

मला अजूनही आठवते की फिरता रंगमंच आणि त्यातून येणारे राध्येश्याम महाराज कप्तान परांजपे असे सिनेमा पाहिल्यासारखे वाटायचे .. इतक्या लवकर ते कपडे बदलू शकत हि असतील पण इतक्या बेमालूम पणे एखाद्या व्यक्तिरेखेत शिरायचे हेच मला नवल वाटायचे .. किंवा आता मला अचंभ वाटतो .. मला आज कळत्या वयात मी तो मी नव्हेच नाट्यगृहात पाहू शकलो नाही
- भटाला दिली ओसरी
- तो मी नव्हेच
- इथे ओशाळला मृत्यू
- अश्रूंची झाली फुले
- थ्यांक यु मि.ग्लाड
- जेव्हा गवताला भाले फुटतात
नाट्यसंस्थेसाठी नाट्यसंपदा स्थापून केलेले योगदान असो, की अविरत रसिकांच्या टाळ्याचा बालेकिल्ला सर करत केलेल्या भूमिका असोत त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांना नेहमीच सलाम.
या पोस्ट चे शीर्षक प्रभाकराचा अस्त जरी दिला असेल तरी हा सूर्य पुन्हा आपल्या केलेल्या प्रचंड कामामुळे नेहमी तळपत राहील यात शंका मुळीच नाही .
या पोस्ट चे शीर्षक प्रभाकराचा अस्त जरी दिला असेल तरी हा सूर्य पुन्हा आपल्या केलेल्या प्रचंड कामामुळे नेहमी तळपत राहील यात शंका मुळीच नाही .
अशा थोर व्यक्तीमुळे काम करण्याची नेहमीच प्रेरणा मिळत राहील .. त्यामुळेच मी म्हणतो .. इतका थोर मी नव्हेच ... तो मी नव्हेच
जयदीप भोगले
No comments:
Post a Comment