Showing posts with label आसवे. Show all posts
Showing posts with label आसवे. Show all posts

Friday, August 20, 2010

विरह

डोळ्यात आसवे दाटून आली
आतूर हा जीव झाला
वाट तुझी पाहता सख्या रे
सूर्य ही मावळतीस आला
तू जीवनात येऊन अशी जादू केली
मृत्तिकेची माझी काया जणू कनकाची झाली
जगण्यास माझ्या अर्थ हा मिळाला
नदीकाठ हा आता पाहवेना
विरह अश्रुनी नदीस पूर आला
नाव तू घेउनी असे किना-यास यावे
तुझ्या नयनांच्या आरश्यात मी स्वत:ला पाहावे
आता विरह नको प्रिया चंद्र साक्षीस आला
मंद मंद ही रातराणी
सोबतीस शीतल झुळूक
आणि रात्र ही दिवाणी
अशी कातरवेळ जणू
युगुलांची जगावी
प्रहर लोटले पण तुझा निरोप न आला
कधी मज भासे विरहात सुख आहे
प्रेम माझे जीवापाड, जणू विरह मला सांगू पाहे
या एकाकी जगात, तुजवीण मज कोण आहे
माझ्या हृदयाचा जणू मला बंध हा मिळाला

जयदीप भोगले
१२-०९- २००३

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...