Monday, January 21, 2019

बिझी

सध्या मी खूप बिझी आहे..

एकदम झापड लावलेल्या घोड्यासारखं
आणि ओझे वाहणाऱ्या गाढवागत सुद्धा
घोडा आहे म्हणून  आनंद नाही
आणि गाढव म्हणून घ्यायचं दुःख नाही

...कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम नाकासमोर चालणाऱ्या पांढरपेश्या सारखं
आणि एकदम नव्या कोऱ्या स्मार्टफोन सारखं सुद्धा
स्मार्ट असल्याचा कसला उपयोग नाही
आणि ठोंब्या असल्याची शिक्षा  सुदधा नाही

....कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम देवाच्या पेड रांगेत असलेल्या भक्तांसारखं
आणि टॅक्स बुडवणाऱ्या श्रीमंत चोरासारखं सुदधा
दर्शन मिळवायचे समाधान नाही
आणी चोर म्हणून  प्रायश्चित्त सुद्धा नाही
..
.कारण सध्या मी खूप बिझी आहे

एकदम जन्मणाऱ्या बाळासारखं
आणि अखेरच्या श्वासाचा धनी
वृद्धागत सुद्धा
एकटं जगायचं  आत्ताच कळत नाही
आणि मिळवलेलं घेऊन मरायला कधीच मिळत नाही..

जयदीप भोगले
21 जानेवारी 2019

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...