
दिग्दर्शक- राजा परांजपे
संगीत- सुधीर फडके
पटकथा आणि गीते - ग दि माडगुळकर
कलाकार- राजा परांजपे , सीमा देव, धुमाळ
ह्या चित्रपटाचे मी लहानपणी पाहिलेले पोस्टर आठवते ... जगाच्या पाठीवर लिहिलेले नाव आणि एका पेक्षा सुमधुर अशा गीतांची नावे असे या पोस्टर चे स्वरूप हिते
या वरूनच तुम्हाला कल्पना आली असेल कि या चित्रपटाची अजरामर बाजू याच्या गीतांमध्ये आहे.
मागे म्हटल्या प्रमाणे सोप्या चालींची अवीट गोडीची गाणी म्हणजे बाबूजींची गाणी .. आणि आधुनिक वाल्मिकी - गदिमांनी त्या गीतांचा प्राण म्हणजेच त्याचे शब्द असे रचले आहेत कि त्याबद्दल चांगले किंवा वाईट म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल त्यामुळे या दोघांना त्रिवार वंदन ...
गीतांबरोबर तितकीच ह्रदयस्पर्शी पटकथा दर्जेदार मन हेलावून टाकणारे कलाकारांचे अभिनय यामुळे सुद्धा हा चित्रपट मनात कायमचे घर करून जातो .
बाबूजींच्या गीतांसाठी हा चित्रपट संग्रही ..
सांगत्ये ऐका -१९५९
दिग्दर्शक- अनंत माने
कलाकार - जयश्री गडकर , सुलोचना , दादा साळवी , चंद्रकांत ,सुर्यकांत
सांगत्ये ऐका आणि जयश्री गडकर एक समीकरण आहे .. आठवणीतील चित्रपट आणि एखाद्या कलाकारासाठी लक्षात राहणारे काही चित्रपट असतात तर जयश्री गडकर यांच्यासाठी हा सिनेमा लक्षात राहतो
चित्रपटाची कथा ग्रामीण पठडीतली व प्रभावी अशी आहे .
तमाशाप्रधान चित्रपटांच्या यादीत अव्वल असणा-या यादीत या चित्रपटाचे नाव मी पहिल्या तीनात नक्की ठेवले असते
बुगडि माझी .. आणि क्लाय्मक्स चा तमाशा अतिशय सुन्दर आहेत .
श्यामची आई - १९५३
कथा - साने गुरुजी
कलाकार -वनमाला , माधव वझे , दामुनाना जोशी
श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्म्चारीत्रावरून ह्या चित्रपटाची निर्मिती झाली.
श्यामची आई हे पुस्तक प्रत्येक मराठी मनात आई आणि मुलाबद्दल च्या नात्याबद्दल आदर निर्माण करते .या चित्रपटाला पहिले भारताबाहेरील सुर्वण कमळ देऊन गौरवण्यात आले . याला राष्ट्रीय पुरस्कार हि देण्यात आला .आजच्या पैशाच्या मागे लागलेल्या जगाला गरिबीत सुद्धा आपली मूल्य ढळू कशी देऊ नये हे हा चित्रपट शिकवून जातो.
प्रत्येक मुलाने आपल्या आई बाबा बरोबर पहावा असा चित्रपट ..
दिग्दर्शक - वी शांताराम
कलाकार- केशवराव दाते , शांता आपटे, शकुंतला परांजपे
संगीत- केशवराव भोले
मला हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट म्हणून आणि कथानकाच्या पुरोगामी विचारसरणी या मुळे जास्त आवडतो.
हा चित्रपट मी अगदी अलीकडे पहिला आणि मला कथानक अजिबात माहिती नव्हते .. पण चित्रपट पाहिल्यावर त्यातला अभिनय आणि कथानकामुळे मी फार प्रभावित झालो . समाजप्रबोधन म्हणून ज्यावेळी चित्रपट बनवले जायचे त्यावेळी अशा पध्दतीची मांडणी अतिशय धाडसी वाटते ..
प्रभातच्या निर्मितीला सलाम..
संत तुकाराम - १९३६
संत तुकाराम हा चित्रपट हा त्यातल्या संत भावासाठी बघावा .. कदाचित खरे तुकाराम कसे असतील जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्यांनी हा चित्रपट पाहावा.
दिग्दर्शक- विष्णुपंत गोविंद दामले , फत्तेलाल
कलाकार - विष्णुपंत पागनीस , श्री भागवत , गौरी

माझी आजी हा चित्रपट पाहायला सिनेमागृहाच्या बाहेर चप्पल ठेऊन गेली होती .. त्यात त्या काळातल्या साध्या प्रवृत्तीचे आणि त्या चित्रपटाच्या खरेपणाचे चित्र आपल्याला समजू शकेल.
प्रभात ची अजून एक अविस्मरणीय भेट
इतके दिवस आपल्यासमोर मला आवडलेले चित्रपट टप्प्या टप्प्याने सादर केले . कदाचित आपल्याला सुद्धा हे नक्कीच आवडतील अशी आशा करतो .
या लेखाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार .
आपली मराठी चित्रपट सृष्टि अशीच समृद्ध रहो हीच सदिच्छा
जयदीप भोगले
१४.१०.१०
चित्रपट , कथानक ,प्रभात , फत्तेलाल , लेख
No comments:
Post a Comment