ज्याचे त्याचे एव्हरेस्ट
एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं
प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं
उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची
पण सर केल्यावरचं स्पंदन एकच असतं
कष्ट असतात अपार त्यात घामाच्या धारांचं इंधन असतं
कुणाच्या रस्त्यात फुलात काटे तर कधी रान दगड गोट्या चं असतं
शिखर पहाता येतं म्हणतात ड्रोन वरून
पण ते फक्त त्याचं पार्थिव असतं
अथक प्रवास असते खरी चढाई
एव्हरेस्ट तर फक्त त्याचं पारितोषिक असतं
जयदीप भोगले
18 मे 2023
No comments:
Post a Comment