाल (1) फराळ (1) फिक्शन (1) फुलपाखरु;मराठी; जयदीप भोगले; कविता;गाणी;झी युवा (1) फुलपाखरू (1) फेसबुक (1) फ्रेशर (1) बंकर (1) बगावत (1) बंध (1) बला (1) बातमी (1) बाबासाहेब (1) बाबूजी (1) बारिश (1) बाल (1) बिनडोक (1) बिनधास्त (1) बॉलीवूड (1) ब्राझील (1) भकास (1) भस्मासूर (1) भाऊजी (1) मकरंद अनासपुरे (2) मराठी (78) मराठी; कविता; बटाटे;जुई; कमळ; दुधी;कॉलेज; गेटटूगेदर; (1) मराठी; कविता;सविनय; समाज;जयदीप (1) महेश कोठारे (1) माझिया प्रिया (1) मांडलिक (1) माणुसकी (1) माधुरी (1) माधुरी पुरंदरे (1) माध्यमे (1) मार्बल (1) मालिका (3) मावळे (1) माशूक (1) मास मिन्ग्लिंग (1) मास्तर (1) मित्र (1) मीर (1) मुग्धा वैशंपायन (1) मुस्कान (1) मूर्तिकार (1) मृगजळ (1) मेघना मलिक (1) मै (1) मैदा (1) मोमीन (1) मोहब्बत (1) मोहोब्बत (1) मौन (1) याद (1) युद्ध (1) येळकोट (1) योगा डे (1) रजनी (1) रवा (1) रवि जाधव (1) रामदेव बाबा (1) रिचफिल (1) रूमानी (1) रेगिस्तान (1) रोमिओ (1) लक्ष्मीकांत बेर्डे (1) लब्ज (1) ललित (1) लहू (1) लाडो (2) लेख (21) लै भारी (1) लोकसत्ता (1) वड़ापाव (1) वरुणराजा (1) वादा (1) वामन हरी पेठे (1) वाहिनी (3) विजय (1) विश्वामित्र (1) वीणाताई (1) वॅक्सीऩ (1) वेगळं (1) शब्द (1) शाप (1) शायरी (11) शिकवा (1) शिवाजीराजे (1) शेक्सपियर (1) श्रावण (1) श्रीकृष्ण (1) संघर्ष (1) संदीप खरे (1) सदृशाच्या (1) संपादकीय (1) समीक्षा (11) सलमान खान (1) सलिल (1) संवेदना (1) सागर (2) सारेगमप (2) सिंदूर (1) सिनेमा (2) सी एन सी (1) सुखन (1) सुनील पाल (1) सुहानी (1) सूर्य (1) सैराट (1) सॉफ्टी (1) सोनसकाळी (1) स्टॉप लॉस (1) स्त्री (1) स्वप्न (2) स्वप्नाली (1) हमनवाज (1) हवा येऊ द्या (1) हास्य (1) हिंदी (33) हॅम्लेट (1) हैमलेट (1)