सिंहासन - १९८०
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर
कलाकार- अरुण सरनाईक , निळू फुले , सतीश दुभाषी ... आणि इतर सर्व मात्तबर मंडळी ...
सिंहासन हा अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या कादंबऱ्यांवर आधारित सिनेमा आहे . मल्टी स्टार चित्रपात मराठी मध्ये जरा बोटावर
मोजण्या इतकेच आहेत त्यापिकी हा एक . ७० च्या दशकात रंगमंच गाजवणारे सर्व कलाकार एकत्र येण्याची पर्वणी या चित्रपटात घडून आली .
हा चित्रपट मला कोल्ड सिनेमा या धर्तीचा वाटतो . फार तद्काहेबाज संवाद नसूनही सिनेमाची पकड सुटत नाही .
धुरंदर आणि वास्तववादी राजकारणावर प्रकाश टाकणार चित्रपट .राजकारण . समाजकारण , कामगार संघटना यांचे तिरंगी बंडाळी यात दिसते
या सर्व कलाकार मंडळींसाठी संग्रही ठेवावा असा चित्रपट
हा खेळ सावल्यांचा १९७४
कथा - मधुसूदन कालेलकर
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर
कलाकार- काशिनाथ घाणेकर, आशा काळे ,धुमाळ , राजा गोसावी
मराठी चित्रपट सृष्टीत भयपट आणि सस्पेन्स चित्रपट खूपच कमी झाले . पारध, अशी एक रात्र होती, एक रात्र मंतरलेली , झपाटलेल्या बेटावर, पण पारध सोडता बाकी सगळे सुमार होते ..
उत्तम गाणी आणि खिळवून ठेवणारी कथा या मुळे हा चित्रपट एक उत्तम भयपट म्हणून संग्रही हवा
आशा काळे मला यात विशेष आवडली .. आणि गाणी तर मला वेगळे काही सांगायला नको अशीच आहेत
सामना - १९७४
कथा आणि संवाद- विजय तेंडूलकर
कलाकार - निळू फुले , डॉ श्रीराम लागू
सामना हा चित्रपट मला या पूर्ण यादीत सर्वात जास्त आवडतो . दोन व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाची झुंज . विजय तेंडूलकर यांची कथा आणि अतिशय प्रभावी संवाद, निळूभाऊ आणि डॉ लागू यांची कदाचित सर्वोत्तम ठरावी असा अभिनय आणि संवाद शैली .
हिंदुराव पाटील आणि मास्तर ( विफल गांधीवादी ) या व्यक्तिरेखा कदाचितच कुणाला अजून उत्तम रंगवता येतील किंवा आल्या असत्या.
प्रत्येक बाबतीत हा चित्रपट सरस आहे .. हा चित्रपट रिलीज झाल्यावर ज्यांनी हा पडद्यावर पहिला मला त्यांचा हेवा वाटतो . या चित्रपटाशी निगडीत सर्व व्यक्तींना माझं त्रिवार वंदन
प्रत्येक मराठी माणसाने उत्तुंग आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट( छायाचित्रण सोडून) म्हणून हा संग्रही ठेवावाच ...
हा चित्रपट तसा अगदी नेहमीच्या पठडीतला पण . १९७० मध्ये मुंबईच्या चाळकरी जीवनतील गमती जमती आणि त्यातून फुलणारी कौटुंबिक प्रेमकथा हा विषय मस्त होता .
जयदीप भोगले
पिंजरा - १९७२
संगीत- राम कदम
गीते - जगदीश खेबुडकर
कलाकार- श्रीराम लागू, निळू फुले, संध्या
सामनाच्या दर्जाचा हा अजून एक चित्रपट . पिंजरा हा चित्रपट न ऐकलेला मराठी माणूस मी अजून पाहिलेला नाही .उत्तम लावण्या ( संगीत आणि गीते या दोन्हीही तितक्याच दर्जेदार ) आणि अभिनय याने नटलेला हा एक चित्रपट
या चित्रपट मला तर लागूंच्या व्यक्तिरेखेच्या होणा-या दैनेबद्दल डोळ्यात पाणी येते . काही काही डायरेक्शन सीन अविस्मरणीय आहेत . राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांनी या चित्रपटाचे सोने केले
सर्व दृष्टीने पंचतारांकित सिनेमा .. शांताराम बापूंच्या सिनेमा चाहत्यांच्या संग्रही असावा असा चित्रपट ..
सोंगाड्या - १९७०
संगीत - राम कदम
हा चित्रपट मी दादा कोंडके याच्या जयंतीदिवशी प्रभात सिनेमा पुणे इथे पहिला साल २००३ , आणि विशेष म्हणजे हाउसफुल ,. आणि आम्ही पहिल्या रांगेतून पहिला.
दादांच्या झंजावाती युगाची सुरवात करून देणारा चित्रपट . या नंतर दादांनी मराठी गावरान मेवा दिला ते काही सांगायची गरज नाही .
राम कदम यांचे संगीत, दादांची अफलातून अदाकारी. आणि कृश्न्धवल असून रंगीत वाटणारी गाणी यामुले हा चित्रपट अवीट गोडीचा आहे.
मुंबईचा जावई - १९७०
संगीत - सुधीर फडके
गीतकार- ग दि माडगुळकर

याची गाणी मला कधीही ऐकायला आवडतात .. साधी आणि सोपी गाणी कशी अवीट करावीत यात बाबुजींचा हात कुणीच धरू शकणार नाही,
संगीतासाठी चित्रपट संग्रही
.. आवडते गीत आज कुणी तरी यावे आणि प्रथम तुज पाहता ..
एकटी १९६८
निर्माता - राजा ठाकूर
नावाप्रमाणेच हा चित्रपट म्हणजे आतडे पिळवटून टाकणारा सुलोचनाबाईंचा अभिनय ... खूप लहानपणी पाहिलेला चित्रपट ...
आईवेड्या मुलाने हा चित्रपट पाहून जर डोळ्यात पाणी आले नाही तर शपथ .... म्हणजे इतर लोकांनाही तितक्याच भावना आवरणार नाहीत हे ही खरे !!१
इथून दृष्ट काढते .. हे गीत ..तर लाजवाबच आहे ...मला मोलकरीण या चित्रपटापेक्षा हा चित्रपट जास्त वास्तव वाटतो म्हणून मी याला जास्त झुकते माप दिले ..
हा माझा मार्ग एकला १९६४
दिग्दर्शक - राजा परांजपे
कलाकार - सचिन ( बालकलाकार ) राजा परांजपे
हा चित्रपट एका बालकलाकाराचा म्हणालात तरी चालेल .. काही अफलातून छायाचित्रीत सीन्स , उत्तम गाणी . राजा परांजपे यांचा उच्च अभिनय
आणि हळुवार पण कष्टी करणारी कथा ...
जुन्या सालच्या सिनेमामध्य या चित्रपटाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते ..जयदीप भोगले
No comments:
Post a Comment