Showing posts with label ग्रेट भेट. Show all posts
Showing posts with label ग्रेट भेट. Show all posts

Tuesday, February 26, 2013

अवधूत गुप्तेची ची ओपन हार्ट हाताळणी ...खुपते तिथे गुप्ते


कार्यक्रम-खुपते तिथे गुप्ते
वाहिनी-झी मराठी
वेळ- बुधवार गुरुवार ९.३०
पहावा का नाही- न चुकता  पहाणे
मित्रांनो, माझा आवडता छंद चांगले कार्यक्रम ऐकणे आणि पहाणे. ( आणी त्यावर लिहून आपले मत ठोकून देणे J)
झी मराठी वर सुरु असणारा खुपते तिथे गुप्ते त्यातलाच एक ...
तसा हा या कार्यक्रमाचा ३ रा सीजन आहे बहुतेक . हिऱ्याला जसे पैलू पडावेत, चंद्र जसा कलाकलाने अधिक सुंदर व्हावा किंवा आपली आवडती मैत्रीण किशोर वयातून तारुण्यात येताना अधिक सुंदर आणि अधिक हवी हवीशी वाटावी या प्रमाणे हा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक हवा हवासा वाटतो आहे .
मुलाखतवजा ग्रेट भेट , संवाद , Rendezvous अशा कार्यक्रमच्या यादीत हा कार्यक्रम कधी जाऊन बसला ते कळलेच नाही . मार्केटिंग च्या भाषेत आपण यादीत जाऊन सुद्धा आपल (positioning ) वेगळे ठेवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि ते या कार्यक्रमाचे यश आहे असे मला वाटते.
हा कार्यक्रम पाहताना मला तराजू आठवतो ... दोन पारड्यात दोन तितकीच तुल्यबळ व्यक्तिमत्व असूनही पारडे कधी इकडे झुकवावे आणि कधी तिकडे अशा वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने गुप्ते साहेब कार्यक्रम हाताळत असतात.
अवधूत गुप्ते तर माझ्यासाठी हा एक प्रवास आहे . झी च्या पहिल्या सारेगामा च्या पर्वा पासून ते खुपते तिथे गुप्ते च्या तिस-या पर्वापर्यंत त्याच्यातील परीपक्वता उतरोत्तर वाढत गेली पण मिश्कीलपणा कुठेच कमी झाला नाही . मला judge म्हणून त्यांनी मारेलेल्या “ टांगा पलटी घोडे फरार” सारख्या नवीन ट्रेडमार्क कमेंट आणि खुपते तिथे मध्ये आपल्या समोरच्या व्यक्तीच्या वयाला अनुसरून त्यांच्या आयुष्याची काही पाने चाळण्याचा प्रयत्न दोनीही तितक्याच अभिनव आणि “ अवधूत” ब्रान्ड वाटतात
कार्यक्रमाची भक्कम बाजू अवधूत असल्यामुळे मुलाखती साठी समोर कोण आहे याला फार महत्व द्यावे असे वाटलेच नाही. करोडपती मध्ये जसा अमिताभ , वहिनी  कुठलीही असो समोर आदेश भौजी असले की प्रत्येक वहिनी मनमोकळ्या गप्पा मारणारच.... तसेच अवधूत दादा, विनय आपटे असो की की फटाकडी सोनाली कुलकर्णी . प्रतेयक संवाद तितकाच मुलखात देणाऱ्या पाहुण्याच्या  रंगात रंगून जातो.
कार्यक्रमात नेहमीच सांगितल्याप्रमाणे त्यांचा जादूचा फोन ही या कार्यक्रमाची खासियत ...
मग रोहिणी हत्तंगडी यांचा कस्तुरबा गांधी बरोबर झालेला फोन की अजून कोणाचा प्रत्येक फोन तितकाच वेगळा.
मास्क सिनेमा मध्ये जसा मास्क हा फक्त मास्क लावणाऱ्या व्यक्तीसारखा वागतो ,फक्त अधिक उजळ अधिक जादुई ...तसेच खुपते मधला सेलिब्रिटी…. 
 जसा आहे तसाच समोर येतो, फक्त…  अधिक उजळ होऊन
कार्यक्रमाचा वाद्यवृंद उगाच जिथे तिथे म्युझिक वाजवू पाहत नाही ही सुद्धा जमेचीच बाजू
हिंदी सारेगामापा चा विजेता जसराज जोशी याच कार्यक्रमात चमकून गेला होता
दाटून कंठ येतो हे गाणे त्याने इतके भावपूर्ण म्हटले होते की फयाज यांच्या डोळ्यात कधी पाणी आले व आमच्या आईच्या सुद्धा कळलेच  नाही .
थोडक्यात आजकालच्या predicted जगात काहीतर न ओळखता येणारे कार्यक्रम कमीच. यात हा कार्यक्रम नक्कीच गणता येईल
सो ... हृदयाला भिडणारा संवाद आणि थेट हृदयप्रिय कलाकारांबरोबर म्हणूनच म्हणतो हे काही जणू नाजूक ओपन हार्ट करण्याजोगे आहे ..
तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण..... पहायला विसरू नका J
  
जयदीप भोगले
२६ . २. २०१३ 



Thursday, August 19, 2010

हवी हवीशी वाटणारी ... (ग्रेट) भेट



कार्यक्रम  - ग्रेट भेट
वाहिनी - आय  बी  एन  लोकमत 
वेळ   - शनिवार  ९ .३०  रात्रौ, रविवार दुपारी १२   

मित्रहो आपण कदाचित माझे लेख वाचत असलाच पण एक नवोदित ब्लॉगर   म्हणून मला आपल्या प्रतिक्रियांची  ही अपेक्षा आहे . जेणेकरून मी माझे  लेख दिवसेंदिवस सुधारू शकेन, प्रयत्न नक्कीच करेन . शेवट निर्णय आपला आहे .

आय बी एन वाहिनीवर  प्रक्षेपित  होणारा   ग्रेट  भेट  या   कार्यक्रम तसा सुरु होऊन बरेच दिवस झाले पण गेले काही रविवार मी नियमित बघत असतो.नियमीतपणा हा सवयीमुळे किवा आवडीमुळे निर्माण होतो असे म्हणतात
यात आपल्याला ज्यांच्याबद्दल जाणून घ्यावे वाटते , ज्यांनी आपल्या क्षेत्रात विशेष उंची गाठली आहे अशा काही दिग्गज सेलेब्रिटीबरोबर निखील वागळे दिलखुलास बातचीत करतात. मी ते त्यांची मुलाखत घेतात असे म्हणणार नाही कारण मुलाखती इतकी औपचारिकता न आणता पण समोरच्या व्यक्तीच्या आदराच्या स्थानाला धक्का न पोहचवता ते एक एक पान उलटत जातात असे वाटते. भेट मग राजकारणासारख्या रुक्ष भासण-या क्षेत्रातील दिग्गजांची असो की नाट्यक्षेत्रात , चित्रपट क्षेत्रासारख्या चंदेरी दुनियेतील असो ती तितक्याच सहजतेने आणि कलात्मक पद्धतीने पुढे जाते ही  या कार्याक्रमची खासियत वाटते.
गप्पा  होताना निखील वागळे कुठेही त्या व्यक्तिमत्वाच्या आड येतात असे वाटत नाही . हिंदी वाहिनींवर बर-याच वेळा मला असे प्रकर्षाने जाणवते की मुलाखातकाराची उंची आणि स्तर वाढवा आणि त्याच्या कौशल्याचे कुठे तरी मूल्यमापन व्हावे म्हणूनच की काय उत्तुंग व्यक्तींना बोलावण्यात येते आणि ह्यांची सिधी बात कधी वाकड्या वळणावर जाते ते कळतच नाही बहुदा ती सरळ रस्ता गाठतच नाही.
कार्यक्रम अगदीच व्यावसाईक नसल्यामुळे  घाईत लोकल पकडल्यासारखे ब्रेक घेण्याची इथे पद्धत नाही. आणि निखील वागळे आजचा सवाल यात घणाघाती शब्द घाव घालत असले तरी इथे कुठेतरी परिपक्व होऊन आपण कदाचित भेटीला येणा-या व्यक्तीचे स्वगत ऐकत आहोत इतक्या मुक्तपणे कार्यक्रम पुढे नेतात. 

कार्यक्रमातील व्यक्तींची निवड अगदी त्या चपखलपणे केलेली असते. मी निवडणुका असतना मा. शरद पवार, मा. राजसाहेब  ठाकरे. आणि इतर सर्व पक्षांच्या प्रमुख व्यक्तींची भेट बघितली आणि ती माणसे  वेगळ्या पक्षाची आहेत   एवढीच वेगळी वाटली त्यांची कामाची जिद्द , त्यांचा दृष्टीकोन हा सर्व कुठेतरी दिसून आला. त्यांची उंची  आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ आहे असे कुठेतरी वाटुन गेले   . खरेतर निवडणुकींच्या काळात अशा पद्धतीने मुलाखत घेणे मला अवघड वाटते. (मी मुलाखत घेणारा नसलो  तरीही )  
डॉक्टर लागूंची मुलाखत , शोभा दे यांची मुलाखत या मला विशेष आवडल्या कदाचित मला त्या क्षेत्राबद्दल आवड आहे किवा कुतूहल आहे म्हणून सुद्धा असेल .पण बाकी ग्रेट भेटी सुद्धा मला तितक्याच भावून गेल्या.,  कुठेतरी हव्या हव्याशा वाटून गेल्या .
मूल्यमापनच करायचे झाले  तर ई टी वी वरचा संवाद हा एकाच कार्यक्रम कदाचित याच्या स्पर्धेत टिकू शकेल किंवा कदाचित थोडा वरचढ ठरेल असे मला सांगावे वाटते .पण त्यामुळे याची गुणवत्ता कुठेही कमी पडत नाही 
येत्या रविवारी नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेले दिवंगत आ. नारायण सुर्वे यांची पुर्वासंग्रहित ग्रेट भेट असणार आहे हे मला वाहिनीच्या संकेतस्थळावर कळाले. आपण माझ्या मतांशी सहमत असाल किंवा या लेखामुळे आपले भेटीबद्दल कुतूहल वाढले असेल, तर चला तर मग ... वाफाळलेल्या चहाच्या कपाबरोबर एका नवीन भेटीला ...   
जयदीप भोगले 

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...