Thursday, February 24, 2011

उ:शाप (कथा )

नुकताच  इंजिनीरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता  आर ई सी त्रिची मध्ये अॅडमिशन मिळाल्यामुळे जामच खुश होतो .. तसे पुण्याच्या वी आय टी मधून ती कॅनसेल केल्यामुळे पुणेरी शालजोडीतून बरेच मिळाले होते .कोथिंबीर वडी आणि मिसळ सोडून कुठे तो सांबर भात खायला जाणार आहेस .. पुणेरी मुलींची सर येणार आहे का ? वगैरे मी म्हणालो ' मायला ' तिथे कमीत कमी काळी सावळी ललना पाहायला तरी मिळेल इथल्या पुणेरी स्कार्फ मध्ये ललना आहे का .. 'चल ना' कसे कळणार त्यामुळे मला काही गम नाही
.
१९ वर्षात आल्यामुळे एखादी मैत्रीण असावी हे नेहमीच वाटे पण नेहमी मनात मांडे खाणे इतकाच धंदा ..
कॉलेज ला गेलो  काही दिवसात माझा वाढदिवस जवळ आला २३ ऑक्टोबर ... बर १९९६ मध्ये मोबाईल वैगरे विरळेच आणि असले तर कॅमुनिकेशन च्या सेमिनार मध्ये बघायला मिळायचे .. एस टी डी चे रेट अचाट असायचे त्यामुळे पत्रांची वाट पहावी लागायची .. फुटकळ कार्ड आल्यानंतर सुद्धा इतका आनंद व्हायचा  की की सांगू .....
 तर २३ ऑक्टोबर... सकाळ झाली मुलांनी विश केले . घरचे फोन येऊन गेले .. दुपारी जेव्हा जेवायला होस्टेल वर आलो तर एक ग्रीटिंग आले होते .. नाव कुणाचे नव्हते ...ग्रीटिंग उघडल्यावर सुद्धा फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या एक स्मायली काढले होते .. मला अंदाज येईना .. की माझा वाढदिवस इतका कुणाला माहिती? ...कारण लहानपणी मित्रांना जोपर्यंत माझा आज वाढदिवस आहे हे सांगितल्याशिवाय कळायचे नाही .. आणि लहान गावात ग्रीटिंग वगैरे फॅड अजून यायचे होते .. मला आठवी पर्यंत बिस्कीट चे पुडे आणि पेन्सिल याच्याशिवाय काही गिफ्ट मिळाले नाही ..आणि आज हे निनावी ग्रीटिंग .. मित्रांना खाद्य मिळाले .. एकाने मग लिंबाच्या रसाने काहीतरी त्यावर लिहले असेल इतके डोके लाऊन ग्रीटिंग अक्षरशः जाळण्याचा प्रयत्न केला ..
श्रीकांत म्हणाला लपंडाव सिनेमा सारख्या तीन फुल्या सुद्धा नाहीत आणि तीन बदाम सुद्धा ... मी म्हणालो हा सिनेमा नव्हे ..
मग सगळे करमचंद बनून ग्रीटिंग कुणाचे यावर तर्क वितर्क करू लागले ... मग निखील ने एक नामी आयडिया काढली... स्टॅम्प कुठला आहे तो पहा मग आम्ही पोस्टाच्या स्टॅम्प  शोधणे हे सर्वात अवघड काम करू लागलो ..
मग एकाने भिंग आणले आणि पुसटसे काहीतरी लातु असे काहीतरी दिसले आणि मग कळले की आपल्याच गावाहून आले .. मग उधार घेऊन रात्री १/४ चार्ज झाल्यावर मित्रांना फोन झाले पण पत्ता लागेना 
पण इतके कळले की आपण एकाच्या लिस्टवर जरूर आलो ..

मग  दिवस गेले ( दिवसामागून )  नाताळच्या सुट्ट्या मध्ये घरी आलो एका कप्यात आपल्याला ग्रीटिंग देणारी व्यक्ती कोण याचा विचार होताच ...
मग एके दिवशी एका फॅमीली फ्रेंड च्या घरी गेलो त्यांची मुलगी नुकतीच १२ वी ला गेली होती .. तिची विचारपूस आणि मग आर ई सी ला कसे जायचे ते सांगितले .. ती गालातल्या गालात हसत होती .. तिला म्हटले की की झाले मग तिने सांगितले की माझी एक मैत्रीण तुमच्या घराच्या शेजारी राहते मग मी कोण वगैरे विचारले आणि तिने सांगितले की  रीमा ... मी म्हणालो ती होय  हां .. फार घाशीराम कोतवाल आहे ती फार अभ्यास करत राहते मला आठवले की मी जितका १० वी मध्ये अभ्यास करायचो ती सातवीत करायची .. माझ्याकडे अभ्यासाला येऊन बसायची आणि मला टी वी पहा , झोप ये .. असले व्हायचे जाम राग यायचा ... 
मग तिला विचारले हं  तिचे काय ?    तिला एक मुलगा आवडतो .. मी म्हणालो आयला काय सांगतेस?
 .. मी म्हणालो ती कोणाला आवडेल? .. कारण ती अतिशय काळी होती ..तिचे लग्न होईल तिचा स्वभाव चांगला असेल वगैरे ठीक पण किशोर वयातल्या पहिल्या प्रेमासाठी तिची कुणी निवड करणे खरेच कठीण होते .. याला ' सो  मिन' म्हणा की वस्तुस्थिती  पण असेच  काही होते
ती माझी मैत्रीण वगैरे कधीच नव्हती पण शेजारी , हुशार , अति अभ्यासू ( घाशीराम ) म्हणून मला ती चांगलीच माहिती होती .. ... 
मग मिनू  ने सांगितले कदाचित तिला तू आवडतोस  म्हणजे जरा पाणी जास्तच डोक्यावरून चालले आहे .. ती वर्गात अभ्यास करत नाही . दहावीला मेरीट येऊन १२ विला चांगल्या कॉलेज ला सोड पण बी एस सी ला प्रवेश मिळणे कठीण .. मला वाईट वाटले पण वाईट वाटले तरी यात मी तडजोड नक्कीच करू शकत नव्हतो .. मला जरा हुरळून गर्व सुद्धा झाला .. की आपल्याला भाव आला वगैरे ... 
मग काही दिवसांनी मी धाडस करून तिच्या घरी गेलो .. तिच्या डोळ्यात कामातून गेल्याच्या सर्व झलका दिसत होत्या ..
मी उगीच काकू आहेत का वगैरे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला .. पण तिला माझ्याबरोबर वेळ घालवायचा होता ... तिला मी मग उसने अवसान होऊन विषय काढला .. २० व्या वर्षी असली हाताळणी करणे कठीण आहे पण मग हळू हळू तिने अभ्यासाला कशी प्रायोरिटी दिली पाहिजे वगैरे सांगितले .. तिच्या डोळ्यात पाणी आले होते .. पण मला डोक्यावरून पाणी जाताना दिसत होते .. पिच्छा सोडवायचा एवढाच विचार होता .. मन वैगरे खोली मोजलीच नव्हती .. मी तिचा निरोप घेतला . आता त्यांच्या घरी सुद्धा चुकून जायचे नाही हे ठरवले होते . एकतर्फी प्रेमाची कत्तल करून मी विजयी वीर होऊन मित्रांना पीछा छुडाया  वगैरे सांगत होतो ..
काही वर्ष लोटली .. एफ एम एस ला आलो दिल्ली मध्ये .. दिलफेक स्वभावामुळे चिकार मुली आवडल्या पण प्रेम वगैरे जमले नाही .. २५ आली होती जरा परिपक्व जालो होतो .. कुठेतरी प्रेम शोधावे म्हणून विचार करत होतो
आपण दिसायला चांगले आहोत .. हुशार आहोत बोलयला बरे आहोत वगैरे डोक्यात ठेऊन मला प्रेमाच्या दुनियेत एखादी फटाकडी नाही तर छानसी तरुणी नक्कीच भाळेल असे उगाच वाटायचे .. 
प्रेमात दिसण्याला , पैशाला , स्वभावाला काही महत्व नसते कदाचित लग्नाच्या विश्वात असेल .. हे मला कधी कळलेच नाही ...
आणि कॉलेज मध्ये एक तमिळ मुलगी मला आवडाय लागली .. ती माझी प्रोजेक्ट मेट होती नंतर आमच्या होस्टेल वर यायची आणि मग .. तीच हवी हवीशी वाटाय लागली .. मला दिसणे , स्वभाव असल्या सगळ्या गोष्टींचे हसू यायला लागले .. कारण मी गोरा ती कुरूप यात मोडणारी. मी रोड ,ती बेढब  मी शांत ती तापट असले सगळे भिन्न प्रदेश एकत्र येऊ पाहत होते .. पण मला कदाचित फक्त आमचा सहवास आमची मैत्री आमचे मनप्रत्येक गोष्ट घडल्यानंतर तिची साथ इतकेच दिसायचे .. यात शारीरिक आकर्षणाला थारा नव्हता ..
आणि एक दिवस अचानक  हळू हळू ती माझ्याशी अचानक तुटक वागू लागली .. मला कळेचना का ? मी पुष्कळ प्रयत्न केले .. पत्र जाऊन  मोबाईल चा जमाना आला होता .. कित्येक एस एम एस केले पण तिने मोबाईल उचलणे बंद केले 
मी अस्वस्थ होऊ लागलो .. आणि एकदा परीक्षेच्या दिवशी तिने मला सांगितले .. मूव ऑन यार .. तू फक्त मित्र होतास .. आणि आता  तुझ्या अशा वागण्यामुळे मला मित्र सुद्धा वाटत नाहीस .. मला तुझी भीती वाटते 
तू अभ्यासावर लक्ष दे आयुष्य तुझ्या पुढे आहे ... माझ्या डोळ्यातले पाणी आपोआप बाहेर येऊ लागले ...
मी केलेली एकतर्फी प्रेमची कत्तल आता माझच खून करू पाहत होती ..मला प्रत्येक दिवशी  तरुणपणात रंगावरून डावलून, भावनांना महत्व न देणा-या माझी आठवण झाली ..
कदाचित त्या गर्वाचा शाप मला लागला होता .. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन फक्त मनापासून प्रेम करणा-या मला अगदी तिच्यापेक्षा डाव्या मुलीकडून नकार मिळाला होता ...माझे अभ्यासातले लक्ष उडाले होते ..
पहिल्या वर्षात उत्तम कामगिरी करणारा रवी आता अस्ताला लागलेल्या सूर्यासारखा भासत होता ...माझ्याबरोबर  प्रत्येक गोष्ट जवळ जवळ रीमाबरोबर घडल्यागत होत होती ...
शाप ही संकल्पना खरी आहे का काय मला भासू लागले ... दिवसामागून दिवस लोटले ... अचानक आईने विचारले एक फोटो आहे पाहतोस का ? मुलगी छान आहे ... 
आणि काही दिवसांनी रविचे एका सुरेख   मुलीशी लग्न झाले आणि बहुतेक शापाला ... उ:शाप  मिळाला  

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...