Friday, July 6, 2018

कोडे


अवघड कोडी सोपी होतात अन सोप्या गोष्टी अवघड
दृष्टिकोनाचा गुण कधी कधी दोष डोळ्यावरची झापड
धुरंधर म्हणता म्हणता होई नोकियाचीही पडझड 
नवशिका म्हणता म्हणता हळूच गुगल होई वरचढ
उघडे डोळे उघडे कान हाच मंत्र तू वापर
झाडे नेहमी तोडली जाती .गवताचे बनते छप्पर
जयदीप भोगले


6 जुलै 2018

No comments:

Post a Comment

पतंग

पतंग होऊनि उडे अस्मानी दुनिया बघते होऊन दिवाणी सैर सपाटा पतंग करतो परी, मांजा पकडे एक शहाणी म्हणे कशी ती तू स्वछन्दी पवन अश्व...