
नवीन वर्षाचा नेम काय करावा असे मी विचार करत होतो तोच मला सुचले की आपण एक १० तरी पोस्ट महिन्यात टाकले तर ....आणि कदाचित मी आपल्या खासगी आयुष्यातला हाच नेम पाळणार आहे.
आरंभशूर होण्यापेक्षा नियमितपणे काहीतरी लिहिणे कदाचित काही चांगली कल्पना देऊन जाईल...
आहे का नाही ही 'आयडिया ची कल्पना' ?. आयडिया ची कल्पना हा एक सचिन दिग्दर्शित नवीन चित्रपट आजकाल टी वी वर जाहिरात करून धुमाकूळ घालतोय म्हणून हे वाक्य आठवले.
टी वी पाहणे हा माझा आवडता उद्योग त्यावरूनच मला नेहमी वाटायचे की जसे मी मला आवडणारे चित्रपट आपल्यासमोर मांडले तसे मला आवडलेल्या मालिका का सांगू नयेत ..
मालिका ही आपल्या दिवाणखान्याला लागलेली व्याधी आहे असे आपणास वाटत असेल तर हा लेख आपल्यासाठी नाही.

मालिका विषय हा जरा दैनंदिन मालिकेसारखा मोठा, भरकटत जाणारा,असा गुंतागुंतीचा आहे. कदाचित लोकांना हे टाकाऊतून टिकाऊ करण्याजोगे भासेल.
मी मालिका अगदी दूरदर्शन वर येणा-या साप्ताहिक मालिकांपासून आजकालच्या दैनंदिन मालिकापर्यंतचा आढावा घेऊन मांडणार आहे . कदाचित आपल्याला सुद्धा या आवडलेल्या असू शकतील

पण त्या मालिका जर आता असत्या तरी आपल्याला त्या आवडल्या असत्या असे मानून मी त्या सुद्धा गृहीत धरल्या ..
असो जपापेक्षा थुंकी जास्त असे न करता मी आपणासमोर त्या मांडतो.
१ बुनियाद - दूरदर्शन
२ स्वामी - मराठी दूरदर्शन
३ बंदिनी - मराठी दूरदर्शन
४ रजनी - दूरदर्शन
५ क्यो की सास भी कभी बहु थी- स्टार प्लस
५ आभाळमाया - झी मराठी
६ अवंतिका - झी मराठी
७ या गोजिरवाण्या घरात- ई टी वी
८ ना आना इस देस लाडो - कलर्स
९ जस्सी जैसी - सोनी
१० असंभव - झी मराठी
या मालिका कदाचित सर्व लोकानी पाहिलेल्या असतीलच आणि त्या कदाचित आपल्या सुद्धा आवडीच्या असू शकतील .
आता मला या का आवडल्या हे मी पुढच्या भागत सांगतो तोपर्यंत आपल्या प्रतिक्रिया आल्या तर नक्कीच आवडेल .
जयदीप भोगले
आपण श्रीयुत गंगाधर टिपरे नाही लिहिलीत ती ?
ReplyDeleteमला आवडले कि आपण सुद्धा मालिका आवडीने पाहता
ReplyDeleteटिपरे नक्कीच एक उत्तम मालिका आहे
मी म्हणूनच सांगितले की या मला सर्वात जास्त आवडलेल्या मालिका आहेत.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद