Tuesday, October 29, 2019

दर्यादिली



रफ्तार की दहलीज पे हवा ने  कहा
ठहर जाने पे भी मिलता है ये जहाँ
खामोश लब्जो से भी कही जाती है कहानी
जलजले मे   सोच डुबाने की  महारथ  कहां

आंधियो का वजुद बस कुछ पलो का  होता है
दर्यादिली  के ठहराव की उनको सोहबत कहा
तबाही और खोफ  मिटा सकते है लेकिन
साहिल  का साथ निभाने की उसमे कुरबत कहां

जयदीप भोगले
29 ऑक्टोबर 2019

Monday, October 21, 2019

हक्क



बजावला आज हक्क
पुन्हा एकदा ठेवला विश्वास लोकशाहीवर
एकदम कुंभ मध्ये शाही स्नान केल्यासारखं
मॉब सायकॉलॉजी म्हणा की अंधश्रद्ध आशा ग्वाहीवर
दाखविली बोटं सेल्फीमध्ये ...हो मी पण धृतराष्ट्र!!! म्हणून
आणि म्हणालो दूध तरी आम्हाला द्या ताव मारा तुम्ही सायी वर

मग आठवलं  आपल्याला  असलीच सवय झालीय
सहनशक्ती सुदधा आता एकदम कोडगी झालीय
सामान्य जनता म्हणून आपल्याला पाणी सुदधा विकत घायचं असतं
पक्ष कुठलाही आला तरी आपण असच झापड लावून जगायचं असतं

जयदीप भोगले
21 ऑक्टोबर 2019

Tuesday, September 24, 2019

व्हाट्सआप

ग्रुप कसा कॉलेज कट्ट्यासारखा असावा
सगळे जरी  नसले एकत्र तरी  भरल्यासारखा दिसावा
कट्टयावर कसा म्होरक्या कोणीच नसतो
कधी असतो हीरो कधी तोच बकरा बनतो
टेन्शनच्या आयुष्यात एखाद्या स्माईलसारखा दिसावा
ग्रुप कसा नेहमी कॉलेज कट्यासारखा दिसावा
जेव्हा नेहमी नेहमी  काहीच मित्र कट्ट्यावर सारखे दिसू लागतात
संशयाचे ढग नेहमी  वरती दिसू लागतात
त्याला दूर करायला सगळ्यांचा सहभाग असावा
ग्रुप कसा कॉलेज कट्ट्यासारखा असावा

हॅपी ग्रुप बर्थडे

Thursday, August 15, 2019

सिनेमा आणि देशभक्ती



देशभक्ती ही भावना लोकांच्या मनात ठेवायची ,वाढवायची ,आठवण करुन द्यायचं काम  भारतीय सिनेमा ने केले आहे . हा विषय नुसता काढला तरी किमान दहा सिनेमे आपल्या प्रत्येकाला आठवल्या शिवाय राहणार नाहीत
सिनेमा हा या भावनेचा वापर प्रसिद्दी व व्यावसाईक यश यासाठी करत जरी असेल तरी त्यांच्या या कामातून नकळत का होईना देशभक्ती हा विचार रंजक पद्धतिने का होईना लोकांपर्यंत पोहचतो या बद्दल सिनेमासृष्टी व सिनेमा वाहिन्या यांचे अभिनंदन करावं असं मला वाटतं
समाजाचा सांस्कृतिक सहभागाचा स्वातंत्र्यपूर्व काळा पासून देशभक्ती वाढवण्यासाठी नक्कीचं खूप उपयोग झाला आहे.
पोवाडे समर गीते मेळे संगीत नाटकं ते आता असणाऱ्या भव्य 3D सिनेमा यापर्यंत त्यांचे योगदान प्रत्येकाला विसरून चालणार नाही.

चीन च्या युद्धावर प्रकाश टाकणारा हकिकत
जय जवान जय किसान वर प्रकाश टाकणारा 'उपकार' असो विविध लक्षवेधी सिनेमातून हिंदी सिनेमा 1942 A love स्टोरी... ते 'उरी'  व 'केसरी' यापर्यंत फुलत आला आहे.
देशभक्ती व सामाजिक जाणिव याची बाजू सर्वात सुंदर पद्धतीने मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटातून मांडली असं मला नेहमी वाटतं । आता यात काही टीकाकार त्यांच्या चित्रपटात असलेले व्यावसायिक कंगोरे यावर टीका करू शकतील पण 50 वर्षांनंतर सुद्धा जर देशभक्तीपर सिनेमा असं आठवायचं असेल तर त्यांच्या सिनेमाचा वरचा क्रमांक कुणी नाकारू शकणार नाही

मराठी सिनेमा पण देशभक्ती पेक्षा सामाजिक प्रबोधन करण्याऱ्या चित्रपटात जास्त लक्षात राहिला असं मला नेहमी जाणवतं ।  लोकमान्य , फर्जंद , सावरकर असे काही तुरळक प्रयत्न सोडले तर मराठी सिनेमा मधलं खड्ग छत्रपतीकालीन काळात जास्त यशस्वी व रममाण झालं असं मला नमूद करावं वाटतं। आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके, चाफेकर बंधू ,आणि कितीतरी मोठे क्रांतीप्रणते  महाराष्ट्रात होऊन गेले तरी व्यावसायिक यश मराठी देशभक्तीपर सिनेमाला मिळालं नाही .
याला कुठली कारणं आहेत व होती हा शोधनिबंधाचा विषय असू शकतो पण हा विचार तुम्ही एक मराठी म्हणून केला तर तुम्हाला ते जाणवून जाईल.
या  दिनानिमित्त केलेल्या उहपोहातून चित्रपट हे माध्यम नेहमी आपल्याला क्षणिक का होईना देशभक्ती च्या जवळ घेऊन जाते याबद्दल मला सर्व चित्रपट सृष्टी चे अभिनंदन करावे वाटते.
आपल्याला देशभक्ती म्हटलं की कुठले चित्रपट आठवतात याचा विचार एक भारतीय एक सिनेमा चाहते म्हणून नक्की करा
व  बाटला हाऊस च तिकीट बुक करा नाही मिळाले...

 नाहीतर झी सिनेमा वर केसरी आहेच तो पाहून सिनेमाच्या माध्यमातून थोडे देशभक्त होऊ या


73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
15 ऑगस्ट 2019

Wednesday, May 15, 2019

#रंपाट#

....

शिट्टी वाजवा ..पॉपकॉर्न मागवा
टॉकीजवर जाऊन तिकीट दाखवा
रंपाट सिनेमा येतोय गावात
थंडीच आणतोय उन्हा तान्हात
3 तास जगाला विसरून जावा
डोकं लावा की बाहेर ठेवून जावा
रंपाट सिनेमा येतोय गावात
हसू नका नुसते गालातल्या गालात
मतदान आता झालं ना भावा
आय पी एल सुदधा मुंबईच्या नावा
रंपाट सिनेमा येतोय गावात
टाईमपास पेक्षा डबल जोमात
सिनेमा तुम्ही टॉकीज ला पहावा
आवडला तर दहादा जावा
रंपाट सिनेमा येतोय गावात
सुपर हिटच असतंय झी च्या नावात

जयदीप भोगले
15  मे 2019

Monday, May 13, 2019

चहाचा चाहता

जगात भारी  जगात भारी
हिच्या चहाची लज्जत न्यारी
चहा तोच आणि दूध तेच
पण हीच्या चहाची नवीन स्टोरी
अमृततुल्य आणि येवले काका
मी म्हणत नाही हिच्याकडून शिका
शिकून सगळं येत नाही दादा
Exclusivity ची असते मजाच न्यारी
कोणी म्हणेल याला स्तुती
कोणी म्हणेल माज
कोणी म्हणेल बायकोच्या गुलामीचा  हा नवीनच अंदाज..
कोब्रा नवरे करत नसतात कौतुक असे घरी
तेव्हाच समजा चहाची गोष्ट आहे एकदम खरीखुरी
खारी असो की बशीत मारी
हिच्या चहाची नवीन स्टोरी


अरे हुजूर वाह ! बोलीये

जयदीप भोगले
13 मे 2019

Tuesday, April 30, 2019

नजरिया



काश ये आसमां हमारा होता
तो जमीं का नजारा कूछ और होता

हमारे  मकाम के रास्ते हम उपर से ही खोज लेते
इस गली कुचे मे शायद गुमशुदा नही होता

जमीं की खूबसुरती उपर से ही देख लेते
यूँ बुतों के बाजार मे बेजार नही होता

इस सोच को पल भर एक बादल ने तोडा
जोरो से बरस के जमीं पे ला छोडा

जब टूटा तो जमीन के इंसां से जुडा
 नही तो आस्मान का खुदा बन गया होता

जयदीप भोगले
30 एप्रिल 2018
नेरुळ 2200

Tuesday, April 23, 2019

एक असतं पुस्तक...

अभ्यासू होतं वाचनालयात
कोऱ करकरीत हॉलमध्ये
होतं  धडधडतं हृदय  कॉफी टेबलवर
कधी रेंगाळत बुक स्टॉल मध्ये






   विद्रोह करतं कवितां करून
    वनिता बनतं नियतकालिकांमध्ये
न परवडणारा शब्दकोश होतं
स्वप्न रंगवतं प्रवासवर्णनामध्ये

सेकंड हँड असो वा फर्स्ट एडिशन
पालिकेच्या दिव्यात असो की थंडगार एअरकंडिशन
फर्स्ट असो की थर्ड डिव्हिजन
याचं नेहमी समतोल व्हिजन

उघडा किंवा बंद ठेवा
याचं मंदीर सर्वांना खुलं असतं
याची किंमत लोक पाहतात
आणि हे लोकांचे मोल ठरवतं

जयदीप भोगले
23 एप्रिल 2019


Sunday, February 17, 2019

ध्यासपर्वाची विलक्षण अनुभूती -आनंदी गोपाळ



निर्मिती -फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज
दिग्दर्शक- समीर विद्वंस
कलाकार - ललित प्रभाकर ,अंकिता गोस्वामी आणि भाग्यश्री मिलिंद आणि गीतांजली कुलकर्णी
संवाद -इरावती कर्णिक
गीते- वैभव जोशी संगीत -हृषीकेश दातार जसराज जोशी

प्रत्येकाने पहावा व दुसऱ्यांना दाखवावा असा

डॉ आंनदी बाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर असं हुशार मुले ,सामान्य ज्ञान असणारी जिद्यांसू मुले , यांना हे नाव कदाचित परिचित असेलच..

पण एखादं नाव नावारूपाला येण्याआधी त्यामागचा संघर्ष ,तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असून त्यावर केलेली मात आणि ही ज्ञानगंगा चित्रलोकी आणण्याचं काम करणारा भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी  ( आनंदी बाईंचे पती ) या सर्वाचं सिंहावलोकन करून 2 तास 14 मिनिटात त्याचा एक बायोपिक पाहुन जेव्हा नतमस्तक व्हाव वाटतं  ती कलाकृती म्हणजे "आनंदी गोपाळ "
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे असणाऱ्या अगणित माता पत्नी शिक्षक यांची मोठी यादी आपल्याकडे नक्कीच असते पण  150 वर्षांपूर्वी आपण शिकू शकतो हे मनाला शिवत सुद्धा नाही अशा स्त्री ला आपल्या काहीशा जिद्दी हेकेखोर टोकाच्या आणि तऱ्हेवाईक दृष्टीकोन ठेवुन डॉक्टर बनवणारे वल्ली भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी .  या जोडप्याच्या ध्यासाची आणि त्यांच्या प्रवासाची अत्यंत प्रभावशाली गोष्ट म्हणजे चित्रपट ..आंनदी गोपाळ

... चित्रपट म्हणून एक उत्कृष्ट कथा, त्यामागची भूमिका जाणून केलेलं जाणतं दिग्दर्शन ,ते घडताना तोच दृष्टीकोन दाखवणारं  डोळस छायाचित्रण, या छायाचित्रणाला 150 वर्षापूर्वी घेऊन जाणारे अत्यंत प्रभावी असे कला दिग्दर्शन आणि वेशभूषा, या सर्व गोष्टीला साजेसे हृदया व मनाला हलवणारे संवादलेखन व गीतलेखन
व या पंचमहाभूतातून बनलेले व्यक्तिचित्र आणि त्या भूमिका जगणारे ललित प्रभाकर ,भाग्यश्री मिलिंद, गौरी कुलकर्णी
या मुळे अतिशय उत्कृष्ट चित्रनिर्मिती  म्हणजे… आनंदी गोपाळ

उंच माझा झोका सारखी सारखी उत्कृष्ट मालिका सासू सून झंझावात असताना सुद्धा झी मराठीने प्रवाहाविरुद्ध निर्माण केली आणि त्याच सोनं केलं या झी समूहाने या विषयाला भक्कम निर्मिती साथदिली हेंसुद्धा त्यांनी गोपाळराव जोशी यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यासारखं आहे असं मला इथं म्हणावं वाटतं

हा सिनेमा हा फक्त त्या काळाचं दर्शन व जाणीव किंवा डॉ आनंदीबाई जोशी  यांना वंदन करून थांबणारा नक्कीच नाही तर अजूनही प्रत्येक पुरुषाला महिलांना समान संधीच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे हे सांगणारा सुदधा आहे.
अजून सुद्धा आपली संस्कृती “पंचकन्या स्मरे नित्यम” म्हणणारी जरी असली तरी काचेचं छप्पर देऊन तिला रोखणारी सुद्धा तितकीच आहे हे सगळ्या पुरुषांना कळत नकळत माहीत असेलचं..
कदाचित म्हणूनच चित्रपताशेवटी असणाऱ्या काही वेधक छायाचित्रात अजूनही पहिली महाराष्ट्राची मुख्यमंत्री स्त्री नाही हे कुठतरी जाणवून जातेच..
पण हा सिनेमा पाहून आल्यावर उद्या जर आपल्या घरातील स्त्री ची कुठलीही महत्वाची मीटिंग काम असेल तर तिचा डबा जरी घरच्या पुरुषाने भरून दिला तर चित्रपट निर्मितीचा सर्व खर्च कारणी लागला असं निर्मात्यांना  म्हणावं लागेल..

हे सर्व वाचल्यावर आणि आनंदी गोपाळ सिनेमागृहात पाहिल्यावर कदाचित तुमच्या मधला सकारात्मक गोपाळ जागा होईल व तुमच्या जवळच्या आनंदीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना...

जयदीप भोगले
17 फेब्रुवारी 2019

Monday, January 21, 2019

बिझी

सध्या मी खूप बिझी आहे..

एकदम झापड लावलेल्या घोड्यासारखं
आणि ओझे वाहणाऱ्या गाढवागत सुद्धा
घोडा आहे म्हणून  आनंद नाही
आणि गाढव म्हणून घ्यायचं दुःख नाही

...कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम नाकासमोर चालणाऱ्या पांढरपेश्या सारखं
आणि एकदम नव्या कोऱ्या स्मार्टफोन सारखं सुद्धा
स्मार्ट असल्याचा कसला उपयोग नाही
आणि ठोंब्या असल्याची शिक्षा  सुदधा नाही

....कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम देवाच्या पेड रांगेत असलेल्या भक्तांसारखं
आणि टॅक्स बुडवणाऱ्या श्रीमंत चोरासारखं सुदधा
दर्शन मिळवायचे समाधान नाही
आणी चोर म्हणून  प्रायश्चित्त सुद्धा नाही
..
.कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम जन्मणाऱ्या बाळासारखं
आणि अखेरच्या श्वासाचा धनी
वृद्धागत सुद्धा
एकटं जगायचं  आत्ताच कळत नाही
आणि मिळवलेलं घेऊन मरायला कधीच मिळत नाही..

जयदीप भोगले
21 जानेवारी 2019

Monday, January 14, 2019

पतंग


पतंग होऊनि उडे अस्मानी
दुनिया बघते होऊन दिवाणी
सैर सपाटा पतंग करतो
परी, मांजा पकडे एक शहाणी
म्हणे कशी ती तू स्वछन्दी
पवन अश्व तो अन तू आनंदी

म्हणतो पतंग हळूच पामर
तुझाच मांजा ...मी  गं ..चाकर
उंच उडतो.. अन मिळते संधी
पण अस्मानी मी तुझाच बंदी
पतंग आहेत बहुत अस्मानी
पण दोर सांभाळी त्यांचीच राणी
जगास  भव्य  ते नाट्य दिसे
पण घरीच बनते त्याची कहाणी
सर्व पत्नी लोकांना सर्व पतंग सम पती  जमातीच्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
जयदीप भोगले
14 जानेवारी 2019

Thursday, January 3, 2019

लग्न (लग्नसराई साठी खास)

मी म्हणाले एकदा
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ ???
सगळे म्हणाले ..आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी म्हणाले..
आता त्याला हो म्हणून बसलीय
येवल्याची पैठणी आणि पेठयांची ठुशी घालून बसलेय
काही नवीन तुझ्याकडे असेल तर मला छान सांग पाहू..
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ???

भाऊ म्हणाला

लग्नानंतर आपला प्रियकर एकदम नवरा च बनून जातो
ताई सारख्या लोकांना चक्क "साली" म्हणू लागतो
डेमो एकदम असतो छान..  2 लेवल पेक्षा जास्त खेळून नको पाहू..
सगळे म्हणाले.. आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी आता म्हणाले आता काय करावे ??
बोहल्यावर  चढल्यावर मागे का फिरावे ?
पीएचडी पर्यंत शिकतेय आता ही सुदधा परीक्षा देऊनच पाहू.

सगळे म्हणाले आम्ही फसलोय तू तिथे नको जाऊ.

इतक्यात एक मला आजोबा आजी दिसले
आजीना माळून गजरा शेजारी जाऊन बसले

आजोबा म्हणाले

50 वर्ष झाली एकत्र ..पण अजून पुढं जायचं आहे
पॅरिस च आयफेल टॉवर दोघांना एकत्र बघायचं आहे
भांडण वाद आणि वैताग मी जरा बाजूलाच ठेवतो
कारण हिच्यासारखा चहा जगात कदाचित कुणाला येतो?

विश्वास आणि प्रेम असलं की जोडपं होतं मनमिळावू...

जयदीप भोगले
24 dec 2018

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...