Sunday, October 28, 2018

सोनेरी क्षण





पहिल्या प्रेमाच्या सोनसाखळीतून
 सुवर्णमहोत्सवी संसाराच्या नथीतून
 भरघोस बोनसच्या हिऱ्याच्या कुडीतून
सोनेरी क्षण असेच बनतात अतूट प्रेमातून

आईच्या साठवलेल्या स्त्रीधनातून
कधी सासूबाईंच्या लक्ष्मीहारातून
ओवाळणी दिलेल्या गुंजभर सोन्यातून
सोनेरी क्षण असेच दृढ होतात अतूट प्रेमातून

शीलंगणाच्या अक्षय वळ्यातून
 गुरुपुष्याच्या वाढणाऱ्या मण्यातून
दिवाळीच्या लाजणाऱ्या ठुशीतुन
सोनेरी क्षण असेच वाढतात अतूट प्रेमातून

कधी हिऱ्यातून कधी सोन्यातून
कधी शुभ्र अशा चांदीतून
सोनेरी क्षण सदैव टिकतात WHP च्या सोबतीतून


जयदीप भोगले
4 ऑक्टोबर 2018

No comments:

Post a Comment

एक असतं पुस्तक...

अभ्यासू होतं वाचनालयात कोऱ करकरीत हॉलमध्ये होतं  धडधडतं हृदय  कॉफी टेबलवर कधी रेंगाळत बुक स्टॉल मध्ये    विद्रोह करतं कवितां कर...