मित्रांनो, आठवणीतले चित्रपट, आवडती गाणी आपल्याला कायम हवेहवेसे वाटतात . आपण पुन्हापुन्हा त्यांच्याबद्दल बोलतो वाचतो , ते कुठल्या वाहिनीवर येत असतील तर अगदी थोडावेळ देवदर्शनासाठी थांबल्यागत थबकतो , आणी दर्दी लोक तर त्यांचा संग्रह ही करतात . असेच काही चित्रपट ते ही अस्सल मराठी.बर का !!
माझ्या मते हे चित्रपट मराठी सिनेमाच्या इतिहासात नक्कीच एक मनाचे स्थान बनून राहतील . या पंक्तीमध्ये तुम्हाला काही चित्रपट अजून जमा करावे वाटतील, कुठले तरी चित्रपट वादातीत म्हणून वजा करावे वाटतील पण हे चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडतील , आवडलेले असतील याची मला खात्री आहे. इंडिया टायीम ने अग्रणी असलेल्या उत्तम बॉलीवूड चित्रपटाची लिस्ट जाहीर केली होती .. त्यामुळे मला वाटले आपल्या मराठी चित्रपटांमध्ये नक्कीच असे काही चित्रपट नक्कीच आहेत जे अत्युत्तम आणी न सोडण्याजोगे आहेत त्याची लिस्ट मी या पोस्ट मधून सांगणार आहे . आवडल्यास दाद अपेक्षित आणी हे चित्रपट बघणे ही अपेक्षित आहे आणि ते ही ओरिजिनल सी डी घेऊन बर का !!
आहेत ना जबरदस्त हे चित्रपट?हे चित्रपट वेगवेगळ्या पठडीतले आहेत . काही विनोदी ,काही गंभीर, काही कौटुम्बिक काही श्रवणीय आहेत पण सर्व चित्रपतानी तिकिटबारिवर , समीक्षकांच्या लेखणीवर त्यांच्या काळात राज्य केले आहे . कालाबरोबर ते जुने होत नाहीत. अगदी कृष्णधवल असले तरीही ... या प्रत्येक चित्रपटाचे चार भागांमध्ये मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे ,की हे का चांगले आहेत. शक्य झाल्यास विडियो पण टाकेन.आवडल्यास प्रतिक्रिया जरूर सांगा.. ( कदाचित याजसाठी केला होता अट्टहास ... :)
जयदीप भोगले
१५ -०९-२०१०