सारं कसं शांत शांत
गोंगाटामध्ये सुद्धा निवांत
मुक्त आकाशामध्ये लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे
मंद .. पण नसे त्यास देहांत
सारं कसं शांत शांत
मुबलकता नसून नव्हे कशाची भ्रांत
पावसाच्या वेड्या चातकासारखे
पावसाचे दोन थेंब ही पुरेसे
तहानेची नसे कसली खंत
सारं कसं शांत शांत
तू नसून दिसे तू नखशिखांत
स्वप्नातल्या सुंदर ललनेसमान
मनाइतक्या अंतरावर
पण तुझ्या भेटीचा प्रवास आहे अनंत
सारं कसं शांत शांत
कवितेतल्या ओळींसारखं
रेखाटतात अशक्यास
करतात निस्तेज शिशिरास वसंत
जयदीप भोगले
ऑक्टोबर २००२
Chhan !
ReplyDeleteswapanatalya sundar lalanesamaan
Manaitakya antaravar !
mhanje kiti?
hi kavita mi char velaa vachali.
Gudh vatatey pan parat parat vachavishi vatate.