Monday, December 27, 2010

मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग -२


मित्रांनो .. रामायण, महाभारत, टिपू सुलतान, जंगल बुक, मालगुडी, टिपरे अशा असंख्य मालिका कदाचित अजून नमूद करता येतील पण ऐतिहासिक मालिका मी मुद्दाम मी समाविष्ट केल्या नाहीत .. महाभारत आणि रामायण याबद्दल आपण काही वाचावे आणि मी काही मला आवडलेली म्हणून लिहावे अशा त्या नाहीत त्या त्यापेक्षा विस्तृत आहेत. अनिमेशन हा एक वेगळा विषय होऊ शकतो . मालगुडी आणि टिपरे कदाचित काही कारणामुळे मी माझ्या यादीत मांडले नाही 
मालिका निवडताना त्याची प्रसिद्धी , त्याने सुरु केलेला ट्रेंड , वाहिनीला दिलेली ओळख , कलाकाराचा पुढचा प्रवास, कथानक आणि बजेट या सर्व बाजू लक्षात घेऊन कपोलकल्पित ( फिक्शन ) कथानक मला मांडावे असे वाटले म्हणून मी या मालिका निवडल्या




बुनियाद- ही दूरदर्शनवरची अगदी सुरवातीची मालिका पण आज जी मेगा मालिकांची भाऊगर्दी जी सुरु आहे कदाचित त्याची जननी म्हणावी अशी ही मालिका. स्वातंत्र्यपूर्व काळातील पार्श्वभूमी आणि एकापेक्षा एक पैलू असलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेने दर्शकांना दिल्या .. जरी आपल्याकडे दूरदर्शनशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता , तरी आपल्याला टी वी चे तितके वेड ही नव्हते अशा काळात आपल्याला खिळवून ठेवणारी अशी मालिका म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल .
मी जरा कथानक समजण्यासाठी लहान होतो पण माझ्या बहिणी या मालिकेबद्दल चर्चा करताना मला चांगले आठवते ..

स्वामी - स्मिता तळवलकर यांची कदाचित ही पहिली मालिका .. अस्मिता चित्रचा तो उडणारा पक्षी मला दिसला , नंतर वारंवार दिसला पण मला सुरवातीला वाटायचे स्वामी तर सुरु होणार नाही ना..
माझ्या लहानपणी मला पेशव्यांचा इतिहास होता त्यामुळे मला या मालिकेचे विशेष आकर्षण वाटे . ऐतिहासिक विषय असून युद्ध प्रसंग नसलेली कदाचित कादंबरीवर आधारित म्हणून किवा कमी बजेट मध्ये केलेली म्हणून अशी ही मालिका होती
कित्येक दिवस मला रमाबाई आणि मृणाल कुलकर्णी ( त्याकाळच्या देव ) या एकाच असाव्यात असे भाबडेपणाने वाटायचे .. .
बंदिनी - ही मालिका चांगली का याचे शीर्षक गीत याचा फरक मला नेहमी अवघड वाटतो ..शीर्षक गीत कदाचित समर्पक आणि आशय असलेले हे पहिले वहिले गीत ...
कधी कधी मला माझ्या आईच्या डोळ्यातून का पाणी यायचे हे थोडे मोठे झाल्यावर कळले .. अत्यंत हृदयस्पर्शी कथा आणि सर्व कथा स्त्रीवर आधारित असायच्या .. मला काही कथा कळायच्या, काही त्या चांगल्या आहेत हे बंदिनी पाहणा-या लोकांच्या टिपलेल्या अश्रुवरून वरून भासयच्या.

रजनी - रविवारची टी वी पाहण्याची सुरवात म्हणजे रजनीपासून  .. त्याकाळी आमच्याकडे टी वी नव्हता आम्ही अंघोळ वगैरे करून शेजारी जाऊन बसायचो ... प्रिया तेंडूलकर प्रिया तेंडूलकर आहे रजनी नाही हे कळायला मला बरीच वर्ष लागली.
तडफदार स्त्रीबद्दल मला लहानपणी ओळख करून दिली ती या रजनीने .. प्रत्येक वृत्तपत्र मासिके भाषण गल्ली बोळात रजनी बोलयाची.. आजकाल ज्या मालिकांच्या जाहिराती त्याचे भलेमोठे होर्डिंग आणि रेडीओ वर होणारी जाहिरातबाजी नसूनही नुसत्या कथानाक्च्या जोरावर हिने प्रवास केला .. 

क्यो कि सास भी कभी बहु थी - मालिका या कधीकधी इतक्या शेवईसारख्या मोठ्या होतात आणि तरीसुद्धा त्या नियमितपणे पहिल्या जातात याचे हे उत्तम उदाहरण.स्टार ला स्टार करणारा करोडपती आणि सास भी कभी बहु अशी या मालिकेची ख्याती 
माजघरातील स्वयंपाक घरातील राजकारण याला सुरवात याने केली. तारा हे मेगा सिरीयल होते पण क्यो कि काही औरच ..
ही मालिका कथानक चांगले म्हणून नव्हे तर एक नवा ट्रेंड आणणारी म्हणून मला आवडते .. इतक्या भरजरी साड्या, ते रडणारे पुरुष ,आमच्या शाळेपेक्षा मोठे असणारे विराणी खानदानाचे घर अशा काही विनोदी गोष्टी यात होत्या पण .. उत्तम अभिनय भव्यदिव्य सेट्स आणि काही खास व्यक्तिरेखा .. लोभस दिसणारी तुलसी नंतर तिचा वृक्षाइतका विकास झाला ते सोडा .. पण संपूर्ण भारत ही मालिका बघायची .. आणि ते सुद्धा एकदम रात्री १०.३० वाजता ..
नाविन्याची सुरवात म्हणून ही   मालिका मला आवडली

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...