तुझ्या डोळ्यांच्या दुनियेत आज मला सगळे विसरावे वाटते
आठवलेच तर आपल्या पहिल्या भेटीच्या आईसक्रीम ची चव अनुभवावी वाटते
क्षण न क्षण नेहमीच अवीट राहिला
तू जवळ नसताना सुद्धा श्वास तुझाच राहिला
माझ्या रागाला तुझ्या प्रेमाची फुंकरच आवरू शकेल
तुझ्या किनाराच माझ्या मुक्त लाटेला सावरू शकेल
आज ना ती सुवासिक बकुळीची फुले नाहीत गुलाब आणले
बस हृदयातील दोन शब्द कवितेत माळून तुला वाहिले
जयदीप भोगले
१४.०१.२०११
