जपून लिहू जपून लिहू
तावून आणि सुलाखून मोजके पण कसून लिहू
ताबा नाही सोडायचा आणि शब्द नाही खोडायचा
शब्द जरी सापडला अर्थ तपासून लिहू
जपून लिहू जपून लिहू
: अंधाराची भीती तुम्हा पण उजेडाचाही नको ताप
तुमच्या स्वैर वागण्याला नसे कधी मोजमाप
वाचा नाही फोडत आता मूकपणाने लिहू
जपून लिहू जपून लिहू
जपून तुम्ही म्हणायचे आणि झोकून आम्ही द्यायचे
शब्दछल हवा कुणा सत्य जगा द्यायचे
शब्द जरी जपले.. रान पेटवून लिहू
जपून लिहू जपून लिहू
जयदीप भोगले
22 जानेवारी 2020
No comments:
Post a Comment