चक्रव्यूह भेदण्यासाठी
लढवय्या होण्यासाठी
सिकंदर म्हणून जिंकण्यासाठी
कधी पोरस म्हणून हरण्यासाठी
एक गुरूच हवा
पायावर उभारण्यासाठी
जमीनीवरच राहण्यासाठी
विशाल समुद्रात पोहण्यासाठी
गगनभरारी घेण्यासाठी
एक गुरुच हवा
अर्जुनाच्या कर्तव्यासाठी
एकलव्यासम त्यागासाठी
विवेकानंदाच्या विरक्तीसाठी
आणि नतमस्तक होण्यासाठी
एक गुरुच हवा
जयदीप भोगले
27 जुलै 2018
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
व माझ्या सर्व गुरुंना सादर प्रणाम


No comments:
Post a Comment