जगात भारी जगात भारी
हिच्या चहाची लज्जत न्यारीचहा तोच आणि दूध तेच
पण हीच्या चहाची नवीन स्टोरी
अमृततुल्य आणि येवले काका
मी म्हणत नाही हिच्याकडून शिका
शिकून सगळं येत नाही दादा
Exclusivity ची असते मजाच न्यारी
कोणी म्हणेल याला स्तुती
कोणी म्हणेल माज
कोणी म्हणेल बायकोच्या गुलामीचा हा नवीनच अंदाज..
कोब्रा नवरे करत नसतात कौतुक असे घरी
तेव्हाच समजा चहाची गोष्ट आहे एकदम खरीखुरी
खारी असो की बशीत मारी
हिच्या चहाची नवीन स्टोरी
अरे हुजूर वाह ! बोलीये
जयदीप भोगले
13 मे 2019
No comments:
Post a Comment