Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Sunday, November 18, 2018

प्रोजेक्ट जैतापूर

 ...

"खेड्याकडे चला" असं वाक्य कृत्तिका च्या कानावर पडलं.. कॉलेज ची वक्तृत्व स्पर्धा आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यासमोर चौकडा हाफ शर्ट घालून आवेशाने बोलणार अनिकेत होता . बोलके डोळे , खांद्यावर रुळणारे मोकळे केस , भुवयांच्या मधोमध शांती लावते तशी बाण असलेली टिकली आणि खळखळून हसणारे क्लोजप स्माईल असणारी कृत्तिका, हिची स्वप्न तिच्या डोळ्यात असणाऱ्या अनिकेतपेक्षा नक्कीच निराळी होती.
दोघे जेव्हा एकत्र झी मराठी पहायचे त्यावेळी "चमकत रहा" ची जाहिरात पाहून रंगत जाणारी स्वप्न तिची व अनिकेतच्या हातात प्रकाशवाटा व डोळ्यात वाढत जाणारा निर्धार दिसायचा.
ती नेहमी म्हणायची 12 वी नंतर मला मुंबईत जायच आहे,  MBA  करायचं आहे मोठ्या कंपनीमध्ये नोकरी, सगळं मोठं हवं .आपण खेड्यात आहोत म्हणून काय झालं? शहरात हुशार आणि मेहनती लोकांची कदर असते, पैसा मिळतो आणि.. हो खेड्यात असणाऱ्या नजरा सुद्धा नसतात बरका ??
आणि अनिकेत एक स्मित द्यायचा आणि म्हणायचा शहर म्हणजे त्या फुगणाऱ्या बेडकी सारखं झालय कधी फुटेल नेम नाही.. खेड्यात जर विकासाला चालना मिळाली तर एक वेगळ्या महाराष्टची निर्मिती होऊ शकेल . आपण चांगल्या समाजात जाण्यापेक्षा आपण जाताना लोकांना एक नवीन समाज देऊन जावा असं मला वाटतं. गांधीजीपासून ते प्रकाश आमटे यांनी लोकांनी मोठं म्हणावं म्हणून काम कधीच केले नाही .तेवढ्यात अनिकेतच्या आईच्या चहाने त्यांच्या भिन्न विचारांना समान पातळीवर आणले  मग दोघे हसले . कृतिका म्हणाली अहो समाजसुधारक साहेब तुमचे विचार चांगले आहेत पण बाजूला ठेवावे लागतील 12 वीच्या परिक्षेचे वेळापत्रक आले आहे . आणि म्हणाली चल मी निघते.. बाबा आले असतील .
कृत्तिकाचे बाबा स्टेट बँकेत बदलीवर जैतापूर ला आलेले आणि अनिकेत चे बाबा 8 एकर कोरडवाहू जमिनीचे भूमिपुत्र .एकिकडे पहिल्या तारखेची वाट  बघणारे बँक अकाउंट आणि एकीकडे पावसाची वाट पाहणारे बळीराजाचे डोळे अशी अवस्था असताना या दोघांचे मैत्रीचे सूर कसे जुळले याचं सगळ्या जैतापुर ला आश्चर्य होतं. पण फ्युजनच हे एकदम मराठमोळे उदाहरण होतें.हळूहळू अभ्यासाच्या रात्री वाढू लागल्या, हसण्याचा आवाज बदलून डिस्कशनचा झाला दिवस सरले  परीक्षा संपली दोघे 12 चा शेवटचा पेपर देऊन बाहेर आले .अनिकेत म्हणाला चला चहा घेऊ या, ती म्हणाली नको.. मी घरी जाते .  त्यावर तो म्हणाला चल मी सुद्धा येतो बरेच दिवस झाले सिनेमा सुद्धा पाहिला नाही . टीव्ही लावला तर, झी मराठीवर प्रकाश बाबा आमटे आणि झी टॉकीजवर टाईमपास .इथं सुद्धा कृत्तिकाची परीक्षा टीव्ही वहिनी सुद्धा घेतेय असं चित्र होतं.तेवढ्यात कृत्तिकाचे बाबा बँकेतून आले आणि म्हणाले काय अनिकेत कशी गेली परीक्षा? तुमच्या परीक्षेच्या निकलाआधी आमची परीक्षा आम्ही पास झालो असं दिसतंय.  म्हणजे काका? मी समजलो नाही. अरे बँकेने माझी बदली मुंबईला केली आहे पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचंय . मग अनिकेतला कृत्तिका गप्प का याचं कारण लक्षात लागलं.मग 12 वी नंतर काय? ये मुंबई ला.. तिथे चांगली वसतीगृह सुद्धा असतात.you have  good future. नाही काका जैतापूर  च्या शेतकी कॉलेजचा राज्यात वरचा क्रमांक लागतो मी इथेच शिकायचं ठरवलं आहे अनिकेत उत्तरला. माझ्या भविष्यापेक्षा माझ्या गावचं, राज्याचं भविष्य मला जास्त महत्वाचं आहे.बाहेर जाताना तो कृत्तिका ला म्हणाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,आभाळाचा रंगावरून पावसाचा अंदाज बांधणारा तू जा. तुला तुझी स्वप्न आहेत ती पूर्ण मुंबईतच होतील. टाईमपास पाहत होतीस ना टक लावून ?.अंग मला कळतं तुझ्या मनातलं.. पण टाईमपास एक कथा आहे आणि प्रकाश बाबा आमटे ही सत्यकथा.अव्यक्त असून दोघांना उमजणाऱ्या प्रेमाला स्वप्न आणि ध्येय याच्या क्रॉसिंगवर  थांबावे लागले.नेमका त्याच दिवशी आलेल्या वळवाच्या पावसाने दोघांच्या अश्रूंना लपवून टाकले. दिवस पालटले अनिकेत व कृत्तिका दोघे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले . त्याने शेतकी कॉलेज व तिने बेडेकर कॉलेज ला प्रवेश घेतला .मधल्या काळातल्या कोरड्या दुष्काळात हळूहळू दोघांचे जग वेगळे बनले. वक्तृत्व स्पर्धेची जागा आंदोलनाच्या भाषणाने घेतली . जलयुक्त शिवार, शेततळी, कोरडवाहू शेती प्रयोग असे वेगळे विचार जैतापूर ला वाहू लागले. अनिकेत चा 5 वर्षात अनिकेत दादा रूपांतर झाले.  मुंबईत  सुद्धा कृत्तिका एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रूजु झाली.एकाची जमिनीवर राहण्याची व एकीची गगनभरारी घेण्याची धडपड सुरू झाली.कृत्तिका खरंच चमकत रहा च्या जाहिरातीप्रमाणे तिच्या कंपनीमध्ये चमकत होती.रात्री उशिरा काम करून परत येताना आलिशान कार मध्ये कृत्तिका ला अधूनमधून जैतापूर च्या आठवणी यायच्या . "खेड्याकडे चला" हा आवाज घुमायचा पण नंतर पुन्हा “डेडलाईन” हा राक्षस  सगळ्या आठवणींना  मागे टाकायला भाग पाडायचा.
हळूहळू राजकारण हे ऑफिस आणि जैतापूर या दोन्हीकडे शिरकाव करत होते .एकीकडे समाजकारण आणि एकीकडे अर्थकारण या जगात योग्य राजकारण किती महत्वाचे आहे हे एका ध्येयवेड्या व एका स्वप्नवेडीला समजावत होते. खेड्याला योग्य न्याय हवा असेल तर योग्य  व्यासपीठ शहरात आहे, मंत्रालयात आहे हे विचार प्रोजेक्ट जैतापूर- चळवळ चालवणाऱ्या अनिकेतच्या मनात घर करत होते. राजकीय वर्तुळात सुद्धा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख वाढत होती .कृत्तिका तिच्या कंपनी मध्ये शेतमालाच्या भावांमध्ये होणाऱ्या अवमूल्यनामुळे उद्विग्न होत होती . सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला खरा भाव न देता organic म्हणून माल दुप्पट नफ्याने विकणाऱ्या लोकांची तिला चीड येत होती .
या दरम्यान अनिकेतचे आमदार म्हणून निवडून येणे , वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्याच्या प्रोजेक्ट चे होणारे कौतुक कृत्तिका च्या नजरेसही पडले होते. या गोष्टीचे कौतुक व आश्चर्य दोन्ही तिला होतेच पण काळाबरोबर त्यांचे मार्ग बदलले होते कदाचित फोन नंबर सुदधा...
 १२ वी मधला अनिकेत तिला नेहमी आठवायचा शेतकऱ्याबद्दल तळमळ आठवायची व सगळ्याचा उद्रेक होऊन तिने एक दिवस धाडस करून कोर्पोरेट दुनियेला रामराम ठोकला व तिने शेतकऱ्यांच्या मालाला नीट भाव मिळावा यासाठी NGO स्थापन केली व तिचा सुद्धा पहिला प्रोजेक्ट होता.. प्रोजेक्ट जैतापूर .
त्याच दिवशी मुख्यमंत्रि महोदयांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली आणि  अनिकेत ने कृषिमंत्री पदाची शपथ घेतली .वर्तमानपत्रात मथळा होता प्रोजेक्ट “जैतापूर चळवळीचे प्रणेते अनिकेत पाटील यांची कृषिमंत्री म्हणून नियुक्ती”
.दोघांची स्वप्न व ध्येय प्रोजेक्ट जैतापूर या समान नावाने का होईना पुन्हा नव्याने कदाचित एका वाटेवर  आली होती.

जय
१८ ऑगस्ट २०१८

Thursday, March 3, 2011

..वॅक्सीऩ (कथा )



वाशी पोलीस चौकीत आज एक विचित्रच दृश्य होते .. एक सुंदर आणि तडफदार वार्ताहर मीनल जोग चक्क चौकीत आली होती .. खाकी आयुष्यात हि हिरवळ प्रत्येक पोलिसाच्या चेह-यावर दिसत होती .
'मला अभिनव सपकाळ ला भेटायचे आहे' ती उद्गारली ...
 बाई त्यांना तुम्हाला भेटता येणार नाही  मीनलकडे न बघता हवालदार म्हणाला  .. पण माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर  आहे .. बाई कशाला त्या नागाला भेटता आहात ..खुनी आहे तो आणि ते सुद्धा तीन तीन 
पाणीप्रश्न , भ्रष्टाचार , नवीन सिनेमे ,इकडे लक्ष द्यायचे सोडून तुमच्यासारख्या शिकलेल्या वार्ताहराने इकडे यायचे आणि उगीच फुकट वेळ घालवायचा .. शासनाचा आणि तुमचा .. 
बर आता तुमच्या शासनानेच पत्र दिले आहे ना... मग सोडता का मला मीटिंग रूम मध्ये ? बर तुमच्या झडती वगैरे फोर्म्यालिटी  करून घ्या .. तसे आम्हाला आमचे पेन हे शस्त्र पुरेसे असते साहेब आणि मी शस्त्र बाळगत नाही ..
घुगे बाई , बाईंची झडती घ्या आणि त्यांना मीटिंग रूम मध्ये बसवा आणि त्या अभिनव सपकाळ ला आणा आणि हो... बेड्या तशाच ठेवा लई बाराचा आहे तो .
परब हवालदार दुरून मीनलचा  आढावा घेत, तंबाकू चोळत  कोठावळे हवालदाराला म्हणाला ..' आयला बाई वरपासून खालपर्यंत कसा आयटम बॉम्ब आहे आणि म्हणते की माझ्याकडे काही शस्त्र नाही ' 
मीटिंग रूम मध्ये दोन लाकडी खुर्च्या आणि एक मोठे टेबल होते दोन खुर्च्यामध्ये बरेच अंतर .. एक छोटा ६० चा दिवा आणि तो जवळजवळ १५ फूट उंच त्यावर सुरक्षा टोपी आणि जाळी लावलेली ..
एक पंखा ... आयुष्याची शेवटची घटका मोजत असल्यासारखा फिरत होता 
..बाई बसा .. आणि हो नुसते बसा आरोपीच्या जवळ वगैरे जायचे नाही .. तशी ऑर्डर आहे ... 
साहेब मी एक जबाबदार नागरिक आहे .मला माझे काम करायचे आहे ..मी गप्पा मारयला नाही आले सपकाळ कडे ..मीनल पोलाईट अशी हळुवार बोलली . ' नाही म्हटले नियम सांगितलेला बरा'... परब टोपी सावरत म्हणाले .
अभिनव आला .. मिनलच्या बरोबर समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला ...
 हातात बेड्या .. चौकडा शर्ट , जीन्स , चौकोनी मेटल फ्रेम  चष्मा. ..पोलीस कोठडीमध्ये दोन दिवस राहिल्यामुळे  थोडीशी खुरटलेली दाढी ..५ फुट १० इंच उंची .. सोल्जर कट केस कापलेले ...स्थिर दृष्टी आणि
 चष्मा नाकाला खाली आल्यानंतर थोडेसे वर करण्याची सवय . कुठल्याही माणसाला हा बाहेर भेटल्यास हा एक हुशार सी ए  किंवा इंजिनीअर आहे असेच वाटले पाहिजे आणि टी डी एच कॅटेगरी मध्ये येणारा असल्यामुळे 
ब-याच मुलीनाही तो हवा हवा वाटेल असा ... हा मनुष्य खुनी .. काही पटत नव्हते
एम एस सी बायो केमिस्ट्री फर्स्ट क्लास गोल्ड मेडल मिळवणारा अभिनव सपकाळ खुनी ... काही मनाला पटत नव्हते म्हणून आले ..' हाय 'आय अॅम...'.... मीनल जोग ना? अभिनव उद्गारला ..
तुम्हाला माझे नाव कसे माहिती? मीनल थोडी आश्चर्याच्या धक्का लागून न दाखवता म्हणाली .. अहो माझे शिक्षण तुम्हाला माहिती .. मार्क माहिती .. मग मला तुमच्यासारख्या पब्लिक फिगर  चे नाव नको माहिती ?
पण मी एक वार्ताहर आहे दर वर्षीचा युनिवर्सिटी चा  निकाल मला माहित असतो .. आणि तडफदार लोकांबद्दल माहिती ठेवणे हा माझा छंद आहे .. अभिनव पुटपुटला ..
असो अभिनव मला तुझी कहाणी ऐकायची आहे ... मला अजूनही विश्वास बसत नाही की असे काही घडले असेल .. मी अॅडवोकेट परांज्प्यानाही ओळखते त्यांना मी ही केस समजावून सांगते .. 
जर जगातून एक हुशार माणूस  या सिस्टीमच्या हलगर्जीपणामुळे जाणार असेल तर माझी लढ्याची तयारी आहे ...
थ्यांक यु मीनल तो एकेरीवर आला ...खरे म्हणजे एक खुनाला फाशी आणि दोन  खुनाला तर नक्कीच मिळणार म्हणून मी अशा सोडून दिली होती .. पण तू आलीस आणि आधार वाटला .. फील सो रील्याक्सड ..
पण अभिनव यात तू अडकलास कसा .. आय मीन सिस्टीम मध्ये पाणी मुरते पण कुणालाही ती खुनासाठी नक्कीच पकडत नाही ...
मीनल मी एम एस सी झालो आणि काहीतरी करावे जगाला काहीतरी द्यावे याने झपाटून उठलो .. मी एका ग्यारेज मध्ये एक छोटी प्रयोगशाळा चालू केली .. रात्रंदिवस तिथे पीपेट आणि ब्युरेट माझे मित्र बनले ..
एक शोधाने मी झपाटून गेलो होतो. जेवायची शुद्ध नव्हती. आणि तो दिवस उजाडला .. मी माझे रिसर्च पूर्ण केले होते ... प्रयोग यशस्वी झाला होता...
कुठला शोध ?  ' अभिनव ने इकडे तिकडे पाहत हळूच मीनल ला सांगितले याबद्दल कुणाजवळ सुद्धा बोलयचे नसेल तर मी सांगतो कारण सध्या हे फक्त मलाच माहित आहे ..
मीनलची उत्कंठा वाढत होती ...ट्रस्ट मी आणि तुझ्याकडे कदाचित ऐकून घेणारे आणि पोहचणारे अजून कुणी आहे असे मला वाटत नाही ..
अभिनव हळूच म्हणाला .. मी एक ..वॅक्सीऩ तयार केले आहे ...... कसले .?..अॅन्टी वायरस ...  जे  कुठल्याही वायरसपासून  तुम्हाला प्रोटेक्ट करेल ..तुम्हाला मुक्त करेल अशी संजीवनीच समज ना...
मीनल आवक होऊन त्याकडे पाहत होती ... अॅन्टी जीवाणू  औषधे ..वॅक्सीऩ  आहेत पण हे जरा विचित्र आणि अभिनवच होते ...
हे मग तू कुणाला प्रेजेंट का  केले नाहीस . त्यातच प्रोब्लेम झाला मीनल ...आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला
मीनल ला काही समजेना .. तिने शांत राहूनच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला ..एक पाच मिनिटानंतर त्याने पुन्हा बोलायला सुरु केले 
मी गिनिपिग वर ते प्रयोग केले पण मला माणसावर तो प्रयोग  करायचा होता . मी माझ्यावर तो केला असता पण त्यावेळी जर काही घडले तर उपाय करायला कुणी असायला हवे म्हणून मी माझ्यावर केला नाही.
एके दिवशी मी रात्री मानखुर्द हून परत येत होतो .. स्टेशनवर उतरलो .. सामसूम होती ..एक तरुण मुलगा मला दिसला ... तो चालत होता त्यावेळी मी म्हणालो सेक्टर २१ ला जाताय का ? तो म्हणाला नाही १९ ..
मी म्हणालो आपण बरोबर चालत जाऊ या का ? मला कुत्र्यांची जाम भीती वाटते ... मग आम्ही चालता चालता कळले की तो कॉल सेंटर मध्ये कामाला होता ...
मग त्याला मी माझी कथा सांगितली आणि हळू हळू जर प्रयोग यशस्वी झाल्यास त्याला रीतसर मानधन देण्याची कबुली दिली .. मुलगा तयार झाला  ... तो माझ्याबरोबर  आला .. मी रूम वर आलो आणि त्याला बसायला सांगितले हळूच मी सिरींज आणि फ्रीजमधून ..वॅक्सीऩ  काढले ... छाती धडधडत होती ...त्याला दिले आणि त्याला हळू हळू अंधारी यायला लागली .. मी त्याला विचारले कसे वाटते आहे ? तो म्हणाला खूप झोप येते आहे ..
मग हळूच त्याच्या खिशाकडे माझे लक्ष गेले .. मला एक हाताने वळलेली सिगरेट दिसली .. मला त्यात हशीश होते हे कळायला वेळ लागला नाही .. 
मी त्याला बाहेर पोहचवले आणि घरी जायला सांगितले .
सकाळी उठलो तर रस्त्यावर बरीच गर्दी होती पाहिले तर रात्रीचा मुलगा होता .. तो मरून पडला होता ... मला कळून चुकले होते .. की त्याच्या ड्रग घेण्यामुळे ..वॅक्सीऩ  ने काम केले नव्हते आणि कदाचित ड्रग ओवरडोस मुळे त्याचा मृत्यू झाला होता ..
मी घाबरलो आणि तिथून निघून गेलो ... कदाचित मी खून केला आहे असेच लोक समजतील म्हणून मी ती जागा सोडली ... काही ..वॅक्सीऩ बरोबर घेतल्या ..
सेक्टर ४९ मध्ये घर घेतले .. तीन महिन्यानंतर पुन्हा प्रयोग चालू केले एका गायीवर आणि कुत्र्यावर केले आणि ते यशस्वी ठरले .. पुन्हा मला माणसाची गरज होती जो याला तयार होईल ..
एकदा पनवेलहून रात्री येत होतो ... उतरलो आणि चालू लागलो ... गाडी सायडिंग ला जाणार होती .. अचानक मला लेडीज डब्यात एक वेडसर बाई दिसली .. तिने मला पाहताच वडा पाव वडा पाव असे ओरडायला चालू केले..
मला वाटले हीच एक संधी आहे .. ही काही ड्रग घेणारी .आजारी दिसत नाही . वेडाचा सबंध मेंदूशी ... मी हळूच माझ्याजवळ असलेले चिप्स काढले आणि तिला दिले ..
ती अधाशासारखी तुटून पडली .. मी हळूच सिरींज आणि ..वॅक्सीऩ  काढले .. आणि तिला दिले .. २० मिनिटानंतर तिला चक्कर यायला लागली .. माझ्या ..वॅक्सीऩ  दिल्याचा अर्धा प्रयोग यशस्वी झाला होता.
हातावर एक फोड आला होता.. मला प्रयोग यशस्वी वाटला ...आणि नंतर अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली ... मी तिला ओब्सर्व करायला सुरु केले ...तिचा श्वास  बंद पडू लागला होता..
अचानक तिच्या डोक्याला ती   झटके देऊ लागले .. आणि ती बहुतेक गतप्राण झाली ..
दोन्ही वेळी माझ्या ..वॅक्सीऩ मुळे काही न होता त्यांच्या आजारामुळे मला अपयश आले होते ..मी घाबरून पळ काढला पण सिरींज तिथे होते ..
काही महिन्यानंतर पोलिसांनी मला पकडले आणि आता मी कोठडीत आहे .. 
मीनल चे डोके सुन्न झाले होते दोन तास कधी संपले ते तिला कळले नाही .. ती तडक तिथून उठली  आणि चालू लागली..
तुम्ही तरी विश्वास ठेवाल वाटले होते .. अभिनव आशेने म्हणाला ...पण तिने परत मागे पाहिले नाही ..
दोन दिवसांनी ती परत पोलीस चौकीवर आली .. यावेळी ती जास्त निर्विकार आणि ठरवून आल्यासारखी वाटत होती ...
तिने पुन्हा फोर्म्यालिटी केल्या .. परवानगी मिळवली .. अभिनव यावेळी जास्तच भयानक वाटत होता .. त्याला कदाचित थर्ड डिग्री मिळाली होती .. रक्त साकळल्यासारखे  वाटत होते.
त्याच्याकडे पाहून  तिने एक स्मित केले आणि म्हणाली .. अभिनव आय अॅम विथ यु .. मी दोन दिवस विचार  केला नेटवर माहिती काढली ...तुझा शोध जगापुढे पोहचवणे आवश्यक आहे ... मला सांग मी कशी मदत करू शकते .. मी माझ्यावर प्रयोग करायला तयार आहे .. पण अभिनव म्हणाला मला बेड्या आहेत .. आणि ..वॅक्सीऩ  घरी आहे .. पोलिसांनी घर सील केले आहे ...
ती म्हणाली ते माझ्यावर  सोड .. मी उद्या परत येईन .. तुझी सुटका माझ्यावर लागली .. आणि जगाच्या पुढे शास्त्रज्ञ आणण्याचे क्रेडीट माझे ...दोघांनी एक स्मित केले 

सेक्टर ४९ च्या खोलीकडे मीनल गेली ... आढावा घेतल्यावर कळले .. पोलिसांनी दरवाजा सील केला होता पण खिडकी नीट बंद नव्हती तिने हळूच ती उघडली .. फ्रीज समोर होते . वार्ताहराच्या जीवनातला सर्वात थरारक क्षण ती अनुभवत होती . तिने खिडकीला हलवले आणि दोन गज गळून पडले .. मुंबईच्या पावसाने आणि खा-या हवेने तिचे काम सोपे केले होते .. खिडकी गंजलेली होती ..
तिने आत चढून व्याक्सिन आणि सिरींज घेतली पर्स मध्ये टाकली .
दुसरा दिवस एक ऐतिहासिक ठरणार होता .. तिला झोप येत नव्हती .. कसे बसे झोपून सकाळी १० वाजता तिने पोलीस चौकी गाठली ...
परब कोठावळे हवालदार आता मीना जोग ला जणू ओळखायला लागले होते .. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी झडती वगैरे झटपट होऊन गेली ...
आधी मीटिंग रूम च्या शेजारी उभ्या राहणा-या    कॉन्स्टेबल  घुगे  बाई इकडे तिकडे टंगळ मंगळ करत होत्या  .
अभिनव आला ... आज तो बराच बारा दिसत होता .. डोळ्यात कसली तरी चमक वाटत होती . तो तिथे बसला ..
मीना जोग ने कन्सेंट बरोबर लिहून आणले होते .. हा प्रयोग ती स्वखुशीने करत आहे हे त्यात नमूद होते ... पण कुठे ना कुठे अभिनव वर विश्वास बसला होता ..
तिने अभिनवच्या मार्गदर्शनाने व्याक्सिन सिरीन्ज्मध्ये घातले आणि आपल्या उलट्या हातावर च्या शिरे मध्ये हळूच सोडले .. अर्ध्या तासासाठी चक्कर येणार हे तिला माहित होते .. यामुळे ती चक्कर आल्यावर निषींत होती ..पण अभिनव ने तिला विचारले ... आता कसे वाटते आहे ?
 ती म्हणण्याच्या अगोदरच तो म्हणाला आता तुला हळू हळू सुन्न वाटू लागेल आणि डोळ्यासमोर अंधारी यायला लागेल..',मीना  आयुष्याच्या  शेवटच्या क्षणी सगळ्यांना  असेच होते'  अभिनव थंड पणे उद्गारला 
 ... हे वाक्य ऐकताच तिला धक्का बसला .. तिन हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण शरीर अधू वाटू लागले होते. अभिनवच्या चेह-यावर एक आसुरी आनंद यायला लागला होता ... अत्यंतबेडरपणे त्याने हसायला चालू केले 
आणि म्हणून लागला ' इनिस्पेक्टर सांवत ने मला सांगितले होते की त्यांच्या चौकीत आता आलेला खुनी फासावर गेल्यावर  सुटका होते .. तू २ ३  लोकंना विनाकारण आपल्या विकृत मनोवृत्तीने मारुन टाकले आता बघू कसे मारशील ?'
 मी बाहेर कुत्री गाई माणसे मारली .. मी म्हणलो होतो ना त्यांच्यावर प्रयोग केला ....
मी मनाशी ठरवले होते .. 'आयला   पोलीस कोठडीत मारण्यात एक वेगळेच थ्रील आहे' ...आणि या वाक्याने मीनल ने हंबरडा फोडला .. पोलीस गोळा झाले .. सिरींज पाहिल्यावर मीनल जगणार नाही हे त्यांना कळून चुकले होते..
३ खून करणा-या नराधम अभिनव ला चौथ्या खुनानंतर सुद्धा  एकदाच फाशी होणार होती .. कदाचित मनोरुग्ण म्हणून त्याला असायलम मध्येच जिवंत ठेवावे लागणार होते ..
परब यांना मी शस्त्र बाळगत नाही या मीनल च्या वाक्यावर खूप वाईट वाटले .. आणि त्यांनी मनाशी म्हटले बाई तुम्ही शस्त्र नाही  ठेवले पण एका खुन्यावर विश्वास ठेवला ..खुन्यावर विश्वास ठेवला  

जेडी 
३ मार्च २०११ 

या कथेतील ठिकाण आणि पात्र या सर्व काल्पनिक आहेत ..कृपया यावरून कुठलाही ग्रह माणू नये किंवा विचार करू नये 

Thursday, February 24, 2011

उ:शाप (कथा )

नुकताच  इंजिनीरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता  आर ई सी त्रिची मध्ये अॅडमिशन मिळाल्यामुळे जामच खुश होतो .. तसे पुण्याच्या वी आय टी मधून ती कॅनसेल केल्यामुळे पुणेरी शालजोडीतून बरेच मिळाले होते .कोथिंबीर वडी आणि मिसळ सोडून कुठे तो सांबर भात खायला जाणार आहेस .. पुणेरी मुलींची सर येणार आहे का ? वगैरे मी म्हणालो ' मायला ' तिथे कमीत कमी काळी सावळी ललना पाहायला तरी मिळेल इथल्या पुणेरी स्कार्फ मध्ये ललना आहे का .. 'चल ना' कसे कळणार त्यामुळे मला काही गम नाही
.
१९ वर्षात आल्यामुळे एखादी मैत्रीण असावी हे नेहमीच वाटे पण नेहमी मनात मांडे खाणे इतकाच धंदा ..
कॉलेज ला गेलो  काही दिवसात माझा वाढदिवस जवळ आला २३ ऑक्टोबर ... बर १९९६ मध्ये मोबाईल वैगरे विरळेच आणि असले तर कॅमुनिकेशन च्या सेमिनार मध्ये बघायला मिळायचे .. एस टी डी चे रेट अचाट असायचे त्यामुळे पत्रांची वाट पहावी लागायची .. फुटकळ कार्ड आल्यानंतर सुद्धा इतका आनंद व्हायचा  की की सांगू .....
 तर २३ ऑक्टोबर... सकाळ झाली मुलांनी विश केले . घरचे फोन येऊन गेले .. दुपारी जेव्हा जेवायला होस्टेल वर आलो तर एक ग्रीटिंग आले होते .. नाव कुणाचे नव्हते ...ग्रीटिंग उघडल्यावर सुद्धा फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या एक स्मायली काढले होते .. मला अंदाज येईना .. की माझा वाढदिवस इतका कुणाला माहिती? ...कारण लहानपणी मित्रांना जोपर्यंत माझा आज वाढदिवस आहे हे सांगितल्याशिवाय कळायचे नाही .. आणि लहान गावात ग्रीटिंग वगैरे फॅड अजून यायचे होते .. मला आठवी पर्यंत बिस्कीट चे पुडे आणि पेन्सिल याच्याशिवाय काही गिफ्ट मिळाले नाही ..आणि आज हे निनावी ग्रीटिंग .. मित्रांना खाद्य मिळाले .. एकाने मग लिंबाच्या रसाने काहीतरी त्यावर लिहले असेल इतके डोके लाऊन ग्रीटिंग अक्षरशः जाळण्याचा प्रयत्न केला ..
श्रीकांत म्हणाला लपंडाव सिनेमा सारख्या तीन फुल्या सुद्धा नाहीत आणि तीन बदाम सुद्धा ... मी म्हणालो हा सिनेमा नव्हे ..
मग सगळे करमचंद बनून ग्रीटिंग कुणाचे यावर तर्क वितर्क करू लागले ... मग निखील ने एक नामी आयडिया काढली... स्टॅम्प कुठला आहे तो पहा मग आम्ही पोस्टाच्या स्टॅम्प  शोधणे हे सर्वात अवघड काम करू लागलो ..
मग एकाने भिंग आणले आणि पुसटसे काहीतरी लातु असे काहीतरी दिसले आणि मग कळले की आपल्याच गावाहून आले .. मग उधार घेऊन रात्री १/४ चार्ज झाल्यावर मित्रांना फोन झाले पण पत्ता लागेना 
पण इतके कळले की आपण एकाच्या लिस्टवर जरूर आलो ..

मग  दिवस गेले ( दिवसामागून )  नाताळच्या सुट्ट्या मध्ये घरी आलो एका कप्यात आपल्याला ग्रीटिंग देणारी व्यक्ती कोण याचा विचार होताच ...
मग एके दिवशी एका फॅमीली फ्रेंड च्या घरी गेलो त्यांची मुलगी नुकतीच १२ वी ला गेली होती .. तिची विचारपूस आणि मग आर ई सी ला कसे जायचे ते सांगितले .. ती गालातल्या गालात हसत होती .. तिला म्हटले की की झाले मग तिने सांगितले की माझी एक मैत्रीण तुमच्या घराच्या शेजारी राहते मग मी कोण वगैरे विचारले आणि तिने सांगितले की  रीमा ... मी म्हणालो ती होय  हां .. फार घाशीराम कोतवाल आहे ती फार अभ्यास करत राहते मला आठवले की मी जितका १० वी मध्ये अभ्यास करायचो ती सातवीत करायची .. माझ्याकडे अभ्यासाला येऊन बसायची आणि मला टी वी पहा , झोप ये .. असले व्हायचे जाम राग यायचा ... 
मग तिला विचारले हं  तिचे काय ?    तिला एक मुलगा आवडतो .. मी म्हणालो आयला काय सांगतेस?
 .. मी म्हणालो ती कोणाला आवडेल? .. कारण ती अतिशय काळी होती ..तिचे लग्न होईल तिचा स्वभाव चांगला असेल वगैरे ठीक पण किशोर वयातल्या पहिल्या प्रेमासाठी तिची कुणी निवड करणे खरेच कठीण होते .. याला ' सो  मिन' म्हणा की वस्तुस्थिती  पण असेच  काही होते
ती माझी मैत्रीण वगैरे कधीच नव्हती पण शेजारी , हुशार , अति अभ्यासू ( घाशीराम ) म्हणून मला ती चांगलीच माहिती होती .. ... 
मग मिनू  ने सांगितले कदाचित तिला तू आवडतोस  म्हणजे जरा पाणी जास्तच डोक्यावरून चालले आहे .. ती वर्गात अभ्यास करत नाही . दहावीला मेरीट येऊन १२ विला चांगल्या कॉलेज ला सोड पण बी एस सी ला प्रवेश मिळणे कठीण .. मला वाईट वाटले पण वाईट वाटले तरी यात मी तडजोड नक्कीच करू शकत नव्हतो .. मला जरा हुरळून गर्व सुद्धा झाला .. की आपल्याला भाव आला वगैरे ... 
मग काही दिवसांनी मी धाडस करून तिच्या घरी गेलो .. तिच्या डोळ्यात कामातून गेल्याच्या सर्व झलका दिसत होत्या ..
मी उगीच काकू आहेत का वगैरे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला .. पण तिला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता ... तिला मी मग उसने अवसान होऊन विषय काढला .. २० व्या वर्षी असली हाताळणी करणे कठीण आहे पण मग हळू हळू तिने अभ्यासाला कशी प्रायोरिटी दिली पाहिजे वगैरे सांगितले .. तिच्या डोळ्यात पाणी आले होते .. पण मला डोक्यावरून पाणी जाताना दिसत होते .. पिच्छा सोडवायचा एवढाच विचार होता .. मन वैगरे खोली मोजलीच नव्हती .. मी तिचा निरोप घेतला . आता त्यांच्या घरी सुद्धा चुकून जायचे नाही हे ठरवले होते . एकतर्फी प्रेमाची कत्तल करून मी विजयी वीर होऊन मित्रांना पीछा छुडाया  वगैरे सांगत होतो ..
काही वर्ष लोटली .. एफ एम एस ला आलो दिल्ली मध्ये .. दिलफेक स्वभावामुळे चिकार मुली आवडल्या पण प्रेम वगैरे जमले नाही .. २५ आली होती जरा परिपक्व जालो होतो .. कुठेतरी प्रेम शोधावे म्हणून विचार करत होतो
आपण दिसायला चांगले आहोत .. हुशार आहोत बोलयला बरे आहोत वगैरे डोक्यात ठेऊन मला प्रेमाच्या दुनियेत एखादी फटाकडी नाही तर छानसी तरुणी नक्कीच भाळेल असे उगाच वाटायचे .. 
प्रेमात दिसण्याला , पैशाला , स्वभावाला काही महत्व नसते कदाचित लग्नाच्या विश्वात असेल .. हे मला कधी कळलेच नाही ...
आणि कॉलेज मध्ये एक तमिळ मुलगी मला आवडाय लागली .. ती माझी प्रोजेक्ट मेट होती नंतर आमच्या होस्टेल वर यायची आणि मग .. तीच हवी हवीशी वाटाय लागली .. मला दिसणे , स्वभाव असल्या सगळ्या गोष्टींचे हसू यायला लागले .. कारण मी गोरा ती कुरूप यात मोडणारी. मी रोड ,ती बेढब  मी शांत ती तापट असले सगळे भिन्न प्रदेश एकत्र येऊ पाहत होते .. पण मला कदाचित फक्त आमचा सहवास आमची मैत्री आमचे मनप्रत्येक गोष्ट घडल्यानंतर तिची साथ इतकेच दिसायचे .. यात शारीरिक आकर्षणाला थारा नव्हता ..
आणि एक दिवस अचानक  हळू हळू ती माझ्याशी अचानक तुटक वागू लागली .. मला कळेचना का ? मी पुष्कळ प्रयत्न केले .. पत्र जाऊन  मोबाईल चा जमाना आला होता .. कित्येक एस एम एस केले पण तिने मोबाईल उचलणे बंद केले 
मी अस्वस्थ होऊ लागलो .. आणि एकदा परीक्षेच्या दिवशी तिने मला सांगितले .. मूव ऑन यार .. तू फक्त मित्र होतास .. आणि आता  तुझ्या अशा वागण्यामुळे मला मित्र सुद्धा वाटत नाहीस .. मला तुझी भीती वाटते 
तू अभ्यासावर लक्ष दे आयुष्य तुझ्या पुढे आहे ... माझ्या डोळ्यातले पाणी आपोआप बाहेर येऊ लागले ...
मी केलेली एकतर्फी प्रेमची कत्तल आता माझच खून करू पाहत होती ..मला प्रत्येक दिवशी  तरुणपणात रंगावरून डावलून, भावनांना महत्व न देणा-या माझी आठवण झाली ..
कदाचित त्या गर्वाचा शाप मला लागला होता .. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन फक्त मनापासून प्रेम करणा-या मला अगदी तिच्यापेक्षा डाव्या मुलीकडून नकार मिळाला होता ...माझे अभ्यासातले लक्ष उडाले होते ..
पहिल्या वर्षात उत्तम कामगिरी करणारा रवी आता अस्ताला लागलेल्या सूर्यासारखा भासत होता ...माझ्याबरोबर  प्रत्येक गोष्ट जवळ जवळ रीमाबरोबर घडल्यागत होत होती ...
शाप ही संकल्पना खरी आहे का काय मला भासू लागले ... दिवसामागून दिवस लोटले ... अचानक आईने विचारले एक फोटो आहे पाहतोस का ? मुलगी छान आहे ... 
आणि काही दिवसांनी रविचे एका सुरेख   मुलीशी लग्न झाले आणि बहुतेक शापाला ... उ:शाप  मिळाला  

Thursday, February 17, 2011

प्लॅनचेट-(कथा )

या गोष्टीला एक १५  वर्ष झाली असतील ... मी इंजिनीरिंग च्या फर्स्ट इअर ला होतो .. आमचे कॉलेज एक मोठा कॅम्पस होता .. १२०  एकर चा  ..त्यावेळी रॅगिंग ही बरेच असायचे .. डिसेंबर चे दिवस 
आमचे पहिल्या युनिट टेस्ट चे दिवस होते . परीक्षा कधी असणार केव्हा होणार सर्व डेट बोर्डावर लागल्या होत्या .. आणि युनिट टेस्ट नंतर आम्हाला नाताळ च्या सुट्ट्या लागणार होत्या.
त्यावेळी इंटरनेट रिजर्वेशन वगैरे भानगड नव्हती त्यमुळे रीतसर २ तास कुरतडून ,चिडून, घामेघूम होऊन आम्ही आमची तिकिटे  १५ दिवस अगोदरच काढली होती .. नेत्रावती एक्स्प्रेस . कॉलेज ला अडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदाच घरी जाणार असल्यामुळे ते तिकीट रोज एकदा उघडून दहा वेळा पाहून पाहून होत होते .. उगाच वाटायचे की कदाचित लवकर दिवस संपतील आणि तो दिवस जवळ येईल ..असेच दिवस अभ्यासात, रॅगिंग सहन करत  मी टेस्ट ची वाट पाहत होतो .. अभ्यास करत होतो का नाही ( आठवत नाही ) न बोललेले बरे 
शुक्रवारचा दिवस तो ..  केरळ मध्ये असल्यामुळे थंडी वगैरे नव्हती पण थंड गार वारा नारळाच्या झाडांमधून येऊन ओशट वाटत होता ... आम्हाला शनिवार रविवार सुट्टी होती .. इंजिनीरिंग ची मुले अभ्यास किती करतात याची कल्पना सगळ्या इंजी नरांना  असेलच ...असो . तर आम्ही सगळी मित्र मंडळी शुक्रवार असल्यामुळे एकत्र  ३२४ रूम मध्ये होतो .. मी निखील श्रीकांत गौरव सुनील कश्यप आणि हं संतोष असे सगळेजण गप्पा मारत बसलो होतो .. सुरवातीला रॅगिंग,नंतर येणारे सिनेमे , डंब शेरॅट आणि हळू हळू रात्र झाल्यानंतर मुलांचा आवडीचा विषय ( मुली नाही ) भुतांच्या गोष्टी चालू झाला . मग राजस्थान मध्ये दुधू च्या हाय वे वर कसे चकवे असतात 
भानामती, करणी, आजोबांच्या भूत पाह्लेल्या दंत कथा याला उत येऊ लागला.
 हळू हळू .. सगळेजण जवळ जवळ सरकून हळूच शालीमध्ये शिरून आखडून घेऊन सगळ्यांची हवा टाईट होते आहे हे दाखवू लागली ..
मग मधेच मुन्नालाल मीना एकदम रात्री १.३० वाजता अळोके पिळोखे देत रात्री उठला आणि त्याने आमच्या रूममध्ये डोकावून त्याच्या टिपिकल स्टाइल मध्ये विचारले  ' आज सोना नाही क्या .. ये घाटी लोग बडे पढ रहे है .. ..मग संतोष ने एक शिवी हासडत त्याला सांगितले. हमने किताब क्या ?  फुल्या फुल्या ...xxx .. तो  रात्री ज्या कारणाने उठला होता त्यासाठी तडक बाथरूम च्या दिशेने पळाला.. एक हशा पिकला.
मग एक विषय निघाला प्लानचेट .. त्यावर चर्चा झाली .. श्रीकांत नागपुरी भाषेत' साले मजाक मत करो इधर पहले ही कबसे मुतने जाना है लेकीन जा नाही राहा हु' मग त्याला फट्टू वगैरे चिडवून झाले .. सगळ्यांनी मग उसने अवसान आणून सार्वजनिक मुत्र विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला .. आणि रूम मध्ये येताच  लाईट गेले      
केरळ मध्ये पावर कट नेहमीचे होते पण आजचा पावर कट जरा जास्तच सिचुएशन ला साथ देणारा होता . मग निखील .. " शीट यार मेरेको पढने का था " तितक्यात गौरव डोक्यावर मेणबत्ती घेऊन " कही दीप जले कही दिल  करत आला .. आणि मग संतोष ने एक बॉम्ब टाकला .. तुम्हाला माहित आहे मला प्लॅनचेट  येते? .. मग थोडा हशा .. कोणी... सही मे? क्या ?मजाक मत कर... असे सर्व उद्गारवाचक प्रश्न चिन्ह दाखवीत सगळेच अचंभित झाले होते 
मग त्याने एक कॉईन आणले एका पेपरवर ए ते झेड  अक्षरे १ ते ९ आकडे  एका ठिकाणी येस एका ठिकाणी नो असे काढून एक पट तयार केला .. सगळ्यांना हे नवीन होते  त्यामुळे त्याला हे जमते हे हळू हळू वाटायला लागले होते. मग ती मेणबत्ती पटाच्या मधोमध ठेऊन तो डोळे मिटून कॉईन वर हात ठेवून ध्यान धरून बसला .. सगळे शु शु करत गप्प बसून अंधुक प्रकाशात तो अनुभव घेऊ लागले .. २.३० वाजले होते 
मग अचानक संतोष चा हात लवकर लवकर फिरू लागला .. कदाचित कोणी तरी स्पिरीट आले होते वाटते ..
मग त्याने सांगितले तुझे नाव सांग ... त्याने ...हळू हळू एका एका अक्षरावर नाणे नेऊन सांगायला सुरवात केली 
त्याचे नाव अनप्पा आहे हे कळले ..आम्हाला वाटले केरळ मध्ये पंजाबी भूत थोडीच येणार .. ट्रेन चे तिकीट तर मिळायला हवे ना ... 
मग संतोष म्हणाला  आता याला हवे ते विचार मग आम्ही हळू हळू आम्हाला जी माहिती आहे ते विचारायला चालू केले आणि ब-याच वेळा उत्तर खरे येऊ लागले .. आम्हाला आश्चर्य आणि भीती एकत्र वाटू लागली 
मग आम्ही उगीच त्याला जे आम्हाला नक्की माहिती आहे ते विचारावे आणि भुताची परीक्षा घ्यावी असे ठरवले ...
मी आणि श्रीकांत यांनी हळूच म्हटले याला विचारू आम्ही घरी कधी जाणार? .. १७ डिसेंबर ची तिकिटे झालेली होती १७ ला टेस्ट संपणार होती तरीही विचारले ..
त्याने हळू हळू कॉईन फिरवायला चालू केली .. आकड्यावर कॉईन आली .. १ आणि नंतर मी कंटाळलो म्हणून उठायला लागलो तोच श्रीकांत म्हणाला अबे ये ३ पे क्यो आ रहा है ? 
त्याच्या मते आम्ही १३ ला घरी जाणार होतो .. पण परीक्षा १३ ला चालू होणार तर कसे १३ ला जाणार बर सर्व मुले मध्यमवर्गातून असल्यामुळे टेस्ट नक्कीच देणारी होती .. आम्ही पुन्हा एकदा विचारले तरीही तेच उत्तर आले १३ डिसेंबर .. चार वाजले होते .. सुनील पेंगाय लागला होता .. संतोष म्हणाला अरे स्पिरीट गेले चार वाजल्यानंतर ते थांबत नाही .. गौरव म्हणाला... क्यो उसको  ३.५६  दादर लोकल  पकडना रहता है भाजी बेचने ? संतोष म्हणाला मैने ऐसेही सिखा है  मानना है तो ठीक .. 
मग सगळे त्याचा विचार करत करत कधी झोपलो कळले नाही .. हळू हळू दिवस लोटले .. टेस्ट जवळ आली होती .. पहिलीच परीक्षा असल्यामुळे उत्कंठा आणि भीती दोन्हीही होती ..
सिनिअर- ' फेल हो गया तो बहुत पिटेगा अशी दमदाटी करून अजून टेन्शन देत होते .
. १३ डिसेंबर आला ... पहिला पेपर मेकॅनिक्स होता पेपर बरा होता ..पास नक्की होऊ खात्री झाली .. पेपर १२ वाजता संपणार होता ..
मी १५ मिनिटे लवकर पेपर दिला आणि होस्टेल वर येत होतो .. अचानक दोन तीन मुले होस्टेलच्या जिन्यावर पळताना दिसली .. लगबग नेहमीची नव्हती .. मी सुद्धा वर पळालो आणि १०- १२ मुले ३३३ रूम च्या समोर उभी होती मी पळालो .. पहिले ते दृश्य ना विसार्ण्यासारखे आणि भीषण होते .. एक मुलगा पंख्याला लुन्गीने लटकला होता जीभ बाहेर आली होती .. होस्टेल वार्डन  सुद्धा पळत आले सगळयांना त्यांनी हाकलायचा प्रयत्न केला  पण कुणीही  जागचे हलले नाही . मी थोडे पुढे जाऊन पाहिले की कोण मुलगा आहे आणि धक्का बसला .. माझ्या शेजारी , बेंच वर बसणारा अजित नावाचा मल्याळी मुलगा होता .. त्याने लटकून आत्महत्या केली होती.
त्या नंतर त्याच्या खोलीत असणा-या दोन रूममेट ना हलवण्यात आले .. त्या रूम मध्ये उदबत्त्या लावल्या होत्या ..त्या उदबत्त्याचा वास मला अजूनही काटा आणतो 
हळूच सगळी मुले होस्टेल वर आरडा ओरडा करायला चालू झाली की आम्हाला इथे राहाचे नाही .. परीक्षा पुढे ढकला आमची मनस्थिती ठीक नाही .. मग प्रीन्सिपोल आले आणि त्यांनी परीक्षा पुढे ढकलून नाताळच्या सुट्टीनंतर ५ जानेवारीला ठेवल्या ..
सगळे जन ब्यागा  भरून तयार झाले होते .. दुपारी ३ वाजेपर्यंत जवळ जवळ सर्व होस्टेल रिकामे झाले होते .. आम्ही आमचे १७ तारखेची तिकिटे कॅनसेल करून जनरल डब्यात बसून नेत्रावती एक्स्प्रेस ने प्रवास चालू केला
आम्ही सगळे त्या प्लॅनचेट च्या भुताच्या भाकीतामुळे सुन्न झालो होतो .. त्याची भुताटकी कुणाचा प्राण घेऊन आम्हाला घरी पाठवणार होती हे कळले असते तर कदाचित हे कधीच होऊ दिले नसते .
संतोष अचानक म्हणाला यार गलती झाली ... मी प्लान चेट चे नाटक केले होते त्या दिवशी भूत फीत कोणी आले नाही .. मला माहित होते की आपण १७ ला जाणार म्हणून मी १३ ही तारीख ठोकून दिली होती ...
मग बाकीची उत्तरे?? .. बस  क्या यार आपण दोस्त लोक ना आपल्याला एकमेकांच्या गोष्टी माहित नसतात का.. हसावे का रडावे तेच कळेना ..  
या अगम्य जगात बरेच योगायोग होतात तसा हा भयानक योगायोग झाला होता .. मला राहून राहून अजित त्याचे पालक , परीक्षांचे टेन्शन का अजून काही असे अनेक प्रश्न येत होते...
थोड्याच वेळात सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या चालू केल्या ... ' आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू ' आणि आमच क्षणिक सुतक मागे पडले ...

.जयदीप भोगले
.


एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...