Wednesday, March 7, 2018

शहीद



रक्ताचं पाणी आणि हाडाची काडे
क्वार्टर चा ग्राफ कसा उंच उंच वाढे

"पॅट" चा चाबूक आणि "सॅप" चा लगाम
घड्याळाचा काटा कसा जाई भर भर पुढे

इक्विटी आणि डेट असे राहू केतू
बॅलन्स करून सुद्धा सूर्याला ग्रहणच पडे

इन्व्हेस्टर रिलेशन आणि कंपनीची पोजिशन
एकावर एक शिलेदार कसा उचली विडे

मॅरेथॉन ची शर्यत डाएट ची नियत
हृदयाच्या धडधडीचा चा कसा विसरच पडे

कॉर्पोरेट च्या धावण्यात सुरवात होते फक्त
शेवट होतो जेव्हा शरीर निपचित पडे

जयदीप
20 फेब्रुवारी 2018

काही जुन्या बातम्या वाचून हळहळ व्यक्त करून काही गुणी कॉर्पोरेट शाहिदांना समर्पित

बचेंगे तो और भी लढेंगे।।।। 0

पॅट- PAT ( profit after tax)
सॅप- SAP ( असं काहीतरी असत)

सविनय ....




तुमचा विनय आमचा माज
होऊन जाऊ दे द्वंद्व आज
तलवारीच्या खणखणीचा
छेडून टाकू नवीन साज

तूमची समानता आमची विषमता
पण पोळी दोघे भाजू आज
लेनिन असो की गांधीबाबा
हटवू त्यांना विकू समाज

तुमची मीडिया आणि आमचा भेडीया
बाजूस काढू होऊ विराज
मेणबत्ती आणि काळे झेंडे
डोळे मिटू आणि करूया राज

जयदीप भोगले
7 मार्च 2018
15.22

Tuesday, February 27, 2018

प्रेम मराठी अभिमान मराठी

मराठी दिन म्हणजे नुसता स्मरणदिन नसावा
अभिमान तिचा मनी कायम ठसावा

प्रेम तिच्यावर सागरागत असावे
जरी आली ओहोटी पुन्हा उचंबळून यावे

देवासारखे तिला देव्हारी का बसवावे
आईसम तिस नित्य नियमी बोलावे

गणेशसुत वंदी कुसुमाग्रजांना
मराठीदिनाच्या शुभेच्छा सर्व मराठी मनांना

प्रेम मराठी अभिमान मराठी

जयदीप भोगले
27 फेब्रुवारी 2018

Friday, February 2, 2018

कॉफी


धुंद तुझा गंध सखे
स्वच्छदं अशी साथ
श्याम रंग तुझा रात्र जागे
दौडे अशी तू मनात
शहाणी असे तू उष:काली
वेडी होई  जेव्हा रात
गप्पा असो की आठवण
प्रत्येक प्यालातून हाक
पहाडवरची ललना जणू
वाफेतून लागे घुमू
निर असो क्षीर कधी
तुझाच सम्राज्ञी चा थाट
ब्राझील ची लेडी म्हणू
का कुर्ग ची परी तू अस्मानी
काळी जादू करे जगात
जरी दुनिया गोऱ्यांची दिवाणी
कौतुकाचे शब्द माझे
कॉफी असे नाव तुझे
जुनी मैत्री असो की प्रीत नवी
सर्वांनाच तू हवी हवी

जयदीप भोगले
5 जानेवारी 2018
मुंबई एअरपोर्ट

Friday, November 10, 2017

Hamlet

नाकासमोर चालणं चांगलं होतं का वाईट हा प्रश्न कधी पडलाच नव्हता
हे करू का नको असा विचार मनात कधी आलाच नव्हता
पण तू आलास आणि अस काहीतरी झालं
मी खरा का माझं प्रतिबिंब हेच कोडं झालं
 हॅम्लेट च्या सावलीत माझा किंग लियर नेहमीच डळमळीत होतो
TO be or not to be म्हणत आजकाल माझाच हॅम्लेट होतो

जयदीप भोगले
11 ऑक्टोबर 2017

Thursday, November 9, 2017

अक्स

याद करने के लिये कुछ किया नही जाता
 माजी से रुबरु होना इंसा की फितरत होती है
भुलना भी कभी मुमकींन नह tvी होता
जिंदगी हकीकत बया कर ही देती है
यादे तो उन लहरो जैसी बन ही जायेगी
चांद को छुने की समंदर की ख्वाईश होती है
आईंना और पानी अक्स बता देता है लेकींन
टूटना आईने की किस्मत और बहना पानी की अक्स से कुरबत होती है

कुरबत  vicinity
अक्स reflection

जयदीप भोगले

8 नोव्हेंबर 2017
तळेगाव पुणे highway

आदब अर्ज है😀

Tuesday, October 17, 2017

दिवाळीचा फराळ




लाडू सखे तुजसम गोड नि माझ्या इतका कडक आहे

चकली आहे खमंग तुजसम नि माझ्याजोगी  चिवट आहे

शुभ्र झाली करंजी तुजसम तरीही बाखर थोडे खवट आहे

चिरोटा अगदी हलका तुजसम पण मजसम  पसरट आहे

बायको म्हणाली हे कौतुक समजू माझे ?? का  फराळावरची टीका आहे

इतका तपशील पुरे झाला पुणेरी तुझ्यापुढे फिका आहे

तुझी कमेंट तर एक्दम जणू माझ्या ऑफिसचाच  फॉरमॅट आहे

काम कितीही भारी करा  तरी दिवाळी बोनस  भुईसपाट आहे

जयदीप भोगले
16 ऑक्टोबर 2017
😊☺☺☺😊

Monday, October 2, 2017

लिमिटेड समाजवादी



समाजकार्य सुद्धा आजकाल समजून करावं म्हणतोय

थोडंस calcluation करूनथोडं उदार व्हावं म्हणतोय

सगळंच केलं लोकांच्या हवाली तर
मला हवालदिल व्हावं लागू नये

म्हणूनच थोडी फी जास्त आकारावी म्हणतोय
थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय

मला पिझ्झा मिळाला तर थोडासा पाव नक्कीच देता येईल
आडातच नाही उरलं तर पोहऱ्यात कोठून येईल

गांधीवादी म्हणून शर्ट काढला जरी नाही
लोकांच्या अश्रू पुसण्याला रुमाल द्यावा म्हणतोय

थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय.



भांडवलवादी जगात असे समाजवादी सुद्धा उरले नाही
फ्लॅट घेऊन लॉक लावून ठेवतील पण
कमी भाड्याने लोकांना देणार नाही

लिमिटेड का होईना जरा माणुसकी जपावी म्हणतोय
थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय

जयदीप भोगले
2 ऑक्टोबर 2017

Monday, September 25, 2017

गणेशवंदन

गणांचा तू नायक 
जगाचा तू पालक
मूषकी विराजी 
वरदविनायक
बुद्धी चा तू देवता
कलेचा तू चाहता
सिंदूर् लेपसी
गिरीजात्मज





कृपेचा तू सागर
ज्ञानाचे तू आगर
भक्तांची चिंता हरसी
चिंतामणी गजानन

दहा दिवस येसी
पृथ्वीवासी होशी
भक्तास तू पावसी
होऊन गणेश

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून

झेंड्यांची पेड दिवाळी करून

देशभक्तीची गाणी  डॉल्बीवरून

येत सगळ्यांचे मन एकच दिवस उचंबळून

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??

अच्छे दिन येतील म्हणून

मल्या च्या पलायन वर कानाडोळा करून

नव्या निवडणुकीला पुन्हा सामोरे जाऊन

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??

गुन्हेगारी  साठी धृतराष्ट्र बनून

आरक्षणांचा अश्र्वमेध खुला सोडून

एका नवीन गुलामगिरी चा रस्ता शोधून


काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??



जयदीप भोगले
१५ ऑगस्ट २०१७




















शेअरचा शिरा





शेअरची कढई आणि लाभाचा रवा

भाजायचा कसा तो कळायला हवा


स्टॉप लॉस चा वास दुरूनच घ्यावा
आणि पोजिशन चा पाक थोडा एकतारी करावा

रवा आणि मैदा जसा एकत्र करायचा नसतो




पन्नास शेअरचा पोर्टफोलिओ एकत्र बनवायचा नसतो

शेअरच्या शिऱ्याची रेसिपी नुसती वाचून जमत नसते

लाभाची चव स्वतः परतल्याशिवाय मिळत नसते







जयदीप भोगले
१२ ऑगस्ट २०१७


Sunday, September 24, 2017

आजका ताजा कलाम



आधी माहिती नव्हतं आणि आता खुप उशीर झालाय

इथं सगळ्यांनी आधीच मनासारखा जोडीदार निवडलाय

पण उगाच ही कल्पना कधीतरी फार छान वाटते

पण ग्रुप मध्ये शाहरुख सारखे कोणी कुल आणि दीपिका सारखे हॉट नसते

तरीही कुणाची  लहानपणची इच्छा उगाच राहिली असेल

त्याला खालची  बातमी खरंच अगदी पर्वणी असेल

असो ही बातमी नवरा बायको साठी नक्कीच नाही

नाहीतर नवरा बसेल दरवाज्यात आणि बायको घरात घ्यायची नाही

☺☺☺
जयदीप भोगले
24 सप्टेंबर 2017




Saturday, September 23, 2017

जरी आपण विखुरलो नकाशावरी

आमच्या ग्रुप च्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी पुन्हा एक कविता केली आहे
बरेच दिवस काही जमलं नाही पण या विशिष्ट प्रसंगी पुन्हा काहीतरी जमलंय
फक्त ग्रुपमुळेे तुमच्या साठी



शाळेची घंटा कॉलेजचा कट्टा
नाही कुणाची सक्ती नाही कुणाचा दट्टा
ग्रुप म्हणून एकत्र आले परी
जरी आपण विखुरलोे नकाशावरी
कधी लटके भांडण
काही जणांची शिकवण
विचार करती एकत्र 
काढून जुनी आठवण
शाळेचा वर्ग जणू भरला  virtual जरी
जरी आपण विखुरलो नकाशावरी
कुणाचा वेळ जातो
कुणाचा वेळ खातो
फालतू फॉरवर्ड वरून एखादा
उगाचं सगळ्यांचा वार खातो
पण पुन्हा एक हाय... डोके काढतो तरी
जरी आपण विखुरलो नकाशावरी
एक वर्ष झाले का 365 दिवस झाले
पण त्यामुळे सगळ्यांचे गेट टुगेदर झाले
असेच सगळे एकत्र जगुया
सर्वासाठी आनंद आणि दीर्घायु मागूया
हसू आणि आसू शेअर करायला तरी
नेहमी एकत्र येऊया व्हाट्सअपवरी

जयदीप भोगले
23 सप्टेंबर 2017

Monday, August 28, 2017

ओले क्षण आणि चहा



 ओले ते क्षण आली पावसाची सर
शब्दांच्या भावना जागवी ते स्वर

हातांचा स्पर्श तिचा आणि बटांची लहर
मंद ती रातराणी गर्द असे गुलमोहर

हास्याची लकेर तिचा यौवनाचा बहर
स्वप्न दिसे जागेपणी आणि उरे तिसरा प्रहर

:कविमन माझे आणि कल्पनेची दुनिया
शब्दात राहू नको सखे सत्यातही उतर

इतक्यात आली वाफ गरम त्या चहाची
बायको म्हणाली सख्या जरा भूवरी उतर

दिवास्वप्न नको  प्रिया जरा मिळवं ती नजर
मीच तुझी कल्पना आणि तू माझा प्रियकर

जयदीप भोगले
28 ऑगस्ट 2017
20.35

Sunday, August 6, 2017

हॅप्पी फ्रेंडशिप डे



व्हाट्सएपचे स्माईली
फेसबुक चे लाईक
मिसस्ड कॉल पण केलेला
कधी होऊन खूप टाईट

सेल्फीचा एकत्र असा मूड
बडडे बम्स ने घेतलेला मिश्किल सुड
आपल्या मैत्रीणीला पाहून
लांबूनच केलेले  व्हेरी गुड


त्या हळूच कॉपी केलेल्या असाईनमेंट
आपल्यासाठी उधारीवर केलेली आरेंजमेंट
यात कॉमन फक्त एकच असतो
चूक असणारे कर्ण असो के बरोबर असणारे अर्जुन
त्याला साथ देणारा मित्रच असतो

फ्रेंडशिप डे असो की व्हॅलेंटाईन
याला सगळे दिवस सारखेच असतात
उधारी मागणारे असो की देणारे
सगळे मित्र जिगरी दोस्तच असतात

पण तरीही मी म्हटलं निभवावी थोडी दुनियादारी
फ्रेंडशिप डे आहे यावेळी श्रावणात मित्रा
म्हणूनच  सेलिब्रेट केली आधीच गटारी

जयदीप भोगले
6 ऑगस्ट 2017

Tuesday, July 25, 2017

हमनवाज



फायदे और वायदे के मुद्दे मे ना उलझ ए दोस्त
इरादे और वजूद कभी डगमगाया भी करते है
शिशे और शराब का नही है कुछ वासता मगर
राहगिर सफर मे कुछ वक्त साथ निभाया करते है
हमनवाज

कूछ इस तरह तुम न देखो हमें
ख्वाब हकीकत कि दहलीज पे ठहरा नहि करते
किताबे तो कहानी बया कर देगी मगर
रिश्ते अल्फाजो के तरकीब से बना नही करते

जमाने कि और हमारी दुष्मनी पुरानी ही सही
दुनिया  मे दोस्ती का इल्म कभी दिया  नहि करते
दिल के शागिर्द हम बन गये जरूर
युं उस्तादी मे मगर खंजर चलाया नहि करते

हमसफर हमनवाज इन सब मे हम कहा
खानाबदोश कभी  घर बसाया नहि  करते
कलम और स्याही से बन जाये तू गजल हि  सही
संग और खिश्क के बगैर मुरत बनाया नही करते

जयदीप भोगले
२५ जुलै २०१७








.

Monday, July 24, 2017

स्वप्नाली


स्वप्नाली


 बेधुंद अशा सांजवेळी  ..तुझे पत्र उशाखाली

 शब्द तुझा स्पर्श जणू.. भास असे तो मखमाली

 स्वप्न असे का सत्य न कळे ..श्वास उरी वरखाली

 वाऱ्याची झुळूक सांगे मज ..का बनशी तू स्वप्नाली?

 सुगंध असे कस्तुरीसम ..पाश तुझा भवताली

 चांदणे ही मज दाह देई ..भेट तुझी ती रानजाई

 देह माझा एकटाच तो झुरे... सख्या तुझ्यापाई


सख्या तुझ्यापाई


 जयदीप भोगले
24 जुलै 2017
 खंडाळा

Sunday, July 23, 2017

थ्री बीएचके



मनातलं एकदम खर झालं तर
 एक थ्री बीएचके घेऊन टाकू आता लवकर

 प्रशस्त बेडरूम मुलाची स्टडी रूम
 किचन सुद्धा एकदम असेल ते सुपर
 एक थ्री बीएचके घेऊन टाकू आता लवकर


 बेड कसा इटालियन असेल जणू खास
 मार्बल ची फ्लोरिंग बनवू ती झकास
 पोरांसाठी सुद्धा आणू इम्पोर्टेड बंकर
एक थ्री बीएचके घेऊन टाकू आता लवकर

 मग माझ मुल मला हळूच म्हणाले
 वेळेवर घरी येऊन बाबा किती दिवस झाले?

 मी आणि ममा वाट पाहून झोपतो
उशिरा येऊन तुमचा मुक्काम हॉल मध्ये असतो

 बंकर पेक्षा मला आवडते आईच्याच कुशीत
 आजीची गोष्ट मस्त आणि आमच ते गुपित

 हवा तुमचा वेळ आणि हवे तुमचे हसू
 उशीची फेकाफेकी कधीतरी करत आपण बसू


 आई बाबा आणि मी हाच माझा बंगला
भकास तो थ्रीबीचके बाबा नाही चांगला

 जयदीप भोगले
 २० जुलै २०१७

Wednesday, July 19, 2017

एकदम आईसारखं

मराठी पुरुष संसारामध्ये एका विशिष्ट परिमाणाचा वापर वेळोवेळी करतात .
 कधी ते बचावात्मक , कधी आव्हानात्मक , कधी उपहासात्मक कधी कौतुकास्पद अशा विविध प्रसंगी हे एकाच परिमाण फार चपखलपणे वापरण्याची पद्धत आहे...

 याला म्हणतात “ एकदम आईसारखं “:)

 आता मेट्रिक पद्धतीमध्ये कदाचित या वाक्याला फार गृहीत धरता येईल का नाही मला माहित नाही पण गुणवत्ता चाचणीत आणि खास करून बायको या व्यक्तीबरोबर याचा वेळोवेळी वर नमूद केल्याप्रमाणे योग्य वेळी वापर खास प्रचलित आहे

 भेंडीची भाजी चांगली किंवा वाईट अशी न होता “आज तुला एकदम आईसारखी जमलीय” अशी कौतुकाची थाप बऱ्याच बायकांनी नक्की घेतली असेल .
 तर याला मराठी घरात कौतुक असे म्हणायची पद्धत आहे

 आता हेच परिमाण जेव्हा नवरा केलीली भजी न बोलता हादडत असतो ,आणी चांगली झाली आहेत हे उघड असून सुद्धा त्यावेळी मान वाकडी करून बायको उपहास्त्मक वापर पद्धतीने करते ... “ जमलय का तुमच्या आईसारखं ? “

 आता हीच चकली किंवा अनारसा असला अनवट पदार्थ जेव्हा काही कारणास्तव फसतो त्यावेळी नवरा काही कुरकुर करत खात खात म्हणतो काहीतरी कमी आहे ग ....”आई जाम मस्त बनवते चकल्या” .. त्यावेळी बचावात्मक पद्धत ... अहो पण मोहन मी आईना विचारूनच घातल होतं

 आता आव्हानात्मक पद्धत ही नवरा नात्याने फार जपून वापरावी लागतो नाहीतर विनाकारण हा नाजूक प्रश्न दोन्ही आई व बायको या वेगवेगळ्या वेळी ऐरणीवर घेऊ शकतात व दोन्ही वेळी ऐरणीवर तुम्हीच असाल हे वेगळ सांगावे असे मला वाटत नाही

 तर कटाचे सार किंवा पुरण असले खास पदार्थ आपल्या विशेष आवडीचे आहेत असे सांगून खास कार्यक्रमाला सांगावे “ आईसारखी पुरणपोळी आणि सार कुणाला जमत नाही “ मग ते आव्हानाचे शिवधनुष्य बायको कशी पेलते हे सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने नक्कीच पहिले असेल.

 आता हीच आई “ जर तुमच्या वडिलांची असेल व तुम्ही फार पाहिली नसेल आणि देवाघरी गेली असेल “ ते सुद्धा हेच वाक्य तितक्याच मिस्कील पण तुमच्या आईला सुद्धा म्हणू शकतात – “ तुला आमच्या आईसारखी आमटी कधीच जमली नाही “ यावर ... आपलं काही अडले काय ३० वर्षात ?? अशी कमेंट उपहासत्मकपणे वापरून आव्हानात्मक पद्धतीने “ आता आहे ना सून तिला सांगा ती करेल तुमच्या आईसारखी आमटी ..”. सांगून मोकळी होते

 आता या सर्व पदार्थामध्ये कोणीही किती मीठ किती साखर गोड का तिखट असले पाककृती मोजमाप न सांगता फक्त एकदम आईसारखं अस म्हणून मोकळे होतात..

 आणि हेच सगळे आनंदाने , कमलाबाई ओगले व तरला दलाल आणि आता आम्ही सारे खवय्ये पाहत असतात आणि तिथे सुद्धा हेच वाक्य सांगून मोकळे होतात

“ असे पोहे ??? आमच्या आईला बोलवा म्हणावं... तर असच असत कि नाही सर्वांच्या आईसारखं





 टीप : ह्या सर्व सर्वसाधारण कमेंट असल्यामुळे सर्व परिमाणाचा वापर माझ्या घरी झाला आहे का असला प्रश्न विचारू नये .. व आपल्या घरी सुद्धा हे परिमाण काळजीपूर्वक वापरावे ... कारण वदनी कवळ घेता.... :) जयदीप भोगले

Monday, July 17, 2017

फुलपाखरु


रंगांचे पंख
आठवणीतील गाणी
जीवनाच्या मधुपाना
निघाली दिवाणी
नात्यांचा बहर
अनुभवाची लहर
अडीच अक्षरे जुनी ती
नव्याने कहाणी
हवासा स्पर्श
मनीचा हर्ष
वाऱ्याची झुळूक झाली सुरू
कळी उमले फुल होई
शब्द माझे गीत होई
जगण्या जणू मी फुलपाखरू

जयदीप भोगले
७ एप्रिल २०१७

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...