कार्यक्रम- एका पेक्षा एक - अप्सरा आली
वेळ- बुध गुरु - ९.३० रात्रौ
पाहावा की नाही - अवश्य
नृत्य हा सर्वांनाच आवडीचा असा कलाप्रकार आणि त्या वर आधारित अनेक कार्यक्रमांचे आलेले पीक आपणाला परिचित आहेच . प्रत्येक वाहिनी हिंदी मराठी अगदी मल्याळी सुद्धा लावावी आणि आपल्याला कुठेना कुठे तरी झलक मिळेलच .. आता हे सादरीकरण किती भडक, किती तालबद्ध, आणि करणारी व्यक्ती यावर अवलंबून असते आणि आपला रिमोट याच्या दर्जावर आपले काम करत असतो म्हणजे काम आपण करतो तो तसे वागतो ..


त्या एक आठवड्यापूर्वीच आपल्यासमोर आल्या म्हणा पण काही विश्वामित्र जर इतर वाहिन्या बघण्यात गुंग असतील तर माझी प्रतिक्रिया त्यांच्या क्रीयाशिलातेसाठी कदाचित फायद्याची होईल .
एका पेक्षा एक- अप्सरा आली असे नाव घेऊन आलेल्या या तारकांच्या नृत्यास्पर्धेला पहिल्याच भागात प्रतिसाद मिळेल अशी खात्री झाली.
फुलवा खामकर,मयूर वैद्य आणि दीपाली विचारे या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आपल्या कौशल्याचे आणि अनुभवाचे धडे या ललनांना देणार आहेत .. त्यामुळे सुंदर दिसणारी अप्सरा थिरकताना अजून किती खुलते हे काही वेगळे सांगायला नको .
आता या अप्सरा आहेत तरी कोण ? नेहा पेंडसे , गिरीजा ओंक , मृण्मयी देशपांडे , उर्मिला कानेटकर , नेहा जोशी , स्मिता तांबे , आरती सोलंकी आणि सोनाली खरे या अष्टललनासमवेत एक वादळ येत आहे ...एक सौंदर्याचा झंझावात येत आहे आणि तो म्हणजे नटरंगी नार ... सुरेखा पुणेकर ...

पण आता आपण बाकी गोष्टी जरी पहिल्या तर या सर्व ब-यापैकी चांगल्या नृत्य करणा-या आहेत, उत्तम दिसण-या आहेत आणि झी मराठी मालिकांच्या एक एक रत्न आहेत ..
मध्यमवर्गीय भीती आणि अपुरे धाडस म्हणून कित्येक दिवस पुण्यात येऊन सुद्धा मी नटरंगी नार पहिला नव्हता .. पण सुरेखा पुणेकर यांना जेव्हा या शो मध्ये पहिले तर दिलखेचक म्हणजे काय ..नयनबाण म्हणजे कसा असतो याचा प्रत्यय मला आला .. आणि यावर दिपाली यांनी विचारलेला प्रश्न -- ' सुरेखाताई ( त्यांच्या) आपण जेव्हा नाचता ,तेव्हा प्रत्यक व्यक्तीला आपण त्याला इशारा करता आहात, त्याच्या डोळ्यात पाहता आहात असे का वाटते ?' कदाचित इतकी उच्च प्रश्नार्थी दाद कदाचित कुणाला मिळते किवा कोणी दिली असेल ..
सचिन ये नेहमीप्रमाणे या कार्याक्रमचे प्रमुख आणि महागुरू आहेत . त्यांनी पाहिलेली चित्रपट सृष्टी त्यांचा अभ्यास, त्यांची शायरी हे सर्वच या नृत्यांगनाना एक मोलाचे मार्गदर्शन ठरत असले पाहिजे ..
आणि माझा आवडता एकदम कोकणस्थ टोमणे देणारा ( याला कुणीही जातीयवाद म्हणू नये ) पुष्कर श्रोत्री याचे सूत्रसंचालन करतो आहे .. त्यामुळे तबला पेटी आणि घुंगरू असे त्रिकुट असते तसेच
नऊ नवतरुण आणि सुरेखा पुणेकर यांसारख्या चिरतरुण नृत्यांगना , यांचा ताल सांभाळणारे तीन दिग्दर्शक , पुष्कर श्रोती यांची चपखल सांगत ज्यावेळी झी मराठी सारख्या रंगमंचावर येत असेल तर सोने झाल्याशिवाय राहत नाही.
रसिकहो , म्हणूनच सांगतो , आपण त्याच त्याच बातम्या बघून कंटाळला असाल , एक धड मालिका नाही.. म्हणून चरफडत असाल , मुलांच्या कोडकौतुकाला विटला असाल तर काही अस्सल असे मनोरंजन घेऊन इंद्रपुरीतून नाही तर किमान मुंबपुरीतून आपल्यासाठी एका पेक्षा एक अप्सरा आल्या आहेत १०-१२ आठवडे येत राहतील .. पाहायला विसरू नका
दाद द्यायला विसरू नका
चक्षु चाणाक्ष
जयदीप भोगले
No comments:
Post a Comment