साहित्य

बिंब आणि प्रतिबिंब

My photo
जे डी म्हणजे जयदीप, माझ्या या वाडीत कविता कथा समीक्षा परीक्षा याची आहे ही पोतडी. मी एक मार्केटिंग चा कार्यकर्ता अणि मराठीप्रेमी गडी. माझी वाडी ही मराठवाडी आवडेल तुम्हाला थोड़ी थोड़ी

Friday, June 23, 2017

जुमेरात ची इफ्तारी .... सुखनदर रमजान मध्ये काही मुंबईकर खास वेळ काढून मोहमद अली रोड ला जातात आणि मालपुआ कबाब यावर मनसोक्त ताव मारतात.काही जण खास दिल्ली आग्रा फतेहपुर सिक्री आणि “शहर ए तहजीब” लखनऊ ला भटकतात या सगळ्या जागी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे मुगल मुगलाई आणि त्या  काळापासून वाढलेली एक मधुर अशी भाषा उर्दू !!!
काही जणांना आजकाल उर्दू म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजाची भाषा आहे असा गैरसमज आहे
तर काहीजण “फ्रेंच माझी सेकंड लँग्वेज आहे” असे म्हणून त्यांना सगळ्या  आपल्या भाषा घरकी मुर्गी आहेत
म्हणूनच का काय ही उर्दू एकदम मोडी जवळ जाऊन बसली आहे . मोडीत काढणे म्हणजे काय याचा अर्थ मला हळू हळू समजू लागलाय
१९७० १९८० मध्ये उर्दू आपल्या काही सिनेमातून जिवंत राहिली . साहिर साहेब व मजरूह साहेब यांनी तिला थोडे गुणगुणत ठेवले. १९८० नंतर जगजीत सिंग व पंकज उधास यांनी गजल मधून ही आम करून दिवाने खास मध्ये तरी खिळवून ठेवली. पण आता उर्दू आजकालच्या ओढून ताणून बनवलेल्या संवादात धडपडत असते . इर्शाद व मुकर्रर याचे “ शॉर्ट फॉर्म” नसल्यामुळे whatsaap मधून सुद्धा तिची हकालपट्टी होते
या अशा इतक्या मधूर व खुसरो ने “ अमीर “ केलेल्या उर्दू ला वाचवायला “ सेव्ह टायगर “ असा उपक्रम  सुद्धा करता येत नाही त्यामुळे संस्कृत मोडी उर्दू या ... आपल्या पूर्वजांच्या फोटो प्रमाणे धूळ खात पडतात. आपण वर्षामधून त्यांचे पितारांसारखे दिवस सुद्धा घालतो म्हणा !!!


तर अशी ही उर्दू एखादि  मराठमोळी  मंडळी आपल्या समोर आणतात असा म्हणालो तर तुम्ही मला कदाचित वेड्यात काढू शकाल पण या अशा औलिया लोकांचा लौकिक प्रयत्न म्हणजे “ सुखन”
हा काल मी ठाण्यात गडकरी रंगायतन ला पाहिला . बुक माय शो मधून परीक्षण वाचून गेलो होतो तरीही तिथला अनुभव म्हणजे पावसाची कविता वाचणे आणि पावसात भिजणे यात काय फरक असतो  इतका सुंदर व जिवंत होता
सुखन मधले प्रत्येक कलाकार अगदी (सारंगी व हार्मोनियम सहित)  म्हणजे  गजल बनवण्यासाठी लागणाऱ्या शायरी मध्ये जसे  रदीफ काफिया वजन असं काहीतरी लागतं म्हणतात व त्याच्या हव्या तितक्या प्रमाणात असण्यानेच एक आविष्कार घडतो तसे आहेत .
 मग मखमली आवाजाची अवंती पटेल असो कि सुफी अंदाज असणारा जयदीप वैद्य.प्रत्येक कलाकार आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. या कार्यक्रमाचे दोन कलाकार म्हणजे शरीर आणि आत्मा असल्यागत आहेत ते म्हणजे ओम भूतकर आणि नचिकेत . पुणेरी श्रीखंड खाऊन इतक्या उच्च प्रतीची उर्दू कोणी बोलू शकतो  याची देही याची डोळा प्रचीती घायची असेल तर ही कलानिर्मिती पाहणे एकदम Must!! आहे
जसं गर्द हिरवळीची मजा घेत  आपल्या धुंदीत जगण्यासाठी स्वतः वनस्पत्तीशास्त्रज्ञ असण्याची गरज नसते तसच “सुखन” पाहताना उर्दू यावीच अशी नक्कीच अट नाही व गरज तर नक्कीच नाही
इरूवर सिनेमामध्ये मला ऐश्वर्या राय ची तमिळ “ न समजता” जितकी गोड वाटली तितकीच प्रत्येक गजल व कव्वाली (उर्दू फार जास्त  न समजता ) मला तितकीच हविहवीशी वाटली.
हे या कार्यक्रमाचे परीक्षण म्हणून मी नक्कीच लिहिलेले नाही .  काही लोक या जगात किती चाकोरीबाहेर जाऊ शकतात  त्यांना किमान पहावं ,त्यांचे कौतुक करावं व त्यातून एक निखळ आनंद मिळवावा, व जमलं तर त्यांच्यासारखं आपणही कधी वेडे व्हावं  म्हणून लिहिलं आहे
उर्दू म्हंटल कि गालिब, मीर, मोमीन इतकच काही जणांना आठवत पण यांच्या खजिन्यात अशी असंख्य रत्न आहेत  तर आज म्हणे ते दिनानाथ मंगेशकर पार्ल्यात सुखन घेऊन येतायत ... तर तुम्ही अवश्य जा खुल जा सिमसीम म्हणा !!! आणि जमल नाहीच तर हे सुखनवर मुंबई व पुण्यात असेच येत राहो अशी सदिच्छा तर नक्कीच असू देत
है और भी दुनिया मे सुखनवर बहुत अच्छे
कहते है के “ ओम भूतकर” का अंदाजे बयान और

जयदीप भोगले

Wednesday, March 29, 2017

जाऊ द्या ना बाळासाहेब


जाऊ द्या ना बाळासाहेब आता तुम्ही सैराट व्हा
होतो तेंडुलकर आउट कधीकधी तरी आयुष्याचा किल्ला व्हा
साडे माडे तीन म्हणून दे धक्का प्रयत्नाचा
हाय काय आणी नाय काय असं म्हणून लै भारी व्हा
कट्यार काळजात घुसलीे तरी बेलवलकर नटसम्राटच राहतो
व्हेंटिलेटर वर जरी ठेवलं तरी जगासाठी झकास व्हा
जाऊ द्या ना बाळासाहेब तुम्ही सैराट व्हा
गुलदस्त्यात असले जरी बरेच काही
आयुष्याचा टाईमपास होत नसतो
काकस्पर्श झाला तरी लोकमान्य एक युगपुरुषच राहतो
माउली चा जझबा घेऊन आता तुम्ही रुस्तम व्हा
जाऊ द्या ना बाळासाहेब आता तुम्ही सैराट व्हा
जयदीप भोगले
२८ मार्च २०१७

स्त्री


स्त्री कधी गोड भाषा ...कधी जीवनाची आशा
कधी ताराबाईच्या तरवारी ची धार
कधी सावित्रीबाईंच्या शिक्षणाचं सार
कधी आंनदी बाई जोशींची सुश्रुषा
कधी शांता शेळक्यांच्या लेखणीची मनीषा
कधी लता दिदींचा स्वर्गीय स्वर
कधी माधुरीच्या अलवार हास्याची जर
कधी बनून मेधाताईंची नर्मदा परिक्रमा
कधी करून वीणाताईंसम वर्ल्ड ची पादाक्रांत सीमा
जणू तुळजाभवानीचा विजयी आशीर्वाद
गोदावरीच्या धारेची अखंड वाट
विविध रूपे तुझी विविध नावे तुझी
शब्दांची सुमने अर्पून स्मरतो सदैव महती तुझी

जयदीप भोगले
८ मार्च २०१७

बिनडोक


संघर्ष कशाचा कुणासाठी कशाला???
का बनावं आम्ही आता जळू असंच फक्त जगायला ?
वाघांची संख्या रोडावली म्हणे या जगात 
तरसांचे कळप एकत्र येतीं शिकार करायला
इकडे आड तिकडे विहिर या म्हणीचाच अर्थ सगळे सांगती
कुणाला कळेल का मला शिकायचंय समुद्रात पोहायला
मांडलिक आत्ता पालखीत मिरावती
राजाचं घोडं जातंय आता नेहमीच पेंड खायला
रहस्य कळेल का मला बिंडोकंपणाचं
मी सुद्धा शिकवणी लावू म्हणतोय बिनडोक बनायला


जयदीप भोगले
25 मार्च 2017

डायटींग फायटिंग


डाएट च्या जगात सगळं कसं अजब असतं
जिलेबी असते शत्रू आणी तूप म्हणे जहर असतं

जीभ आणी पोट याचे ते शीतयुद्ध असतं
ती जिंको कि ते आपल दोन्हीकडे मरण असतं

एकीला चवीचं प्रेम तर एकाला कॅलरीच वावडं असत
ही म्हणते लोणचं छान तर याचं फायबर बरोबर लफडं असत

वेळेवर जेवा असं पोटाचं भाषण कडवं असतं
ही मात्र खोडसर ,म्हणते अंबावडीचे आणि वेळेचं सदा वाकडं असतं

हिचं ऐकू कि त्याचं हे माझं नेहमीच कोडं असतं
म्हणूनच वर्षात एकदा जी एम डायट ला माझं मनोभावे साकडं असतं

बाकी वर्षभर मात्र माझं जिभेवर प्रेम एकदम खरं आणी भाबडं असतं

जयदीप भोगले 6 फेब्रुवारी 2017

थोडं लाईट व्हा

थोडं लाईट व्हा आणि काईट व्हा 

दुःख मागे टाकून थोडसं तुम्हीें ब्राईट व्हा।

येतो कधी काळोख सामोरा... हळूच तुम्ही व्हाइट व्हा।

दिवसाने जर घेतली परीक्षा रिलॅक्स अशी नाईट व्हा।

जगात आहेत दृष्टिहीन बरेच... तुम्ही हळूच त्यांची साईट व्हा।


थोडं लाईट व्हा आणि काईट व्हा....


जयदीप भोगले
१३ फेब २०१७

उबर परी

माझ्या मित्राला एकदा अमेरिकेत उबेर मध्ये एक सुंदर महिला ड्रायव्हर म्हणून आली म्हणे ... तो म्हणाला मी असतो तिथे तर नक्कीच एक कविता केली असती ... म्हणून हा एक केला छोटा प्रयत्न.


एक कोमल आणि अलवार ही कथा
माझी सारथी झाली आज जणू मेनका
वेग कसा सुगंधी तो जाहला
रस्त्याची जणू होई आज वाटिका
प्रवास हा सुरेल का भासे मज कळेना
आह जरीे निरव आणि स्वच्छदं ती शांतता
डोळ्यांचे डोह डोकावती हळूच ते
क्षणिक ते चंचल पण गूढ असे आर्तता
वळण ते आले आणि अनुभव तो संपला
वास्तवात येऊनी करितो संसार हा नेटका

जयदीप भोगले
१६ फेब २०१७

बाल बाल देखो
केसांची केस कशी हाताबाहेर गेली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

कुणी म्हणाले हा तर स्ट्रेस चा परिणाम 
 काहिनीं सांगितले हेरीडीटी स्ट्रॉंग आहे जाम

नाव्ह्याने सुद्धा हजामत बिनपाणी केली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

Gel आणि कंगवे शत्रू जणू जाहले
रिचफिल आणी बत्रा उगा सलगी करू पाही

जुन्या मैत्रिणीच्या भेटीला टोपी सुद्धा नेली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

मग म्हणलो मी ...जाऊ द्या ना राव
केस नसले तरी मला व्यक्ती म्हणून भाव

'बाल' भले गेले आणि 'असली 'पर्सनॅलिटी घावली
खुशाल आम्ही लावतो पॅराशूट डेली

Thursday, January 26, 2017

कस्तुरीमृग

डोळ्यांच्या दुनियेत हरवलाय कधी।
 स्वप्नाच्या गावात राहिलाय कधी।
 रातराणी चा सुगंध दरवळतोय नजीकच।
पण त्याचा माग काढलाय कधी।
शुक्राची चांदणी शोधलीय कधी।
 वाऱ्याला सारथी केलय कधी ।
वाट कुणाची पाहता पाहता रात्र अशी जागलीय कधी
क्षणाचं आयुष्य अनुभवलंय कधी।
 कस्तुरीमृग बनून बहाकलात कधी।
 एक होकाराच्या आशेमधून कविता अशी लिहलीय कधी ?

जयदीप भोगले। विक्रोळी ते पवई ऑटो 😂5 jan 2017

नकाराचं गणित

नकाराचं गणित नेहमी वजाबाकीच करतं
भेटीची बेरीज नेहमी बाजूलाच ठेवतं।
 चोरून पाहून कधी मनातलं समजत नाही।
 मनातल्या मनात पोहता कधी येतं ?।
बुडायच्या भीतीने ते किनाऱ्यावरच मरतं
किती सांगू किती नाही म्हणून पत्र ते लिहतं ।
पत्ता न सांगता आपल्या वाहितचं ठेवंत।
शाईचे पेन होतं दौतीविना रितं ।
 देवाच्या चरणी ते आशेनं जातं ।
कधी होईल कृपा म्हणून एकटक पाहतं।
आस्तिक म्हणून ते हळूच अगतिक होतं
आणि नकाराचं गणित नेहमी वजाबाकीच करतं
मग एकदिवशी ते मनाशी ठरवतं ।
 मन आणि कृतिचा गुणाकार करतं
एका दमात सगळं बोलूनच टाकतं ।
आणि मग ती म्हणते हसून  खरंच ...
. सुरवंटाच फुलपाखरू कोष फाडूनचं होतं  

जयदीप भोगले
30 डीसेम्बर 2017

ती सध्या काय करते ??
ती सध्या काय करते आजकाल प्रत्येक जण विचारते
कधी वॊटसॅप च्या गर्दीत तर कधी मित्रांच्या वर्दीत प्रत्येकाला तिची नसती पंचायत असते

तिचं लग्न झालं का रे?  इतक्यातच  फिसकलं का रे ?
पोलीसापेक्षा यांचीच जासुसगिरी फार असते
'

'ती' चा पगार किती? 'ती'ला मुलं नाहीत कशी ?
तिच्या हातावरच्या रेषांना सुदधा यांच्यापेक्षा कमी माहिती असते

कधी 'ती' ला सुद्धा विचारा  खरी कहाणी काय असते
 तुमच्या कल्पनेच्या भाकितात जगण्यापेक्षा तिच्या सत्यात काय घडत असते

विस्फारलेल्या नजरेपेक्षा तिला मैत्रीची हाक हवी असते
प्रत्येकवेळी वाचवायला कृष्ण नको पण  माणसांची दुनिया नक्कीच  हवी  असते
'ती' च्या पेक्षा तिला 'तू' बनणं जास्त पसंत असते

जयदीप भोगले
12 जानेवारी 2017

आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

लोकशाहीच्या मनमानीत
आरक्षणाच्या चढाओढीत
राजकारणाच्या मारामारीत
जणू सहनशक्तीचे बाप झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो


बाबासाहेबांना फोटोत बसवलं
रामाला कुंपणात अडकवलं
माणुसकीला वेशीला टांगलं
रावणाला घाबरून जणू कुंभाकर्णाचे दास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो


झाडांना बोन्साय बनवलं
 सिमेंटच जंगल वसवलं
धुराचं नवीन आकाश उधळलं
प्रतिस्वर्गाचे विश्वामित्र समजून भस्मासुराचे खास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

आशेचा किरण शोधतो आम्ही
मेणबत्त्या ने निषेध नोंदवतो आम्ही
मंदिराच्या वाऱ्यामध्ये आशीर्वाद विकतो आम्ही
स्वार्थाच्या हिशोबात फक्त भोगी ययाती झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

जयदीप भोगले
25 जानेवारी 2017

Labels

;बीडच्या (1) TV (1) valentine day (1) अतुल परचुरे (1) अँधेरा (1) अनकही (1) अनंत पै (1) अनुभव (1) अप्सरा (1) अफलातून (1) अमर चित्रकथा (1) अमिताभ बच्चन (1) अलवार (1) अल्प (1) अवधूत गुप्ते (1) अश्विनी भावे (1) असंभव (1) असूया (1) आई (1) आगगाडी (1) आय बी एन लोकमत (1) आर ई सी (1) आशिक (2) आसवे (1) इ टीवि (1) इ टीवी (2) इंजिनीअर (1) इंतज़ार (1) इतिहासात (1) इन्द्रधनुष (1) इरूवर (1) इश्क (1) उ:शाप (1) उंच माझा झोका (1) उदासी (1) उमेदिची शिदोरी (1) उलझन (1) ओम भूतकर (1) कटी पतंग (1) कट्यार (1) कथा (3) कथानक (1) क़यामत (1) करोडपति (1) कविता (69) कसक (1) कस्तुरीमृग (1) कांटो (1) कातरवेळ (1) कामगार (1) कामवाली बाई (1) कारवाँ (1) कालचक्र (1) काळोख (1) काहे दिया परदेस (1) कीमत (1) कुदरत (1) केरळ (1) कोहरा (1) क्षण (1) ख़याल (1) ख़ाक (1) ख़ामोशी (1) खुशियाँ (1) गणिताची (1) गालिब (1) गुलाबी हलचल (1) गुलाम (1) ग्रेट भेट (2) चतुरंग (1) चंद्र (1) चांदनी (1) चित्र (1) चित्रकार (1) चित्रपट (5) चेहरा (1) जबरदस्त (1) जय मल्हार (1) जयदीप (1) जयदीप भोगले (2) जयदीप भोगले (98) जयदीप भोगले अश्क (1) जाऊ द्या ना बाळासाहेब (1) जाऊ बाई जोरात (1) जासुसगीरी (1) जाहिरात (1) जिंदगी (2) जिन्दगी (2) जी एम डायट (1) जीवनसंध्या (1) जेडी (1) झी मराठी (10) टी वी (1) डायटींग (1) डोळ्यांच्या (1) तंत्रज्ञान (1) तराजू (1) ताराबाई (1) ती सध्या काय करते (1) तुळजाभवानी (1) तू (1) तूफ़ान (1) तेजाब (1) तेंडूलकर आउट (1) तो मी नव्हेच (1) दबंग (1) दरी (1) दास (1) दिल (1) दिसतं तस नसतं (1) दीवार (1) देवदास (1) धड़कन (2) नकाराचं गणित (1) नटरंग (1) नतीजा (1) नारायण सुर्वे (1) निरोप (1) नीलपरी (1) नीलम शिर्के (1) नेहा पेंडसे (1) पत्थर (1) परदेस (1) परवाने (1) परीक्षांचे टेन्शन (1) पलटते पन्ने (1) पल्लवी (1) पांचाली (1) पालवी (1) पुरस्कार (1) पॅराशूट डेली (1) पोलिसांपेक्षा (1) पोलीस (1) प्यार (1) प्रजासत्ताक (1) प्रणय (1) प्रभाकर पणशीकर (1) प्रभात (1) प्रशांत दामले (1) प्रीती (1) प्रेम (3) प्रेमाची गोष्ट (1) प्रेमात (2) प्रेरणा (1) प्रोमो (1) प्लॅनचेट (1) फत्तेलाल (1) फिक्शन (1) फुलपाखरू (1) फेसबुक (1) फ्रेशर (1) बगावत (1) बंध (1) बला (1) बातमी (1) बाबासाहेब (1) बाबूजी (1) बारिश (1) बाल (1) बिनडोक (1) बिनधास्त (1) बॉलीवूड (1) भस्मासूर (1) भाऊजी (1) मकरंद अनासपुरे (2) मराठी (65) महेश कोठारे (1) माझिया प्रिया (1) मांडलिक (1) माधुरी (1) माधुरी पुरंदरे (1) मालिका (3) मावळे (1) माशूक (1) मास मिन्ग्लिंग (1) मास्तर (1) मित्र (1) मीर (1) मुग्धा वैशंपायन (1) मुस्कान (1) मूर्तिकार (1) मृगजळ (1) मेघना मलिक (1) मै (1) मोमीन (1) मोहब्बत (1) मोहोब्बत (1) मौन (1) याद (1) युद्ध (1) येळकोट (1) रजनी (1) रवि जाधव (1) रिचफिल (1) रूमानी (1) रेगिस्तान (1) रोमिओ (1) लक्ष्मीकांत बेर्डे (1) लब्ज (1) ललित (1) लहू (1) लाडो (2) लेख (19) लोकसत्ता (1) वड़ापाव (1) वरुणराजा (1) वादा (1) वामन हरी पेठे (1) वाहिनी (3) विजय (1) विश्वामित्र (1) वीणाताई (1) वॅक्सीऩ (1) वेगळं (1) शाप (1) शायरी (11) शिकवा (1) शिवाजीराजे (1) शेक्सपियर (1) श्रावण (1) श्रीकृष्ण (1) संघर्ष (1) संदीप खरे (1) सदृशाच्या (1) संपादकीय (1) समीक्षा (11) सलमान खान (1) सलिल (1) संवेदना (1) सागर (1) सारेगमप (2) सिनेमा (2) सी एन सी (1) सुखन (1) सुनील पाल (1) सुहानी (1) सूर्य (1) सैराट (1) सोनसकाळी (1) स्त्री (1) स्वप्न (2) हवा येऊ द्या (1) हास्य (1) हिंदी (32) हैमलेट (1)