Friday, October 12, 2012

अचानक

अचानक
डोळ्यांची साथ आज नसणार अचानक
मनाच्या सफरेची वाट संपणार अचानक
गाठ पडली स्वप्नात अलवार जरीही
पहाटेच्या हाकेने रात्र सरणार अचानक

रेशमी केसांचा ढग का जाई अचानक
हास्याचा पुष्कर जसा विरतो अचानक
इशाऱ्यांची भाषा उमजली जरीही
निरोपाचा शब्द का खटकतो अचानक

या नात्याचा शोधू नको किनारा सखे तू
नाव माझी दर्यात तुला दिसेलही अचानक
खलाशी मी असे स्वप्नातल्या जगाचा
पुनवेची लाट सांगेल माझी खुशाली अचानक

भेट ही अचानक विरह ही अचानक
शेवटच्या गावी का झाली सुरवात ती अचानक
शब्दाची भरती आता ओसरे जरीही
भावनांची लाट तरी उचंबळते अचानक

Friday, July 27, 2012



असूया 


सूया  आणि  प्रीती  दोन   मैत्रिणी  
.
एक  बागडे   फुलासंगे  एक   जणू ती  काट्यावाणी  

गाणे  एकीच्या  आयुष्यात तर  एकीच्या  डोळ्या  सदैव   पाणी 

मोकळे  आकाश   महाल  प्रीतीचा  असूयेची  हवेली  सदा  विराणी
 
कटू  सत्य  प्रीतीला  भावे  .खोट्या  सुधेची  असूया  दिवाणी
 
प्रीती  जगते  मरतानाही  . असूया  जगुनी  अश्मावानी 

एक  मनाला  आरसा  दावे  एक  म्हणते  पहा  चोरुनी 

प्रीती  हसत  हलाहल  पचवी  . असूया  मरते   कट्यार  घेउनी 





जयदीप भोगले



Monday, April 9, 2012

वेगळेपण

काही कविता कुणा कवीच्या जुन्या कवितेने प्रेरित होऊन केलेली असते
काही जणांना हे अन्नू मलिक ने  केलेल्या संगीत दिग्दर्शनासारखे वाटू शकते .ही कविता माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर यांना सलाम करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या इतके उत्तम नक्कीच जमणार नाही पण कुठेतरी प्रामाणिक प्रयत्न !!!!
 कुणाला आवडली तर दाद जरूर द्या



प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुझा फक्त वेगळं बाकी सगळ्यांचं सेम असतं


कधी हसून असतं तर कधी गप्प बसून असतं 
ओपन वाटले तरी कुठेतरी लपून असतं


कधी ते गुलाबाचं फुल असतं तर कधी पाळण्यातले हसरे मुल असतं 
बोल्ड वाटले तरी जगाला कसा घाबरून असतं

कधी ते सिंड्रेला होतं तर पावसात कधी माझी अम्ब्रेला होतं
दूर वाटले तरी हळूच कसं आपलंसं होतं

कधी शब्द असतं तर कधी गाण्याचे बोल असतं
जीव जरी माझा पण त्याचा जणू प्राण असतं


जयदीप
६ एप्रिल २०१२


वेगळेपण 

Wednesday, February 22, 2012

मृगजळ



मृगजळाच्या या वाटेवरती तृषार्त मी राहिलो
उजेडाच्या भ्रमात जणू मी अंधारात नाहलो 
त्या क्षणांची वाट पाहुनी दिवस असे लोटले
आयुष्य पुढे निघून गेले मी मागे राहिलो
गुलाब तो  मग काटे सुद्धा असतील हे मी जाणिले
सुवासाच्या शोधात जणू मी कस्तुरीमृग जाहलो 
मृगजळाचा भास होता आता मी जाणिले 
डोळ्याच्या भोवऱ्यात अडकून मी अश्रूत मी वाहलो 

जयदीप भोगले
२२ फेब्रुवारी 2012

Monday, February 6, 2012

कामवाली बाई


कदाचित ही कविता वाचल्यावर मी किती स्त्रीसहीष्णू  आहे याची तुम्हाला कल्पना येईल .. :) 

सध्याच्या काळात कामवाली बाई हा कदाचित शेअर बाजार आणि राजकारणाइतकाच महत्वाचा विषय होऊन बसला आहे 
या व्यक्तीमुळे मला एकदा असे वाटले की, कामवाली बाई आणि त्याचा अर्थकारणावरील प्रभाव असा लेखच लिहून मोकळे व्हावे 
पण मग विचार केला हा जर लेख आमच्या घरच्या रेश्मा ने वाचला तर झाडू पोछा आणि पुरुष असा लेख मला लिहावा लागू शकतो .. असो

ही कविता सर्व सुनांना आणि तमाम महिला वर्गाला अर्पण ..कदाचित आपल्या मनातले माझ्या लेखणीत उतरले असे वाटले तर दाद जरूर द्या ..







कामवाल्या  बाईवर  माझे  अचानक  प्रेम  बसले
आणि  प्रेम  केले  तेव्हाच  तिचे  कामाचे   खाडे . दिसले
रोज २  पोळ्यांचा  घास  ही मी  भरवला 
पण  मझ्या  हातचे  पोळलेले   डाग    तिला का   नाही  दिसले ?
तिचा  फोन   घेताना  नवऱ्याचा फोनही  कट  केला 
पण  इनकमिंग  कॉल   असल्यामुळे  लोकांना  त्याचे  बिल  नाही  दिसले ...
स्वप्नामध्येसुद्धा   बाई  काम  करताना  दिसते 
पण  जागे  झाले  की  ती  येणार  नाही  एवढेच  मात्र  कळते 
जगी  माझ्या  मैत्रिणीनो,...   घरी  नाते  तेव्हाच  टिकते 
३०  दिवस  बाई  ज्यांच्या  घरी  कामावर  येते 
पण  हे  सुख  कधी  येणार  कळतच  नाही 
 . प्रेम  करत  मी  बिचारी  एकटीच  फसले

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...