कार्यक्रम- कौन बनेगा करोडपती
वेळ- ९.००-१०.००
वाहिनी- सोनी
पहावा की नाही - अवश्य पहा ..
स्टार वाहिनीवर सुरवात करून स्टार आणि अमिताभ या दोघांनाही लोकप्रियतेच्या उच्चांकाला नेणारा सर्वांचा लाडका प्रश्नोतरांचा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती याने सोनी या वाहिनीवर या सोमवारपासून नवीन सुरवात नाही तर शुभारंभ केला ( कॅडबरी चोकलेट हे याचे प्रस्तुतकर्ता आहेत .)

यातच आता ही चुरशीचे पारडे कुणाकडे झुकले हे काही वेगळे नमूद करावे असे मला वाटत नाही. असो मोठ्यांच्या वादात आपलं विषयांतर नको .
सोनी वाहिनीवर जरी हा प्रोग्राम नव्याने सुरु झाला तरी यात काही लाइफ लाईन सोडल्या तर फार बदल नाहीत ..
पण अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा भेट हेच प्रमुख आकर्षण आहे.
आता लोकांनी कितीही सांगितले कि आता तो तोच तोच पणा वाटतो .. आता ती एनर्जी नाही .. अजून पुष्कळ कार्यक्रम पाहण्यासारखे आहेत. पण बच्चनची मजा काही वेगळीच
पहिल्याच भागात त्यांनी अग्निपथ आणि दिवार याचा संवाद सादर केला आणि जिंकले .. कदाचितच इतकी इंटेन्स डिलेव्हरी कुणी दुसरे करू शकते .
अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने आपल्या समोर बसलेल्या जन सामान्याला वागवतात, त्याचाशी संवाद साधतात , त्याचा आनंदाशी कुठेही वरचढ न होता एकरूप होतात हे वाखाणण्यासारखे आहे आणि हे या खेळाचे वैशिष्ट्य .. आणि कदाचित प्रश्नापेक्षा मला हेच पाहायला जास्त आवडते .
या वेळी एक्स्पर्ट पाहुणा एक नवीन भाग आहे आणि ते सुद्धा चपखलपणे बसवले आहे .

शिवाय मी याबद्दलच्या चर्चा जुन्या करोडपति मध्ये तर रस्त्यावर, पानाच्या गादीवर, किराणा दुकानावर सुद्धा ऐकल्या आहेत ..त्यामुळे कोण स्पर्धक किती छान दिसतो पासून कोण किती बावळट ,निर्बुद्ध, ढ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आपण कितीही सुमार बुधिमत्तेचे असलो तरी आपण मस्त ठोकून देऊ शकतो कारण आपल्याला उत्तर काय.. हे माहिती होते,
अणि ही याची गम्मत आहे .
या कार्यक्रमाने स्लम डॉग ला सुद्धा मदतीचा हात दिला आणि त्या सिनेमात सुद्धा करोडपती हा महत्वाचा भाग होता.
याच कार्यक्रमाने कितीतरी क़्विज शो , विडम्ब्ने आणली .. प्रत्येक कॉमेडी कार्यक्रमात बच्चनची नक्कल केली जाऊ लागली
कदाचितच इतकी लोकप्रियता आणि त्यावर भाजून घेतलेल्या पोळ्या दुस-या कुठल्या कार्यक्रमात झाल्या असतील असे मला वाटत नाही ...
आणि सोनी वाहिनीसाठी प्रतिस्पर्धी बिग बॉस हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे सोनी ला टी आर पी साठी फायदाच होईल नव्हे एव्हाना झाला असेल
पण दूसरा हुशार मुलगा अजारी पडला म्हणून मी पहिला आलो असा कार्यक्रम करोडपति नक्कीच नाही .. आणि इतर चांगले काही नाही म्हणून बच्चन ला बघू असे दिवस किंवा दर्जा बच्चन साहेब कधीही येऊ देणार नाहीत ..
म्हणुनच सांगतो बच्चनच्या चाहत्यानी , मला लॉटरी लागली तर असे स्वप्न रंगवणा-या स्वप्नाळू दर्शकांनी ..,बरबटलेल्या कार्यक्रमातून आपल्या मुलाला कसे वाचवावे या विचारात असणा-या पालकांनी , आणि आमच्यासारख्या चूक की बरोबर ,चांगले की वाईट अशी उठाठेव करणार-या समीक्षकांनी कौन बनेगा करोडपती अवश्य पाहावा
जयदीप भोगले
१५ .१० . २०१०
नाराजी होणार नाही एवढी खात्री .. बाकी आपण सुज्ञ आहात ..
तो चलिये आप और हम देखते है दुनिया का अदभूत खेल ,, जिसका नाम है -- कौन बनेगा करोडपती ....
जयदीप भोगले
१५ .१० . २०१०
yes good programmer, but TRP not geting
ReplyDeleteGood , but who is watching?
ReplyDeletesir, i think ppl are watching
ReplyDeleteit opened with 5.5. tvr reach is good
and my review is for content and it is my personal view
EKDAM SAHMAT AHE.
ReplyDelete