Thursday, July 29, 2010

खुण

खुण

काही वाटा अशा असतात कि त्यांचा अंत होत नाही
पण पुन्हा त्यावर जाता खुण कधी मिळत नाही
    काही व्यक्ती अशा भेटतात कि मन हेलावून जातात
पण निघून गेल्या तरी मनात घर करून जातात
काही थेंब असे असतात कि नेहमी विरून जातात
पण विरल्यानंतर वेडे डोळ्यातून गळत राहतात
   काही आशा आशा असतात की नेहमी पल्लवित होतात
पण न सांगता खट्याळ त्या निराशेला घेऊन येतात
काही शब्द असे असतात की वेलीसारखे लांबत जातात
पण वाढल्यावरच कळते की कविता ही फुलत असतात
जयदीप भोगले
१५ सप्टेम्बर १९९९ 

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...