कार्यक्रम-खुपते तिथे
गुप्ते
वाहिनी-झी मराठी
वेळ- बुधवार गुरुवार ९.३०
पहावा का नाही- न चुकता पहाणे
मित्रांनो, माझा आवडता छंद
चांगले कार्यक्रम ऐकणे आणि पहाणे. ( आणी त्यावर लिहून आपले मत ठोकून देणे J)
झी मराठी वर सुरु असणारा
खुपते तिथे गुप्ते त्यातलाच एक ...
तसा हा या कार्यक्रमाचा ३
रा सीजन आहे बहुतेक . हिऱ्याला जसे पैलू पडावेत, चंद्र जसा कलाकलाने अधिक सुंदर
व्हावा किंवा आपली आवडती मैत्रीण किशोर वयातून तारुण्यात येताना अधिक सुंदर आणि
अधिक हवी हवीशी वाटावी या प्रमाणे हा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक हवा हवासा वाटतो
आहे .
मुलाखतवजा ग्रेट भेट ,
संवाद , Rendezvous अशा कार्यक्रमच्या यादीत हा कार्यक्रम कधी जाऊन बसला ते
कळलेच नाही . मार्केटिंग च्या भाषेत आपण यादीत जाऊन सुद्धा आपल (positioning ) वेगळे ठेवणे
सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि ते या कार्यक्रमाचे यश आहे असे मला वाटते.
हा कार्यक्रम पाहताना मला
तराजू आठवतो ... दोन पारड्यात दोन तितकीच तुल्यबळ व्यक्तिमत्व असूनही पारडे कधी
इकडे झुकवावे आणि कधी तिकडे अशा वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने गुप्ते साहेब कार्यक्रम
हाताळत असतात.

कार्यक्रमाची भक्कम बाजू
अवधूत असल्यामुळे मुलाखती साठी समोर कोण आहे याला फार महत्व द्यावे असे वाटलेच
नाही. करोडपती मध्ये जसा अमिताभ , वहिनी कुठलीही
असो समोर आदेश भौजी असले की प्रत्येक वहिनी मनमोकळ्या गप्पा मारणारच.... तसेच
अवधूत दादा, विनय आपटे असो की की फटाकडी सोनाली कुलकर्णी . प्रतेयक संवाद तितकाच मुलखात देणाऱ्या पाहुण्याच्या रंगात रंगून जातो.
कार्यक्रमात नेहमीच
सांगितल्याप्रमाणे त्यांचा जादूचा फोन ही या कार्यक्रमाची खासियत ...
मग रोहिणी हत्तंगडी यांचा
कस्तुरबा गांधी बरोबर झालेला फोन की अजून कोणाचा प्रत्येक फोन तितकाच वेगळा.
मास्क सिनेमा मध्ये जसा
मास्क हा फक्त मास्क लावणाऱ्या व्यक्तीसारखा वागतो ,फक्त अधिक उजळ अधिक जादुई ...तसेच खुपते मधला सेलिब्रिटी….
जसा आहे तसाच समोर येतो, फक्त… अधिक उजळ होऊन
कार्यक्रमाचा वाद्यवृंद
उगाच जिथे तिथे म्युझिक वाजवू पाहत नाही ही सुद्धा जमेचीच बाजू
हिंदी सारेगामापा चा विजेता
जसराज जोशी याच कार्यक्रमात चमकून गेला होता
दाटून कंठ येतो हे गाणे
त्याने इतके भावपूर्ण म्हटले होते की फयाज यांच्या डोळ्यात कधी पाणी आले व आमच्या
आईच्या सुद्धा कळलेच नाही .
थोडक्यात आजकालच्या
predicted जगात काहीतर न ओळखता येणारे कार्यक्रम कमीच. यात हा कार्यक्रम नक्कीच
गणता येईल
सो ... हृदयाला भिडणारा
संवाद आणि थेट हृदयप्रिय कलाकारांबरोबर म्हणूनच म्हणतो हे काही जणू नाजूक ओपन
हार्ट करण्याजोगे आहे ..
तर हीच ती वेळ आणि हाच तो
क्षण..... पहायला विसरू नका J
जयदीप भोगले
madhali sutti ha suddha ek chan karyakram aahe.
ReplyDeleteअवधूत नक्कीच चांगला इंटरव्ह्यु घेतो, वागळे पेक्षा नक्कीच हजार पटीने चांगला.
ReplyDelete