भाळलेल्या या क्षणांना
नयन कटाक्षाची धुंदी आहे
दीप मालावण्यास विलंब नको
बेधुंद आज पुनव आहे
लाजित्त तुझी धवल कांती
तीवर चांदण्यांची दुलई शोभून राहे
मिठीत ढील नको प्रिये
चंद्र आज घायाळ आहे
मंद रातराणीच्या बहर तो
सुगंधाचा संग आहे
निवांत एकांत क्वचित भेटे
प्रेम आज आतुर आहे.
जयदीप भोगले
२-१०-१९९९
pls explain/translate in English for Non Marathi fans of yours :)
ReplyDeletemadam i will try my best to translate .. but romantic poem is very feeling intese ..i will translate poems which are social or on some other subject
ReplyDeletemastach!!!
ReplyDelete@ innocent warrier - thank you
ReplyDelete