मग मिनू ने सांगितले कदाचित तिला तू आवडतोस म्हणजे जरा पाणी जास्तच डोक्यावरून चालले आहे .. ती वर्गात अभ्यास करत नाही . दहावीला मेरीट येऊन १२ विला चांगल्या कॉलेज ला सोड पण बी एस सी ला प्रवेश मिळणे कठीण .. मला वाईट वाटले पण वाईट वाटले तरी यात मी तडजोड नक्कीच करू शकत नव्हतो .. मला जरा हुरळून गर्व सुद्धा झाला .. की आपल्याला भाव आला वगैरे ...
मग काही दिवसांनी मी धाडस करून तिच्या घरी गेलो .. तिच्या डोळ्यात कामातून गेल्याच्या सर्व झलका दिसत होत्या ..
मी उगीच काकू आहेत का वगैरे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला .. पण तिला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता ... तिला मी मग उसने अवसान होऊन विषय काढला .. २० व्या वर्षी असली हाताळणी करणे कठीण आहे पण मग हळू हळू तिने अभ्यासाला कशी प्रायोरिटी दिली पाहिजे वगैरे सांगितले .. तिच्या डोळ्यात पाणी आले होते .. पण मला डोक्यावरून पाणी जाताना दिसत होते .. पिच्छा सोडवायचा एवढाच विचार होता .. मन वैगरे खोली मोजलीच नव्हती .. मी तिचा निरोप घेतला . आता त्यांच्या घरी सुद्धा चुकून जायचे नाही हे ठरवले होते . एकतर्फी प्रेमाची कत्तल करून मी विजयी वीर होऊन मित्रांना पीछा छुडाया वगैरे सांगत होतो ..
काही वर्ष लोटली .. एफ एम एस ला आलो दिल्ली मध्ये .. दिलफेक स्वभावामुळे चिकार मुली आवडल्या पण प्रेम वगैरे जमले नाही .. २५ आली होती जरा परिपक्व जालो होतो .. कुठेतरी प्रेम शोधावे म्हणून विचार करत होतो
आपण दिसायला चांगले आहोत .. हुशार आहोत बोलयला बरे आहोत वगैरे डोक्यात ठेऊन मला प्रेमाच्या दुनियेत एखादी फटाकडी नाही तर छानसी तरुणी नक्कीच भाळेल असे उगाच वाटायचे ..
प्रेमात दिसण्याला , पैशाला , स्वभावाला काही महत्व नसते कदाचित लग्नाच्या विश्वात असेल .. हे मला कधी कळलेच नाही ...
आणि कॉलेज मध्ये एक तमिळ मुलगी मला आवडाय लागली .. ती माझी प्रोजेक्ट मेट होती नंतर आमच्या होस्टेल वर यायची आणि मग .. तीच हवी हवीशी वाटाय लागली .. मला दिसणे , स्वभाव असल्या सगळ्या गोष्टींचे हसू यायला लागले .. कारण मी गोरा ती कुरूप यात मोडणारी. मी रोड ,ती बेढब मी शांत ती तापट असले सगळे भिन्न प्रदेश एकत्र येऊ पाहत होते .. पण मला कदाचित फक्त आमचा सहवास आमची मैत्री आमचे मनप्रत्येक गोष्ट घडल्यानंतर तिची साथ इतकेच दिसायचे .. यात शारीरिक आकर्षणाला थारा नव्हता ..
आणि एक दिवस अचानक हळू हळू ती माझ्याशी अचानक तुटक वागू लागली .. मला कळेचना का ? मी पुष्कळ प्रयत्न केले .. पत्र जाऊन मोबाईल चा जमाना आला होता .. कित्येक एस एम एस केले पण तिने मोबाईल उचलणे बंद केले
मी अस्वस्थ होऊ लागलो .. आणि एकदा परीक्षेच्या दिवशी तिने मला सांगितले .. मूव ऑन यार .. तू फक्त मित्र होतास .. आणि आता तुझ्या अशा वागण्यामुळे मला मित्र सुद्धा वाटत नाहीस .. मला तुझी भीती वाटते
तू अभ्यासावर लक्ष दे आयुष्य तुझ्या पुढे आहे ... माझ्या डोळ्यातले पाणी आपोआप बाहेर येऊ लागले ...
मी केलेली एकतर्फी प्रेमची कत्तल आता माझच खून करू पाहत होती ..मला प्रत्येक दिवशी तरुणपणात रंगावरून डावलून, भावनांना महत्व न देणा-या माझी आठवण झाली ..
कदाचित त्या गर्वाचा शाप मला लागला होता .. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन फक्त मनापासून प्रेम करणा-या मला अगदी तिच्यापेक्षा डाव्या मुलीकडून नकार मिळाला होता ...माझे अभ्यासातले लक्ष उडाले होते ..
पहिल्या वर्षात उत्तम कामगिरी करणारा रवी आता अस्ताला लागलेल्या सूर्यासारखा भासत होता ...माझ्याबरोबर प्रत्येक गोष्ट जवळ जवळ रीमाबरोबर घडल्यागत होत होती ...
शाप ही संकल्पना खरी आहे का काय मला भासू लागले ... दिवसामागून दिवस लोटले ... अचानक आईने विचारले एक फोटो आहे पाहतोस का ? मुलगी छान आहे ...
आणि काही दिवसांनी रविचे एका सुरेख मुलीशी लग्न झाले आणि बहुतेक शापाला ... उ:शाप मिळाला