Friday, December 24, 2010

मला आवडलेल्या मालिका..तुम्हाला कशा वाटल्या ? भाग १




मित्रांनो , आळस आणि नको तितके काम हे दोन्हीही शत्रू  आपल्या छंद जोपासण्याच्या इच्छेला कसे खिंडीत पकडतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी.. गेले कित्येक दिवस काही वेळा काम म्हणून काही वेळा आळस म्हणून मी ब्लॉग पोस्ट करू शकलो नाही .. या मुळे आपल्या विश्वात फार फरक पडला असेल असे मी म्हणत नाही पण कदाचित  मी काही जे माझ्या  मनातले आपल्यासमोर मांडायचो ते राहून गेले . माझ्या हितचिंतक आणि मित्र या दोघानाही मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि बाकी समाजाला माझे ब्लॉग वाचावे अशी प्रार्थना करतो .. 

 नवीन वर्षाचा नेम काय करावा असे मी विचार करत होतो तोच मला सुचले की आपण एक १० तरी पोस्ट महिन्यात टाकले तर ....आणि कदाचित मी आपल्या खासगी आयुष्यातला हाच नेम पाळणार आहे.
आरंभशूर होण्यापेक्षा नियमितपणे काहीतरी लिहिणे कदाचित काही चांगली कल्पना देऊन जाईल...
 आहे का नाही ही  'आयडिया ची  कल्पना' ?.  आयडिया ची कल्पना हा एक सचिन दिग्दर्शित नवीन चित्रपट आजकाल टी वी वर जाहिरात करून धुमाकूळ घालतोय म्हणून हे वाक्य आठवले.

टी वी पाहणे हा माझा  आवडता उद्योग त्यावरूनच मला नेहमी वाटायचे की जसे मी मला आवडणारे  चित्रपट आपल्यासमोर मांडले तसे मला आवडलेल्या मालिका का सांगू नयेत ..
मालिका ही आपल्या दिवाणखान्याला लागलेली व्याधी आहे असे आपणास वाटत असेल तर हा लेख आपल्यासाठी नाही.
पण मालिका पाहता पाहता आपल्या घरी आपण स्वयंपाक (चवीवर फार चर्चा न करता) खाऊ शकतो, .. कदाचित वेळेवर जेऊ सुद्धा शकतो ( कारण ८.३० ला येणारी लज्जा सगळ्यांना पहायची असते) अशा अनेक नकळत होणा-या फायद्यांना (किमान तसे मानणाऱ्या) भगिनी, वनिता, गृहिणी आणि त्यांचाबरोबर बसून बसून मालिकेत माळून घेऊन ( रिमोट आपल्या हातात  गेण्याची मुभा नसल्यामुळे )आनंद मानणा-या  कुटुंबासाठी हा लेख मी लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

मालिका विषय हा जरा दैनंदिन मालिकेसारखा मोठा, भरकटत जाणारा,असा गुंतागुंतीचा आहे.  कदाचित लोकांना हे टाकाऊतून टिकाऊ करण्याजोगे भासेल.
मी मालिका अगदी दूरदर्शन वर येणा-या साप्ताहिक मालिकांपासून आजकालच्या दैनंदिन मालिकापर्यंतचा आढावा घेऊन मांडणार आहे . कदाचित आपल्याला सुद्धा या आवडलेल्या असू शकतील 
मी सुरवातीला फक्त मराठी मालिका घ्याव्या असा विचार केला होता पण दूरदर्शन हे भारताला फक्त २५ वर्षे जुने आहे  आणि सुरवातीला आपण फक्त हिंदी पाहायचो कदाचित तेवढेच दाखवयचे म्हणून सुद्धा 
पण त्या मालिका जर आता असत्या तरी आपल्याला त्या आवडल्या असत्या असे मानून मी त्या सुद्धा गृहीत धरल्या ..
 




असो जपापेक्षा थुंकी जास्त असे न करता मी आपणासमोर त्या मांडतो.
१ बुनियाद - दूरदर्शन 
२ स्वामी - मराठी दूरदर्शन 
३ बंदिनी - मराठी दूरदर्शन 
४ रजनी - दूरदर्शन 
५ क्यो की सास भी कभी बहु थी- स्टार प्लस
५  आभाळमाया - झी मराठी
६ अवंतिका - झी मराठी 
७ या गोजिरवाण्या घरात- ई टी वी
८ ना आना इस देस लाडो - कलर्स 
९ जस्सी जैसी - सोनी 
१० असंभव - झी मराठी  
या मालिका कदाचित सर्व लोकानी पाहिलेल्या असतीलच आणि त्या कदाचित आपल्या सुद्धा आवडीच्या असू शकतील .
आता मला या का आवडल्या हे मी पुढच्या भागत सांगतो  तोपर्यंत आपल्या प्रतिक्रिया आल्या तर नक्कीच आवडेल .

जयदीप भोगले

2 comments:

  1. आपण श्रीयुत गंगाधर टिपरे नाही लिहिलीत ती ?

    ReplyDelete
  2. मला आवडले कि आपण सुद्धा मालिका आवडीने पाहता
    टिपरे नक्कीच एक उत्तम मालिका आहे
    मी म्हणूनच सांगितले की या मला सर्वात जास्त आवडलेल्या मालिका आहेत.
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    ReplyDelete

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...